Thursday, 11 December 2014

पान ७

जीवन केवळ खेळ
********************
जया कळले ही केवळ भूमिका आहे,
स्वताला पात्र समजुन.............. खेळ खेळी
कधी हिंदु कधी मुस्लिम... कसा ही वेश असु दे
मिळे तो वेश करुनी..................खेळ खेळी

जया असती नयन उघड़े,
कशा लागे........तयासी तीर्थ काशी... तीर्थ काबा
जगत हे प्राण जीवन......सकल जीवांचे
न केवळ माणसाची............... बुद्धी........आभा

जया दिसले क्षणातील जगत पूरे
कशा त्याने करावी मोजणी..... सा-या जगाची
जया जमले कणातुन राहणे.....अख्या
अशासी लाभले ऐश्वर्य अन् .......सत्ता जगाची
अरुण

एक चिंतन
************
'गुळा चा गणपति आणि गुळाचाच नैवेद्य'
हा वाकप्रचार बरेच काही सुचवून जातो

आपणा जवळ, आपणा सकट,
फक्त आहे हे एक अस्तित्व, ह्या पलिकडे
काही ही नाही
कल्पनेचा वापर वेग वेगळ्या संदर्भात
याचे वेगवेगळे तुकडे कल्पून बुद्धीला
सामग्री पुरवतो, सर्व जोड संकल्पना निर्माण करतो
विचार ह्या सामग्री च्या जिवावरच जिवंत राहतात
- अरुण

















बोध स्पर्शिका
*****************
मूर्ख दोन प्रकार चे
------------------------
शहाणपणाचा अभाव असणारा
मूर्खच
शहाणपणाचा भाव मिरवणारा ही
मूर्खच
..................
मनातच प्रवास
-------------------
श्वास श्वास जगतो, त्यास
न आस न इतिहास
श्वासांचा विसर पडलेला करतो
फक्त मनातच प्रवास
.........................
मनुष्यच परावलंबी
---------------------
सर्व प्राण्यांत मनुष्यच
परावलंबी
म्हणून बुद्धी ची लागे त्यास गरज
होण्या स्वावलंबी
-अरुण

बोध-स्पर्शिका
****************
व्यक्ति आणि व्यक्तिमत्व
-----------------------------
कोणती भाषा लिहिणे यावर
कागदा चा पोत ठरत नसतो
व्यक्तिमत्व कसे ही असो
व्यक्ति मात्र एकच असतो
............................

तहानल्यां चे गोत
--------------------
तहान केवळ माझीच
ओलावतो माझेच मी ओठ
जर ती असती सामुहिक तर
बनले असते 'तहानल्यांचे' ही गोत
...............................

No comments:

Post a Comment