Thursday, 10 December 2015

१० दिसम्बर

आजच्या बोधस्पर्शिका
**********************
नुसता धर्म-संस्कार
---------------------
दरवाजाशीच थांबुन राहीलो
आंत शिरणे राहुन गेले
हिंदू बनलो..मुस्लिम बनलो
धार्मिक बनणे राहुन गेले
**************************
सम्यक ज्ञान
------------------
एकीकडे पशुत्व...दुसरी कडे देवत्व
टोका कडे होई प्रवास
कधी महापशु तर कधी महादेव
न साधता आला 'माणूस खास'
*******************************
सत्य हेतुविण
-------------------
सूर्य उगवतो....पाऊस पडतो......
नसता कुठलेही...... प्रयोजन
माणसाच्या मायानगरीत
श्वांस घेण्यालाही... लागते धोरण
*******************************
अरुण
आजच्या बोधस्पर्शिका
**********************
अभंगता
---------------------
नदी किती ही शांत तरी
खडा पडताच उठतात तरंग
ज्यांची मने आकाश झाली
किती ही छेडा राहते अभंग
************************
ध्यानस्थ. किंवा डोळस
---------------------------------
'दळण दळणारा डोळस असतो... तेंव्हा
कुत्रा लांबच राहतो
षडरिपुं ही जागीच विरतात.. जेंव्हा
मनाचा गाभा ध्यानस्थ राहतो
*******************************
चिंतन म्हणजे भान
----------------------
चित्ताच्या अतिनिकट श्वासोश्वांस
तरी त्याचे नसते चिंतन
'सत्य' ह्या संकल्पनेत गुंतलेला
त्यावर करीत राहतो प्रवचन
*******************************
अरुण

बोधस्पर्शिका
**************
नदीत लाट उसळते की
ढकलण्यात येते ?
जो जसे बघतो त्यास
तसे दिसते
अरुण
आजच्या बोधस्पर्शिका
********************
आपला-परका
---------------
आपल्या-परक्यांच्या ह्या जगात
आपले आपल्यांनाच जवळ घेतात
राष्ट्र-प्रेम, राष्ट्र-वादाचे स्तोम माजवत
हिसें..घृणे चे बी पेरतात
*****************************
भक्ती ला सीमा नाही
--------------------------
पायरीला केलेला नमस्कार जर
मूर्ती पर्यंत पोहचतो
मग, मूर्तीला केलेला नमस्कार
मूर्तितच कां खुंटतो ?
**************************
निर्बुद्ध बुद्धी
-------------------------
प्रवास करताना गाडीचे चाक
अधांतरी फिरून चालत नाही
अवधान सोडुन चाललेली बुद्धी
कांहीही साधत नाही
*******************************
अरुण
बोधस्पर्शिका
************
मन स्वतः ची जागा सोडून पळत राहते
ह्रदय मात्र जागच्याजागी धडधडत राहते
आणि म्हणूनच
मनाला ह्रदय-स्पर्श कळत नाही
-अरुण
बोधस्पर्शिका
************
वर गगन निळे..खाली धरती काळी
सकलांचा तर...हा एकच देह
प्रत्येक जण वाटतो वेगळा
तरी वेगळा नाही, कारण
सर्वांचा तर एकच स्नेह
-अरुण

Monday, 30 November 2015

१ दिसम्बर

बोधस्पर्शिका
************
ह्या क्षणातला 'मी'.....
त्या क्षणात टिकत नसतो
दोन क्षणातले अंतर
दिसुन येत नसल्याने....
लहानपणाचा 'मी'
अजुन जिवंत आहे
असा भास होतो
अरुण





बोधस्पर्शिका
*************
विश्वास ठेवणे आणि
विश्वास असणे...हे दोन्ही
वेगवेगळे
पहिले....डोळे मिटुन चालण्या सारखे..तर
दुसरे... पायाखालची वाट स्पष्ट बघत चालण्या सारखे
अरुण

बोधस्पर्शिका
*************
मुळात,
माणसा माणसातलं नातं
ह्रदयाचं नातं
मन शिरलं त्यात की ते बनतं
स्वार्थाचं नातं
अरुण

बोधस्पर्शिका
************
प्रत्येक क्षण
जागच्याजागीच
घडत आहे
मनास वाटे उगा की ते
पुढे सरत आहे
अरुण

बोधस्पर्शिका
*************
"माझे शरीर माझ्याच मालकी चे"-
असा अभिमान बाळगणारे ही
दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे
म्हणजेच
दुसऱ्यांच्या आधीन राहुन वागताना
दिसतात
ज्यांना हे शरीर व मन
हे दोन्हीही
आपले नाही अशी दृष्टी मिळते,
तेच खरे खुरे मुक्त
अरुण
बोधस्पर्शिका
*************
शब्दांत अर्थ भरून
शब्दांच्या डब्या साठवून ठेवणे...
हे काम डोक्याचे
पण त्यातला अर्थ शोषून घेऊन
डब्या टाकून देणे.....
हे काम ह्रदयाचे
अरुण

बोधस्पर्शिका
**************
जे दिसण्या सारखे आहे ते
डोळ्यांनी बघतां येते, हे खरे...
पण जे अस्तित्वातच नाही
ते ही मनांत असल्या सारखे बनुन
नुसते वावरतच नाही तर
मनाकडुन वापरले ही जाते
अरुण
बोधस्पर्शिका
*************
कल्पना सगुणाचीच
घडते
कल्पना ओसरताच
निर्गुण कळते
अरुण
बोधस्पर्शिका
**************
कुणाला ज्ञान हवे
मेंदूतील कचरा
साफ करण्या साठी
तर कुणाला ...मेंदूत ज्ञानाचे
प्रदर्शन भरवण्यासाठी
- अरुण
बोधस्पर्शिका
**************
बीज रुजवायचे आणि
झाड़ उगवण्याची प्रतिक्षा करायची -
हे चुकीचे नाही.
परंतु झाड उगवेलच-
अशा प्रकार च्या खात्रीची अपेक्षा करणे-
चुकी चे ठरू शकते
- अरुण






बोधस्पर्शिका
*************
आपण जे जीवन
जगत आहोत
ते रचलेले जीवन आहे
जे जीवन आपणांत आहे
तेच असलेले जीवन आहे
अरुण
बोधस्पर्शिका
*************
जो आपल्या श्वासांवर स्थिरावलेला...
त्याला आशा अन् निराशेचा चालू असणारा संघर्ष
स्पष्ट दिसत असतो, परंतु
जो आशा-निराशेत गुंतलेला....
त्याला आपल्या श्वासांचाही पत्ता नसतो
अरुण
बोधस्पर्शिका
*************
माणसे एकच जगात..
एकच धरणीवर जगत असली तरी
कल्पनेत किंवा मनाने,
प्रत्येकाचे जग किंवा देश निराळा आहे.
हे काल्पनिक निराळेपणच तर....
जगातील अनेक संघर्षांचे बीज नसेल?
अरुण
बोधस्पर्शिका
*************
पंखा चालू झाला की
हवा चालते पण
ती हवा पंख्या ची नसते
मेंदू मुळे मन धावते पण
मन मेंदु चे नसतेक
अरुण
बोधस्पर्शिका
*************
शिक्षण आत्मकेंद्रित मनोवृत्तीच्या
पोषणासाठी  की
सकलाशी एकरूप होण्यासाठी.....
हे नीट स्पष्ट होते ज्याला,
तोच अचूक शिक्षण देतो,
बाकी सर्व फक्त गरजे पुरतेच
अरुण


बोधस्पर्शिका
**************
सावली कोणती किंवा कोणाचीही असो,
अस्तित्वात नसते परंतु
मग ती कां दिसते?-

ध्यानात आणले तर दिसुन येईल की
जेवढ्या जागेवर ऊन किंवा उजेड पोहचले नाही
ती जागा वेगळी दिसते आणि दिसण्यातलल्या ह्या वेगळेपणालाच
सावली म्हणतात

सावली म्हणुन असे कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नाही
- अरुण

Saturday, 31 October 2015

1 November

बोधस्पर्शिका
*************
अनुभव दिला जात नाही
घेण्यात येतो,
जे समोर दिसते त्याला
स्मृति कडुन होणारी प्रतिक्रिया
म्हणजे अनुभव
- अरुण

बोधस्पर्शिका
(मराठमोळ्या हिंदीतुन)
*****************
न कुछभी आगे इथे
न कुछभी... पिछाड़ी
तरी ही बंदा चालवत आहे
मागे बघुनच...गाडी
अरुण




Wednesday, 28 October 2015

29 October

मराठी
..
अरे मना !
काय ही तुझी विचित्र अवस्था..?
जरी तुझ्या अस्तित्वाच्या सर्व खुणा/जाणीवा
ह्या देहात (मेंदुयुक्त देहात) सापडत असल्या,
आणि.... जग ही त्याची ग्वाही देत असलं, तरी
तुझ्या निवासा साठी  ह्या देहातच काय तर
अख्या जगात एक सुद्धा कोपरा उपलब्ध नाही...
याचे कारण एकच असावे बहुतेक ...
ह्या देहाच्या  जन्मावेळी तू त्याचे संगे नव्हतास आणि
हा देह जातेवेळी ही तू त्याचे जवळ नसशील
-अरुण


बोधस्पर्शिका
************
मन करते जगाचा अभ्यास
म्हणजे वस्तुचे (object) ज्ञान
जग करते मनाचा अभ्यास
म्हणजे मनाचे (subject) ज्ञान
मनासकट जगाचे निखालस अवधान (awareness)
म्हणजे सकलाचा (total) बोध
-अरुण

बोधस्पर्शिका
*************
सुखवण्यासाठी येते परंतु दुखवत जाते
इच्छा नेहमीच...............अतृप्त राहते
- अरुण

Sunday, 25 October 2015

26 October

बोधस्पर्शिका
*************
सावल्याच सावल्यांशी बोलताना
खऱ्या वाटतात
पण मग......लख्ख प्रकाशात
कुठे जातात?
अरुण
बोध स्पर्शिका
*****************
मूर्ख दोन प्रकार चे
------------------------
शहाणपणाचा अभाव असणारा
मूर्खच
शहाणपणाचा भाव मिरवणारा ही
मूर्खच
..................


बोधस्पर्शिका
*************
मनातच प्रवास
-------------------
श्वास श्वास जगतो, त्यास
न आस न इतिहास
श्वासांचा विसर पडलेला करतो
फक्त मनातच प्रवास
- अरुण
.........................
मनुष्यच परावलंबी
---------------------
सर्व प्राण्यांत मनुष्यच
परावलंबी
म्हणून बुद्धी ची लागे त्यास गरज
होण्या स्वावलंबी
-अरुण

बोधस्पर्शिका
*************
जीवन केवळ शुद्ध संचार
न याला आकार न प्रकार ....
याला - भूत भविष्य आणि वर्तमान....
ही विशेषणे नाही

जो जेंव्हा स्पर्शेल..जाणवत राही
जीवन न गोठते बिंदुत
न रेषेत लांबते ...
बघणारा लुप्त झाला की
त्याला ते गावते

जीवन न नवीन न जुने
जुने नसल्याने नवीन आहे...
असे म्हणण्यातही काय अर्थ उरे...

जीवन अस्थाई की सनातन ?...
हा प्रश्न रद्दबातल ... कारण
जीवन केवळ शुद्ध संचार
-अरुण

बोधस्पर्शिका
*************
समाधि -
----------
'अापण काहीही करणे किंवा आपल्या हातुन होणे'....
'जो' वा 'जे'......घडवीत आहे,
ते सतत ध्यानात राहणे
अरुण
बोधस्पर्शिका
************
अंतरंग संताचे असते ...... पारदर्शक
संसाऱ्याचे अंतरंग..........स्वार्थवर्धक
-अरुण





बोधस्पर्शिका
************
ठसवले मी मनात की मी असा आहे.. तसा आहे
कारण.. घाबरतो हे जाणवतां की मी नाही कोणी
- अरुण
बोधस्पर्शिका
************
श्वांस होते मोकळे ... मी मोकळा होतो
अंतरंगी एकही विश्वास नव्हता जागला
- अरुण















Tuesday, 20 October 2015

21 October

बोधस्पर्शिका
**************
स्मृति कडून होते ती
प्रतिक्रिया किंवा Reaction...
अवधानातुन प्रकटतो तो
प्रतिसाद किंवा Action....
अरुण
बोधस्पर्शिका
*************
मन जसं बघतं
जग तसच दिसतं
निराकार वास्तव सुद्धा
वस्तु बनून जातं
अरुण
बोधस्पर्शिका
*************
एक.. जो जीवन
समजुन व सावधपणे जगतो आणि
दुसरा... जो गैरसमजुतीत राहुन
गाफिलपणे जगतो...

जरि गंतव्य किंवा मरण दोघांचे सारखेच असले
तरि जीवन-प्रवास दोघांनचा फारच वेगळा...

एक.. प्रवासी गाडीतुन प्रवास अनुभवत जगणारा..तर
दुसरा... मालगाडीच्या बंद डब्यातुन
एखाद्या commodity सारखा पाठवलेला
अरुण

बोधस्पर्शिका
*************
बोचणे टोचणे... वेदनादायक असले तरी
अशा वेदनेला आकार नसतो
आठवण सुद्धा गत अनुभवांची संवेदनाच
पण ही संवेदना
सतत बदलत राहणारा
मनरूपी आकार घेत हसवत राहते..रडवत राहते
अरुण
बोधस्पर्शिका
************
कोऱ्या कागदावर टिंब काढा,
रेषा काढा
किंवा काढा एखादा गोलाकार..
कागद 'निर्कोरा' होतो....
एखादे अक्षर, शब्द किंवा वाक्य लिहिले,
तरी ही कागद 'निर्कोरा' होतो.
फरक एवढाच की
अक्षर, शब्द व वाक्य..
निर्कोरेपणाला बोली देतात...
त्या निर्कोरेपणातुन वाचणाऱ्याचे
मन बोलू लागते
अरुण
बोधस्पर्शिका
**********
जीवन केवळ खेळ
********************
जया कळले ही केवळ भूमिका आहे,
स्वताला पात्र समजुन.............. खेळ खेळी
कधी हिंदु कधी मुस्लिम... कसा ही वेश असु दे
मिळे तो वेश करुनी..................खेळ खेळी

जया असती नयन उघड़े,
कशा लागे........तयासी तीर्थ काशी... तीर्थ काबा
जगत हे प्राण जीवन......सकल जीवांचे
न केवळ माणसाची............... बुद्धी........आभा

जया दिसले क्षणातील जगत पूरे
कशा त्याने करावी मोजणी..... सा-या जगाची
जया जमले कणातुन राहणे.....अख्या
अशासी लाभले ऐश्वर्य अन् .......सत्ता जगाची
अरुण

बोधस्पर्शिका
************
मेंदूवर.... मनाचे धुके
म्हणूनच....जग ओळखताना
माणूस चुके


-अरुण

Tuesday, 13 October 2015

14 October

बोधस्पर्शिका
*************
हळुवारपणे बघत बघत
गुंतलेल्या धाग्यांचे
गुंतलेपण घालवले जाते... पण
मानसिक गुंत्याचे तसे नाही.....
मनाचे गुंतलेपण अख्खे चे अख्खे दिसून येताच,
तो गुन्ता (ती समस्या) विरून जातो.
सर्व मानसिक समस्या पूर्णत्वाने व स्पष्टपणे
बघितल्या गेल्या की अचानक सुटतात,
सोडवाव्या लागत नाहीत.
अरुण

बोधस्पर्शिका
*************
पैसे देऊन झाले आणि
वस्तु ताब्यात आली की
वस्तु आपली होते
केवळ कागदोपत्री नव्हे तर
मनोमनी ही.....
आणि मग
त्या वस्तुशी निगडीत सर्व विवंचना
मनाला बोचू लागतात ....
यालाच म्हणतात...
The pain of attachment
अरुण
ही 'त्याची' फुंकर रे...
***********************
धावत्या नदी सवेच धावतो किनारा
श्वांस घाट करी प्रवास, जीवन क्षणधारा

वा-यावर पान उडे, पानावर जीव उभा
धरपडतो तू जपण्या क्षणभंगुर प्राण उगा
ही 'त्याची' फुंकर रे, हा 'त्याचा' वारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

रेघोट्या काढोनी धरणी चे भाग करी
एक तुला प्राणप्रीय, दुसरा परदेश परी
हा 'त्याच्या' सृष्टीचा पसरला पसारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

जीवन हे गंध देत फुलणा-या सुमनांचे
प्रेम करीत सर्वांवर, जगणा-या सुजनांचे
'तो' करुणा सागर, 'तो' प्रेमभाव सारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

गेलेले सरले अन् येणारा एक भास
असणारा दिवस खरा, जिथे खराखुरा वास
असणारा क्षण जिवंत.. ईशचा निवारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

धावत्या नदी सवेच धावतो किनारा
श्वांस घाट करी प्रवास, जीवन क्षणधारा
- अरुण

Sunday, 11 October 2015

बोधस्पर्शिका व इतर

बोधस्पर्शिका
**************
अभूतपूर्व आनंद होणे,
सहसा घडत नाही
भूतपूर्व मार्गांने तर... नाहीच नाही
.........
अभूतपूर्व आनंद = गत अनुभवांची ज्यात किंचित ही स्मृती नाही असा आनंद
भूतपूर्व = गतकाला ची आठवण वापरून घडलेला
-अरुण

बोधस्पर्शिका
*************
त्याला त्याच्या पंखांची ताकद
कळू देण्यापूर्वीच
आईवडील बालकांत
आपले संस्कार व आकांक्षा गुंतवू बघतात
आणि म्हणूनच बऱ्याच वेळा, मुलांना आईवडिलांच्या
परिघाबाहेर जावून उडता येते नाही....
-अरुण

बोधस्पर्शिका
**************
प्रत्येक सावलीची ही जर
सावली पडत असती.. तर
सावल्यांचे एक वेगळे जग तयार झाले असते...
मानवी मना सारखे
अरुण
बोधस्पर्शिका
************
मेंदु नसता तर मन नसते,
हे खरे
पण मन...मेंदु मनाला स्पर्शत नाही,
हे ही खरे
- अरुण
मन तो है मस्तिष्क से पर बीच रिश्ता कुछ नहीं
आग से निकला धुआँ पर आग का हिस्सा कहाँ?
- अरुण

बोधस्पर्शिका
**************
आवाजावर आकाराची कल्पना
रचली की शब्द बनतात
आणि शब्द एका मागून दुसरा..तिसरा असे
धावू लागले की भाषा बनते... संवाद घडतो

संवाद ही केवळ कल्पना.... केवळ भास
आणि आवाज.... हे सत्य
अरुण

बोधस्पर्शिका
*************
विचारात हजर होणे
म्हणजे अस्तित्वाचा विसर पडणे....
अस्तित्वात रमणे म्हणजे
विचारांच्या पकडीतुन बाहेर पडणे
अरुण
बोधस्पर्शिका
*************
डोक्यात
स्मृतीच स्मृतींना कुरतडत राहते
प्रत्येक येणाऱ्या अनुभवाला
'तो माझा' आणि नंतर तो म्हणजेच  'मी'
असे म्हणत राहते
अरुण
बोधस्पर्शिका
*************
ज्याला जे रुचते
तेच पचते.....
मग ते ज्ञान असो, ध्यान असो
किंवा असो भक्ती
अरुण

 आजन्म क़ैदी
- एक कैफियत
****************************
जन्माला आलो त्याच दिवशी
कां तयार केली नाहीत
एक तिरडी माझ्यासाठी ?
कारण
त्याच दिवशी तर
सुरवात केलीत माझ्या कोंडमा-याची...

ओरबाडुन माझे निरंग श्वांस
देहाच्या कुपीत बंदिस्त केलीत तुम्ही तुमची उष्टी फुंकर

काय बरे आणि काय वाईट ?
अशा समाजोपयोगी रोट्यांच्या जिवावर....आणि
उसन्या श्रद्धा -अश्रद्धा...आणि अस्मितां च्या भिंती उभारून
पोसलात तुम्ही हा कैदी......

भिंतीं च्या आंत मात्र कैद्याला स्वप्न पाहण्याची मुभा आहे..
....हेच आणि  एवढेच आहे.....ह्या आजन्म कैद्याला  मिळालेले स्वातंत्र्य
अरुण
एक-तारी वाजवत, गात गात फिरणा-या फ़क़ीरा तोंडी
टाकण्यासाठी लिहलेले माझे हे गीत

देव शोधतो कशास वेड्या ?
***************************
देव शोधतो कशास वेड्या, देव हरवला कुठे ?
हरवला तूच, जगातुन इथे

अपले तुपले, घेणे देणे, किती कमवले, किती गमवले ?
रात दिवस ही जडली पाठी... विवंचने ची भुते
हरवला तूच, जगातुन इथे

नयन झोपले, नयन जागले, अवधानाचे दार लोटले
जीवित क्षण, निर्जीव त्यावरी, स्मृति-स्वप्नांची पुटे
हरवला तूच, जगातुन इथे

गगन निळे, ही धरती काळी, देहा पासुन नसे निराळी
अहंकार घर आंत बांधुनी..देहा पासुन तुटे
हरवला तूच, जगातुन इथे

पाऊस माती अंबर वारा, देव भेटतो सतत जिवाला
धर्म कर्म, जपजाप साधिले, तरी न अंतर मिटे
हरवला तूच, जगातुन इथे

देव शोधतो कशास वेड्या, देव हरवला कुठे ?
हरवला तूच, जगातुन इथे
अरुण

बोधस्पर्शिका
*************
गणिताने घातलेले प्रश्न
ज्याप्रमाणे सोडवले जातात,
त्याच प्रमाणे मन....
स्वत: निर्मिलेले प्रश्न सोडवू बघते,
आणि म्हणूनच असे प्रश्न
सुटत नसून फक्त पुढे ढकलले जातात
-अरुण
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Sunday, 27 September 2015

पेज ४७ पर्यंत

बोधस्पर्शिका
*************
ओळखी च्या वाटेवर काही ही नवे नसते
नव्या डोळ्यांनी बघणाऱ्यालाच नवे दिसते
अरुण

ह्या पाऊस धारा....
******************
ह्या पाऊस धारा.... धरा भिजवती
गंधीत परिसर सारा
काळ्या दाट ढगांना शिवतो
मऊ मुलायम वारा
****
सळसळणाऱ्या पानांचे स्वर.. सर सर सरीत सरले
डोंगरमाथे दाट ढगांच्या कुशीत अलगद शिरले
धरती वर उन्मुक्त विखुरला...हिरवागार पसारा
ह्या पाऊस धारा .....
***
खळखळणाऱ्या जलभर रेषा... डोंगरघाट घसरल्या
दरी वनांतील जलथल वाटा... ओळखवेशा विरल्या
जल-काहूर करोनी अवनी..... करते दीर्घ पुकारा
ह्या पाऊस धारा .....
***
तळमणाऱ्या भू भेगांतुन.... जीवनजल दरवळले
रुक्ष कपारी ओल्या झाल्या... मेघ मधाळ बिलगले
क्षितिजाच्या श्वांसातुन उडतो... आल्हादीत फवारा
ह्या पाऊस धारा .....
***
ह्या पाऊस धारा.... धरा भिजवती
गंधीत परिसर सारा
काळ्या दाट ढगांना शिवतो
मऊ मुलायम वारा
अरुण

बोधस्पर्शिका
**************
शून्यातुनच..बुद्धीने संख्या रचल्या
पण शून्य काय...हे बुद्धी ला स्पर्शत नाही
फक्त बुद्धांनाच उमजते
अरुण





बोधस्पर्शिका
************
बहुदा आपण सर्व तात्कालिक समाधानांवर जीवन जगणारी माणसे आहोंत. असे म्हणतात की ....समग्रतेने किंवा पूर्ण गहनतेने जीवनाचे दर्शन घेण्याचे साहस करणाऱ्यानांच....जीवन कळले आहे.
-अरुण

रुबाई
********
तैरते वक़्त कोई प्यास से तिलमिलाता हो, बात सुनी नही
डूबता हो और पानी माँग रहा हो पीने को, बात जमी नही
वैसे तो तैरकर या डूबकर ही...........जानी गई है जिंदगी
चुल्लू चुल्लू पीकर जो जानना चाहें.. उनसे बात बनी नही
अरुण


बोधस्पर्शिका
**************
मनाला होणारी जाणीव व मनाने घडणाऱ्या कल्पना.....
दोन्ही वास्तवाचेच भाग. परंतु निर्मना ला जे उमजते
ते सर्व असते सत्य जे मनाला
कधीच कळत नाही
अरुण
एक शेर
********
झूठ के बाज़ार में सच बिकता नही है
जो ख़रीदा जाए....... वह सच नही है
अरुण
बोधस्पर्शिका
*************
माणसांच्या ह्या जगात
देव दिसत नाही
माणसा ला देवदृष्टी लाभली
तरच देव दिसतो
- अरुण














एक गझल
***********
मोडली गळ्यात हाक.. बोलवू कशी
वाट.. आंधळ्या, खुणेत दाखवू कशी

घालमेल सावरीत ......दिवस संपला
ही उदास सांजवेळ...... घालवू कशी

घर घरातले दिवे........ जळून संपले
अर्ध-पेटल्या दिव्यास....मालवू कशी

श्वांस भार पावलास.... वाटले अता
स्वप्न पांगळे......धरून चालवू कशी

अर्थ, सूर,ताल,नाद....... ....दूर गुंतले
शब्द कोरडे उगाच.........आळवू कशी
अरुण

बोधस्पर्शिका
*************
उर्मी आल्यावरच
पिसारा उलगडतो
वेडेपण झोंबल्यावरच
शहाणपणा उमलतो
अरुण
बोधस्पर्शिका
**************
जे जे अस्तित्वात नाहीच ते ते माणसाच्या
विचारात असल्या कारणाने, माणसाने जीवन जगण्यास
उपयोगी बनवले. ...लहान मोठे,इथे तिथे, माझे तुझे
,.... असले मोजमाप माणसाच्या नित्य उपयोगा चे असले तरी
अस्तित्वात नसतात.... यामुळेच कदाचित माणसाच्या जगाला
माया जगत म्हटले जाते
अरुण
बोधस्पर्शिका
**************
अपलेच डोळे आणि अपलेच पाय असतील
तर वाट चुकत नाही
दुसऱ्यांच्या डोळ्यांनी चालणाऱ्याला
वाट दिसत नाही
अरुण






बोधस्पर्शिका
**************
लोकशाहीत हीच मोठी सोय की ती
खरे, खोटे, आस्तिक, नास्तिक.....
अशा सर्वांना वाव देते कारण ती
कोण खरे कोण खोटे हे बघत न बसतां.
‘कुणाला जास्त मते/सीटे
ह्यावरच केवळ निवड करते
-अरुण
बोधस्पर्शिका
************
एक म्हणतो ...
'शोधा वदे, शोधा वदे'
दुसरा म्हणतो ....
हो, शोधतो, पण 'वदे' म्हणजे काय हे तर कळू दे अगोदर
परत पहिला म्हणतो .....
कां?- शोधतोस ना 'देव' तू,  'देव' म्हणजे नक्की काय, हे कळण्या अगोदरई
-अरुण
बोधस्पर्शिका
**************
नज़र जिथे जाते, तिथे
विचार लगेच पोहचतो
नजरेला 'जसे च्या तसे'
बघण्यास रोकतो
अरुण
एक शेर
*********
तमन्ना से बच निकलने का ख़याल
किसी तमन्ना से कम नही होता
अरुण

बोधस्पर्शिका
**************
कृती मनाने नव्हे,
मनापासून व्हायला हवी,
कारण
मनाने होते फक्त कल्पना
आणि मनावाचुन होते फक्त शारीरिक यंत्रणा
-अरुण






बोधस्पर्शिका
************
शरीर श्रमाने थकले की
विश्रमासाठी थांबते
मन थांबण्याच्या भीतीमुळे
चालतच राहते
अरुण

बोधस्पर्शिका
************
ज्या इच्छा आशाळभूत असतात व
कोणत्या तरी विश्वासावर आधारलेल्या असतात
त्या फसव्या असतात
अरुण
खरे नाही का हे की-
*******************
ह्या उत्सवी गणेशा चा एकूण प्रवास व
माणसाचा जीवन-प्रवास सारखाच
---------
प्रथम 'सर्जन'
मग 'गर्जन तर्जन  .......
आणि शेवटी
'विसर्जन'

अरुण
बोधस्पर्शिका
**************
जन्माच्या वेळी प्रत्येक जण असतो
सकल, निनावी, पूर्ण, समाधानी....
पण ओळख मिळताच तो होतो
वेगळा....परिचित...आंशिक, अतृप्त....
अरुण
बोधस्पर्शिका
************
इच्छा..... ही ऊर्जेला सक्रीय
करणारी प्रेरणा असुन ती सर्वांचे
हित साधते की अहित हे...
इच्छे च्या स्वरूपा वर अवलंबुन आहे.
उपाशी पोटाची भूक आणि अप्पलपोट्याची भूक
सारखी नाही....
पहिली शारीरिक संवेदना तर
दुसरी आहे
मानसिक असमाधाना ची वेदना
- अरुण


बोधस्पर्शिका
**************
मना ला देह चालवतो की
देह मनामुळे चालतो ???
असे प्रश्न ....
त्यालाच पडतात ज्याला
देह आणि मन वेगवेगळे आहेत
असे वाटते.
'देहमना' चे असणे
उमजुन येत नाही.
अरुण

बोधस्पर्शिका
************
अंधारात दोन पेटत्या वातींचा प्रकाश
एकचा एक असतो.
जमीन सलग एकची एक
पण मधुन वाहणाऱ्या नदी मुळे
तिचेच दोन वेगळे किनारे झालेले दिसतात.
कितीही माणसे असु देत पृथ्वीतलावर
सर्वांचे अंतरंग
एकच प्रेमधारेत बुडालेले आहे
अरुण

बोधस्पर्शिका
**************
‘निसर्गाशी लढून निसर्गाला जिंकता येते’
हा विचार विज्ञान-सुसंगत नव्हता –
हे आता कळुन चुकले आहे.
‘निसर्गाशी मैत्री राखत त्याला जीवन-संगत कसे बनवायचे’ –
ह्याचा विचार आता नव-विज्ञान करीत आहे
-अरुण

ज़िन्दगी रूहानी
***************
देखना... सबकुछ बराबर की नज़र से
ज़िन्दगी होगी तभी .....असली रूहानी
कुछ पे ज़्यादा ध्यान देना कुछ बिसरना
व्यर्थ में ही मोल लेते ...........परेशानी
अरुण





बोधस्पर्शिका
*************
अस्तित्वाची विभागणी होत नसते
पण मनाला मात्र विभागणीनेच कळते
म्हणुनच त्याला
कुठे तरी दिवस तर..कुठे तरी रात्र दिसते
-अरुण

बोधस्पर्शिका
**************
मेंदू चे खाद्य आहे .......
खऱ्याखुऱ्या जाणवलेल्या संवेदना
मना चे खाद्य आहे ....
सोयीप्रमाणे रचलेल्या संकल्पना
-अरुण


































पेज ४० पर्यंत

प्राण भरून शीडेतून, वल्हव मन पीडेतून
आलाय रे मस्ती चा वारा
होडी चालली पाण्यावर .......

दरिया लाख मोलाचा, घाम करी सोन्या चा
नाते हा जन्माशी जोडी
लाट लाट जाय पुढे, जीव आता ऊंच उडे
माया जडे होडी वर वेडी

होडी चालली पाण्यावर
मन उडतय वाऱ्यावर
डोळे जडुनी ताऱ्यांवर – राहे
ऊंच ऊंच हिंडोळे, अधरावर लय डोले
लाटांवर स्वप्न धुंद वाहे वाहे वाहे वाहे
-अरुण

मराठी कविता – देव हरवला कुठे ......

देव शोधितो कशास वेड्या, देव हरवला कुठे
हरवला तूच जगातून इथे
१)
अपले तुपले घेणे देणे, किती कमवले किती गमवले
रात दिवस ही जडली पाठी, विवंचने ची भुते
देव हरवला कुठे .....
२)
नयन झोपले नयन जागले, अवधानाचे दार लोटले
जीवित क्षण निर्जीव त्यावरी स्मृती स्वप्नांची पुटे
देव हरवला कुठे ........
३)
पाऊस माती अंबर वारा, देव भेटतो सतत जिवाला
धर्म कर्म जप जाप साधिले, तरी न अंतर मिटे
देव हरवला कुठे .......
४)
गगन निळे ही धरती काळी, देहा पासुन नसे निराळी
अहंकार घर आंत बांधुनी, देहा पासुन तुटे

देव शोधितो कशास वेड्या, देव हरवला कुठे
हरवला तूच जगातून इथे
-अरुण

मराठी – प्रेम गीत
(माझ्या जुन्या गीतांपैकी एक)

थांब इथे जाऊ नको, मज अंतर देवू नको

चंद्रा करिता नभांत चांदण्या ही थांबल्या
काठा सह गीत गात लाटा ही रंगल्या
प्रीतीची बेला ही, तिज निराश ठेवू नको
थांब इथे जाऊ नको, मज अंतर देवू नको

हृदया च्या तारांवर सूर आज साधला
मिलनाच्या पदराला भाग्यरंग लाभला
भेटी ची हीच वेळ पुन्हा वाट पाहू नको
थांब इथे जाऊ नको, मज अंतर देवू नको

रात्रीचे राज्य इथे दिवस अजुन दूर उभा
हृदयांचे मंगल हे स्वप्नांची ही सभा
जाते मी जाते - हे बोल पुन्हा बोलू नको
थांब इथे जाऊ नको, मज अंतर देवू नको
-अरुण

रुबाई
*******
आसमां वक्त से हटते हुए........ ..देखा न कभी
हर सेहेर  बाद रात....सिलसिला बदला न कभी
कभी तूफान कभी मंद....... ..कभी ठहरा समीर
आसमां अपनी जगह रुक्कासा, खिसका न कभी
अरुण

बोधस्पर्शिका
*************
खऱ्या चे  कितीही गोडवे गाईले तरी खोटेच मनाला भावते
खोट्याने  काहीं ही साध्य होत नाही हे मनांत खोलवर ठसले  की मगच
मन खऱ्या च्या शोधात  धावते
-अरुण

बोधस्पर्शिका
***************
तहान असेल तर पाणी भेटेल, भूक असेल तर अन्न
ईश्वर न भेटे त्यांस .........जो केवळ शास्त्र -संपन्न
-अरुण

हिंदी और मराठी बोधस्पर्शिका
*****************************
चढ़ चक्के पर होत है ...दुनियाभर की सैर
जो चक्के में फँस गया उसकी ना कुई ख़ैर
--------------------------------------------
मन चाका सारखे गरगरत राहते
ध्यान अक्षल (axle) प्रमाणे स्थिर राहते
मनात गुंतला तो वाहून गेला
ध्यानात राहिला तो तरून गेला
-अरुण



































मराठी- प्रेमगीत
(माझ्या जुन्या गीतांपैकी)
१)
सजणा ! अपुली मान- मला तू, सजणा अपुली मान  
कधी कधी मी अशी एकटी
नदी तिरावर नदी सोबती
हृदय करून मोकळे तिला मी
करते अश्रु दान -  
सजणा ! अपुली मान- मला तू, सजणा अपुली मान
२)
नकोस ठेवू राग मनातुन
तुलाच स्मरते क्षणा क्षणातुन
स्वर प्रीतीचे तुझे न मिळता
सरेल जीवन-गान
सजणा ! अपुली मान- मला तू, सजणा अपुली मान
३)
घेरे मजला तिथेच वारा
जिथे खेळला नयन इशारा
स्मृती झोम्बुनी मला विचारी
कुठे तुझे ते प्राण

सजणा ! अपुली मान- मला तू, सजणा अपुली मान
-अरुण


मराठी लावणी
**************
घ्या ना विडा प्रीतीचा घ्या राया
(माझ्या जुन्या गीतांपैकी)

घ्या ना विडा प्रीतीचा घ्या राया
वैरी दुनिया ही समदी विसराया
१)
काळजाचे निवडले पानं
काथ इश्काचा पडला छानं
तापलेला जवानी चुना
भिजवली सुपारी मदनानं
आगवाणी लवंग जीभ जळवाया
घ्या ना विडा प्रीतीचा घ्या राया
२)
हातांचे तबक घ्या पुढे
खणखणले बांगडी चुडे
दाबा मिठ्ठी चा हा अडकिता
ताल उरातले धडधडे
लाल चुटटुक मन सारे रंगवाया
घ्या ना विडा प्रीतीचा घ्या राया
३)
पडु देवू नका कुठे डागं
समद्या गावात भडकेल आगं
तोंडो तोंडी बातं पसरलं
लोकं प्रीतीचा करतील रागं
लपवून प्रीती रस चघळाया
घ्या ना विडा प्रीतीचा घ्या राया
वैरी दुनिया ही समदी विसराया
-अरुण




मराठी  -भक्ती लावणी
*********************
दाटला जीवात माझ्या, एक प्रेमभाव रे
प्रीतीच्या तू देवता रे, पाव मला पाव रे
१)
देवळात मी प्रीती च्या लावली ही जीव-वात
शंख बोले घुंघरुत, झाला ढोलकी चा साथ
तुझ्या सावली साठी मी सोडीन हे गाव रे
प्रीतीच्या तू देवता रे ........
२)
प्रेम फासले अंगाला, ध्यान लावले प्रेमाचे
झाकल्या डोळ्यांना माझ्या स्वप्न दिसे मीलनाचे
सारे कांही विसरेन, नाही तुझे नाव रे
प्रीतीच्या तू देवता रे ........
३)
सांग केंव्हा खोलतो रे, दरवाज्या हृदयाचा
जीव पुढे टाकला मी, स्पर्श दे तुझ्या पायाचा
प्रेम केवळ प्रेम नाही, हाच भक्तीभाव रे
प्रीतीच्या तू देवता रे, पाव मला पाव रे
-अरुण

बोजड असले तरी....लिहावेसे वाटले
**********************************
अस्तित्वाला मीत्वा चा भ्रम होतो
मीत्वा ला होणाऱ्या सर्व जाणीवांत
भ्रम सक्रीयच राहतो
अस्तित्व जेवढे सावध राहील
मीत्व तेवढेच दुबळे होईल
अरुण

एक चिंतन गझल
******************
आकाश संकोचणे हा आघात आहे, आता
विव्हळत बसणे हाच प्रघात आहे

भ्रमाचा एक थेंबच ओघळला होता तेंव्हा
जीवन अख्खे अता भ्रम- प्रपात आहे

धुरात आगीच्या जो भुललो.. तो मी
आगीला विसरण्यात निष्णात आहे

सत्य भूमीवर पसरून आहे हा जो पसारा
असत्य त्या वरलेच रोप.. त्याचेच झाड आहे

'लयभारी' बोलतोय् हा आरोप खरा असला
तरी भारीपण जाण्यास ऐकणाराच जबाबदार आहे
अरुण

बोधस्पर्शिका
**************
अख्खे जगत अस्तित्व
नेहमीच आनंदात आहे
तुकड्यात उतरले की
फक्त संवादात आहे
अरुण

बोधस्पर्शिका
***************
शब्द जे दाखवत आहेत, ते बघायचे आहे
परंतु, शब्दांनाच बघत बसणारे अनेक आहेत
शब्द बोधदायी असतात... संचनीय नाहीत
-अरुण

हिंदी और मराठी बोधस्पर्शिका
*****************************
चढ़ चक्के पर होत है ...दुनियाभर की सैर
जो चक्के में फँस गया उसकी ना कुई ख़ैर
--------------------------------------------
मन चाका सारखे गरगरत राहते
ध्यान अक्षल (axle) प्रमाणे स्थिर राहते
मनात गुंतला तो वाहून गेला
ध्यानात राहिला तो तरून गेला
-------------------------------------------
-अरुण

बोधस्पर्शिका
*****************
कांही डोळ्यां समोर असल्याने दिसते
तर कांही डोळ्यां पासुन लपते
दिसत नसणाऱ्या चे ही भान, ज्यांना
त्यानांच 'पूर्ण' उमजते
अरुण

बोधस्पर्शिका
*************
पूर्व दिशा कोणती दिसल्यावरच
पश्चिम कोणती हे ठरते -
दोन गोष्टी विरुद्ध दिसल्या तरी मुळात
त्या एकाचीच दोन टोके असतात
-अरुण








बोधस्पर्शिका
****************
अबोध बालकांच्या प्रश्नांना
बोधदायी उत्तरे हवी,
ज्ञानदायी उत्तरे देऊन आपण
आपले अज्ञान झाकतो आणि
त्यांच्यातली निरागसता संपवतो
-अरुण

बोधस्पर्शिका
**************
सकाळच्या वर्तमान-पत्रांचा गठ्ठा
सायंकाळी रद्दीत दिसतो
माणूस मात्र वर्तमानाला उसवून
कालचीच बात उगाळत बसतो
-अरुण

बोधस्पर्शिका
*************
माणुस अंधारात वाट चाचपतो
आणि उजेडात गोंधळतो की ....ही वाट पकडावी की ती?
स्वत: प्रकाशला की वाटच बनतो...
मग चाचपणे ही नाही अन् गोंधळणे ही नाही
अरुण

बोधस्पर्शिका
**************
कांही ही बघा, केंव्हा ही बघा
बघणारा लागतो
बघणारा नाही.. तरी ही ही बघणे,
या साठी
'मी' विरून जावा लागतो
अरुण

बोधस्पर्शिका
**************
मानसशास्त्र अर्ध-जागृत लोकांचे
मनो विकार दूर करते
बोध-स्पर्श  (अंतर्ज्ञान)-
माणसाला खाडकन पूर्ण जागा करते
अरुण




बोधस्पर्शिका
*************
घेतलेला अनुभव
शब्दातुन सांगितला तरी
ते शब्द वाचुन वा ऐकुन
अनुभव घेता येत नाही
अरुण

बोधस्पर्शिका
**************
असत्या ला सत्य उमजणे शक्य नाही
तर सत्या ला विकृत किंवा असत्य होता येत नाही
तरी ही संस्कारित किंवा कृत्रिम माणूस
सत्या चा शोध घेतोय्.. आणि
सत्याला व्यवहारात (असत्यात) आणू पाहतोय्
अरुण

बोधस्पर्शिका
*************
शून्य झाला त्याला
संख्यां चा होतो अनुभव
जो जाणतो केवळ संख्या
त्याला शून्याचा फक्त अनुमान
अरुण

मराठी-उर्दू - मिश्र शायरी
************************
जीतेजी खुदची मौत बघणे किती बामुश्कील
धावती गाडी, तिचे चाक बदलणे जैसे
-अरुण

जीतेजी खुदची मौत बघणे किती बामुश्कील = दुनियादारीत वावरत असता अहंकार निष्क्रिय होणे किती कठीण
धावत्या गाडीचे चाक बदलण्या सारखे आहे हे.

बोधस्पर्शिका
*************
विचार कधीच थांबत नाहीत
गतिमान असतात.
अशा न थांबणाऱ्या विचारांतुनच...
विचारक वेगळा असल्याचा भास होतो.
अरुण






बोधस्पर्शिका
*************
असत्य पूर्णत: ओळखणे
माणसा ला शक्य आहे
परंतु सत्य उमजणे
माणसा च्या हातात नाही
अरुण

बोधस्पर्शिका
**************
'मी' ला  जे वाटते
तसेच घडवू शकण्याचे स्वातंत्र्य
प्रत्येकाला हवे आहे.
परंतु 'मी' कोण आणि त्याला अत्ता
अमुकच घडावे असे कां वाटते आहे ?....हे स्पष्टपणे बघू शकण्याचे स्वातंत्र्य ....
आपल्या कडे नाही... हे ज्याला दिसुन आले, तोच अंतर शोधास प्रेरित होतो
- अरुण

बोधस्पर्शिका
***************
जे बालका प्रमाणे
अबोध-अजाण मना चे असतात
कोणी किती दुखावले तरी दुखावत नाहीत
जे ताठर व मतलबी मनाने जगत असतात,
कधी कोण दुखावेल.. या भीतीतुन
मुक्त राहत नाहीत
अरुण
दोहा
-----
माटी कभी न टूटती, घट माटी का टूट
जो माटी बनकर रहे, टूट सके ना फूट
अरुण

बोधस्पर्शिका
***************
नीतिमत्तावाद्यांनी जर
जग निर्मिले असते तर
गुलाबाला काटे नसते
आणि कमळ
शुद्ध निर्मल पाण्यातच
उगवले असते
-अरुण


बोधस्पर्शिका
**************
विचारलेला प्रश्न आणि येणारे उत्तर
या मधे लोपणाऱ्या काळा चे
दुसरे नांव आहे........विचार
अरुण


बोधस्पर्शिका
**************
इच्छा म्हणजे अभाव
अभाव म्हणजे असमाधान
या उलट
संतोष म्हणजे निरिच्छता
म्हणजेच तृप्ति......असेच
परम समाधान म्हणजे समाधि
अरुण

दोन मराठी शेर
****************
मी बदलतो सतत अपले पिंजरे
मुक्तता फसवी कधी सरणार नाही
------------------
बावटे पाहून दुबळ्यांच्या करी
वाघ वखवखला कधी पळणार नाही
अरुण
बोधस्पर्शिका
***************
वाऱ्यावर काढीतो
वाऱ्याच्याच रेषा
संसार ह्या रेषांचाच तमाशा
अरुण
बोधस्पर्शिका
**************
सुखकर इच्छा... जी पूर्ण होण्या सारखी नाही, तिला
विश्वास रुपाने मनांत बाळगून, माणूस खोटे समाधान मानून घेतो.
'देव' ही....अशीच एक इच्छा आहे.

पेज ३० पर्यंत

बोधस्पर्शिका
**************
फ्लायओव्हर वरुन जाणे.....
म्हणजे गल्ल्या-बोळी-गर्दी चुकवत पोहचणे
इकडून तिकडे
तसेच अवधानात.... वावरत असताना
जाळे विचारांचे...... न पकडे
अरुण


बोधस्पर्शिका
*************
विचारात हजर होणे
म्हणजे अस्तित्वाचा विसर पडणे
अस्तितवात रमणे म्हणजे
विचारांच्या पकडीतुन बाहेर पडणे
अरुण

बोधस्पर्शिका
*************
मृत्यु ही उत्सवी
-------------------
गर्द दाट जंगलात झाडे अचानक कोसळतात किंवा सरून
देह खाली ठेवतात तेंव्हा...
कोणी ही त्यांच्यासाठी रडत नसतं... कारण ..
यामुळे निसर्ग न कांही गमवतो न कांही वेगळे घडते
त्याच्यासाठी

ठेपाळलेल्या झाडां चा कण न् कण
मातीत मिसळतो..... आणि एक वेगळाच गंध
फुलवतो ......आणि जामुळे आसमंत....
प्रत्त्येक नव्या क्षणात नव्याने जिवंत होत राहतो......
जंगलात मृत्युही उत्सवी ठरतो
अरुणख
बोधस्पर्शिका
***************
सुबह ओंघता सोये वो तो, रात में दिन का मान धरे
पत्थर में हैं प्राण, न देखे, प्राण रचे......सम्मान करे
अरुण
----------
दिवसाची 'जाग' न बघतां...झोपत राहणारा
रात्रीलाच दिवस समजुन ......जागत राहतो
दगडात ही प्राण आहेत.. ......हे न बघणारा
दगडाला कोरुन....... ..त्याला पूजत राहतो
- अरुण
बोधस्पर्शिका
************
सत्य हा शोधाचा विषय
फक्त असत्यासाठीच
सत्याला शोधायचे नसते
कांहीच
अरुण



बोधस्पर्शिका
************
एकदा कुणी सत्य खुणवुन दाविले
बस ......खुणांना सर्व पूजत राहिले
अरुण

बोधस्पर्शिका
****************
अखिल मानवा च्या सुख दुःखावर
होणारी गहन विचारणा... म्हणजेच चिंतन
फक्त वैयक्तिक सुख दुःखा च्या भोवती
चालणारा विचार ..... म्हणजे चिंता
अरुण

बोधस्पर्शिका
*************
हे विचित्र नाही का ? की
तोकडे, तुरळक संकुचित मन
शोधत राही
सुख... शांति..... अमन
अरुण

बोधस्पर्शिका
*************
माणसातली गुलामीच त्याला
मुक्ती साठी
एखाद्या गुरू चा शोध
घ्यायला लावते
आणि त्याला बंधनातच ठेवते
अरुण

बोधस्पर्शिका
*************
स्पष्ट दृष्टी आणि विवेक... मिसळले की
प्रेम फळते
स्वार्थ दृष्टी अन् बुद्धी.... भेटली की
कपट घडते
अरुण
बोधस्पर्शिका
*************
आरसा कधी पण त्यांत पडणाऱ्या प्रतिबिंबाना
बघत नसतो
मी मात्र आंतल्या.... प्रतिमांशीच
खेळत असतो
अरुण


बोधस्पर्शिका
**************
कांहीच स्थिर नाही इथे ......
धावत्या नदी सवेच धावतो किनारा
श्वांस घाट.. तरी करतो प्रवास
अन् जीवन क्षणधारा
अरुण
बोधस्पर्शिका
*************
शिजल्या शिवाय ...तांदुळ
तो भात होत नाही
पिकल्या शिवाय ..... शिष्यत्व
त्याला गुरू भेटत नाही
अरुण
बोधस्पर्शिका
************
आपण मनाने जागतो
मनावर जागत नाही
स्वप्न बघतो
स्वप्नाला बघत नाही
अरुण
बोधस्पर्शिका
*************
हजार गोष्टी एकत्र येतात
अन् ती एकच वस्तु आहे ....असे भासवतात
माणूस सुद्धा अनेक अनेक गोष्टीं चे
एकवटलेले रूप आहे
अरुण

बोधस्पर्शिका
************
सर्वात जास्त लवचिक काय?......
तर ती असते कल्पना.....
तिला एखाद्या बी पेक्षा ही लहान
आणि एखाद्या विशाल वृक्षाहुन ही विशाल
सहज करता येते
एकदाका विचारात शिरली की
की तिला घालवता येत नाही
अरुण

बोधस्पर्शिका
************
गुंत्यात गुंतलेला
गुंता सोडवू शकणार नाही
गुंतेपण स्पष्ट दिसले नाही तर
गुंत्या बाहेर येता येणार नाही
अरुण
बोधस्पर्शिका
**************
'मी हिंदू' किंवा 'मी मुस्लिम'
ही माणसाची ओळख नव्हे
तो कोणात्या गर्दीत राहत आला
त्याचा हा इतिहास आहे
अरुण
बोधस्पर्शिका
************
माझी आई, माझे बाबा
माझे अंगण, माझा खेळ......
असे म्हणणारे बालक मोठे झाले की
माझा धर्म.. माझी जात, माझा देश...
असलेच काहीतरी बडबडायला लागते
अरुण
बोधस्पर्शिका
*************
हे खरे नाही का की ?.......
समोर चा माणुस किंवा घटना डोळ्यांना जशी दिसते
आपण त्या प्रमाणे वागत नसतो.....
माणुस किंवा घटना मनाला जशी वाटते
त्या अनुसारच आपण तिच्याशी वागतो
अरुण
बोधस्पर्शिका
**************
पाणी पिण्याचे सुख
तहानेलाच कळते
म्हणुनच कदाचित
तहान लागते
अरुण
बोधस्पर्शिका
************
देव असेल... नसेल
सांगता येत नाही
'मी' नाही
हे मात्र निश्चित
अरुण





बोधस्पर्शिका
*************
एका स्पष्ट-गहन दृष्टीक्षेपात होते
सत्य-दर्शन .....
तुकड्या तुकड्या नी घडते
अध्ययन
ज्यांना हे ही कठीण ते करतात
पारायण
ज्यांना यात ही रस नाही
ते करतात फक्त सत्या बद्दल च्या
रुचि चे प्रदर्शन
-अरुण

बोधस्पर्शिका
***************
डोळ्यांनी आपण बघतो ....ऐकत नाही
कानांनी ऐकतो.................बघत नाही
मग ह्रदयाचे  जे काम तिथे
बुद्धी ला कां घुसवायचे ?
-अरुण

बोधस्पर्शिका
*************
जो आपला असतो
त्याच्याशी मोह जडतो..की
ज्याच्याशी मोह जडतो
तो आपला वाटतो ?
अरुण

बोधस्पर्शिका
************
मना च्या अभिव्यक्तीस रोखून धरणे
म्हणजे मौन नाही
अ-मन होणे म्हणजेच मौन
-अरुण











एकदा गझल करण्या चे ठरवले मी
********************************
एकदा गझल करण्या चे ठरवले मी
छान छान काफिये....... मिरवले मी

आशयाचे काय?  कोणास कळतो?
काफियांशीच .....संधान जुळवले मी

पकडली  लय घट्ट गझले ची अन्
लयीलाच..........खोल रुजवले मी

व्याकरण म्हणजेच गझल हे समज़ुन
आशया चे .......भान गमवले मी

'बडे बडे' असेच  पण रिवाज म्हणुन
त्यांचेही मुशायरे........पचवले  मी

अरुण

बोधस्पर्शिका
**************
बालमुखातुन सत्य बाहेर पड़ते,
संस्कार त्याला लपवण्याचे काम करतात
अरुण

बोधस्पर्शिका
************
परिश्रमा नंतर आराम
आणि आरामा नंतर परिश्रम...
गोड वाटतात
अन्यथा दोन्ही ही कंटाळवाणेच
अरुण
बोधस्पर्शिका
*************
"एकच वस्तु, प्रसंग किंवा घटने चे स्वरूप
वेगवेगळ्या जागुन वेगवेगळे दिसत असते" ....
हे नीट जाणून घेत जर दुसऱ्या चे मत ऐकले
तर ते मत अगदीच चुकीचे आहे असे वाटत नाही
अरुण







बोधस्पर्शिका
**************
फक्त एकच श्वासाचे
अंतर पार करतो
आणि प्राणी....
होत्याचा नव्हता होतो
अरुण

बोधस्पर्शिका
*************
जर सावली पडली असेल तर......
ती गेल्या शिवाय भूमि उजळ होणार कशी ?
अन् ती सावली बघणाऱ्याचीच पडत असेल तर
बघणारा ती मिटविणार कशी ?
अरुण

बोधस्पर्शिका
**************
एकच कल्पना किंवा स्वप्न
वारंवार सुचत किंवा बघत राहिल्याने,
ती कल्पना (स्वप्न) वास्तव वाटयला लागते आणि
तिच्यावर विश्वास जडतो
अरुण

सहजच...
***********
समुहात राहुन संवादक्षम जीवन जगणे
सोयीचे व सुरक्षित व्हावे
म्हणुनच कदाचित....
मानव शरीरात मन उद्भवले आणि मग पुढे....मनातल्या
'स्मृती-स्वप्न' सुविधेचे प्रमाण बिघडल्यामुळे मनाचे
'सुखावणे- दुखावणे'
सुरू झाले असावे
अरुण
बोधस्पर्शिका
*************
प्रत्येक सोयी चा वापर जर बेसावधपणे झाला तर
ती मोठी गैरसोय होऊन बसते.....
गाफिल राहुन स्मृती चा वापर होत असल्यानेच
जीवन संभ्रमित होताना दिसते
अरुण




बोधस्पर्शिका
*************
धावत्या वाऱ्या ने
नदीच्या पाण्यात तरंग उठतात.
माणसाचे प्रयत्न तरंग थांबवू लागले तर तरंग अधिकच गतिशील होतील.
असेच, मनाची शांतता ही माणसाच्या नियंत्रणात नाही.
वारा थांबला की तरंग थांबतात. तसेच 'मी' विसावला
तरच मन विसावणार
अरुण

बोधस्पर्शिका
*************
भुईवर आदळताच
चेंडू उंच उसळतो.....
माणसाचे सर्व उच्च आदर्श
वरवरच झेलले जातात
आणि अखेर भुईवर येऊन आपटतात
अरुण
बोधस्पर्शिका (मराठी)
*******************
ध्यान व भान
-----------------
आहे त्या जागी व आहे त्या क्षणावरच
ध्यान स्थिरावलेले बरे
तसेच भविष्याचे व गतकालाचे भान असणे,
केंव्हाही जगण्यास सोयीचे
थोडक्यात-
दूरदृष्टी हवी...... दूरचिंता नको
गताचे भान हवे.....केवळ संदर्भा साठी,
चघळत राहण्यासाठी नको
अरुण

बोधस्पर्शिका
**************
केंद्रीत व अकेंद्रीत नजर
--------------------------
ज्याला कांही घडवायचे आहे
तो आपल्या कृती कडे  लक्ष केंद्रीत करतो
ज्याला स्वत: सकट सर्वत्राची घडण...
होताना बघायची आहे.
त्याची नजर एकाच वेळी सर्वत्र असते
- अरुण



बोधस्पर्शिका
**************
जन्माच्या वेळी प्रत्येक जण असतो
सकल, निनावी, पूर्ण, समाधानी....
पण ओळख मिळताच तो होतो
वेगळा....परिचित...आंशिक, अतृप्त....
अरुण

आज लिखे गये शेर (हिंदी)
*********************
नज़र के दायरे में ...जो भी आते एक हैं
नज़र गर आसमां हो, रात दिन सब एक हैं

मंझधार तक  पहुंचकर स्वयं को भूल जाना
आसां नही है ............खुदा से रूबरू होना

हर कोई आइने के सामने, हटना नही चाहता
जहाँ भी जाता उसे .......साथ साथ ले जाता

एहसास के जर्रों पे तजुर्बों की जमी धूल
जिंदगी.. खिदमत-ए- माज़ी में ही मश्गूल
 - अरुण

बोधस्पर्शिका
***************
खरे तर ज्याच्याशी संपर्क तुटतो
तो गेल्यातच जमा असतो
तरीही मृत्यू मुळे जो दुरावतो
त्याचा वियोग असहनीय होतो
-अरुण


















बोधस्पर्शिका  आणि हिंदी शेर
****************************
बोधस्पर्शिका
---------------
इच्छा..... ही ऊर्जेला सक्रीय
करणारी प्रेरणा असुन
ती सर्वांचे हित साधते की अहित
हे इच्छे च्या स्वरूपा वर अवलंबुन आहे.
उपाशी पोटाची भूक आणि अप्पलपोट्याची भूक
सारखी नाही
--------------

बोधस्पर्शिका
*************
एकच चित्र...त्यात
एकदा हरण चालतय् असे दिसते....तर
एकदा  शिकारी दिसतोय
आणि म्हणुनच तिथे त्या चित्रा कडे बघताना
शिकारी आणि हरण
वेग वेगळे आहेत....असा भ्रम तयार होतो
अरुण
आज पासुन लिखाण एक वेगळ्या तऱ्हेने
सादर करत आहे
-----------------------------------------


हिंदी शेर आणि मराठीतून त्याचा बोधस्पर्श
**************************************
किसीपर तो भरोसा करना होगा
अब जो घर से आ गया हूँ निकलकर
------
मराठी बोधस्पर्श
**************
'वेगळेपण' उद्भवले आणि माणूस नेहमी करता असुरक्षा भावाने ग्रासला गेला. अता कुणावर तरी श्रद्धा ठेवणे भाग आहे
++++++++++++++++++++++++++++++++++++

एक ग़लती की वजह से इतनी सारी जहमतें
बूँद ने अपने को सागर से अलहिदा कर लिया
-------
मराठी बोधस्पर्श
**************
चूक ही ....की माणूस स्वत:चे सृष्टीरूप न बघता आपले  स्वतंत्र व्यक्तीरूप बघतो, आणि या भ्रमामुळेच अनेक संघर्ष व विंवचनांना तोंड द्यावे लागत आहे.
अरुण


हिंदी शेर आणि मराठीतून  त्याचा बोधस्पर्श
**************************************
दूर की शुरुवात होती अपने घर से ही, मगर
घर को तो देखा नही ब्रह्मांड की बातें करें
-----
मराठी बोधस्पर्श
**************
आपले स्वरूप काय हे न बघताच परमअवस्था, ब्रह्मचैतन्य आणि अशाच कल्पनांच्या मागे धावणे शुद्ध नादानी आहे
++++++++++++++++++++++++++++++++++++

बिना तोड़े दिवारों को मिले मुक्ती, वही  मुक्ती
"दिवारें तोड़ने का ख़्याल" भी दीवार ही तो है
-------
मराठी बोधस्पर्श
**************
मानसिक बंधनांतुन मुक्त होणे म्हणजे कैदेतून मुक्त होण्या सारखे नाही...भिंती ओलांडून किंवा तोडून बाहेर पडणे नाही. हे बंधन अदृश्य असते, मन व विचारांनी निर्मिलेले असते. मुक्तीचा विचार देखील बंधन कारकच ठरतो. जागेपणा च्या ज्ञान प्रकाशातच अशी अज्ञान-बंधने विरतात
अरुण

मराठी होडी गीत

होडी चालली पाण्यावर
मन उडतय वाऱ्यावर
डोळे जडुनी ताऱ्यांवर – राहे
ऊंच ऊंच हिंडोळे, अधरावर लय डोले
लाटांवर स्वप्न धुंद वाहे वाहे वाहे वाहे

दरियातली प्राणांच्या, दरियावर किरणांच्या
चकाकल्या चांदेरी माळा
नभ दुधाळ रांगोळी, सागरात काळी निळी
क्षितिजाचा रंग नव निराळा
होडी चालली पाण्यावर ................  

पाण्याच्या मिठीतुनी, गगन त्यात बुडुनी रमी
बोलऽवितो दूसरा किनारा

Monday, 13 April 2015

बोधस्पर्शिका व इतर १४ एप्रिल २०१५

बोधस्पर्शिका
*************
समुद्रात तरंगणाऱ्याला
डबक्यात.. संकुचीत बनणे भाग आहे
अनंतात असणाऱ्याचे
प्रपंचात...........तुच्छ होणे भाग आहे
- अरुण

बोधस्पर्शिका
**************
मृत्यु ला झाकण्याच्या च्या नादात
जीवना कडे बघणेच राहते
क्षण क्षण जीवनातला दिसत असता
क्षण क्षण मृत्युशी भेट होते
- अरुण
बोधस्पर्शिका
************
जे नसते पण ध्यानात भरते
ते असत्य
जे असते पण ध्यानी येत नाही
ते सत्य
- अरुण
बोधस्पर्शिका
************
नाणे बघा ! ...छापा आणि काटा
दोन विरुद्ध बाजूंना दिसतात
नाण्यात शिरून  बघा !.....
दोघे एकमेंकास चिकटून असतात
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
स्वप्नातुन जागायचय्
मला...
हा विचार लगेच
स्वप्न बनला
- अरुण
बोधस्पर्शिका
************
देवळात असतो
तेंव्हा प्रपंच सुचतो
प्रपंचात असतो
तेंव्हा देव आठवतो
- अरुण

बोधस्पर्शिका
*************
'मनावर असावे नियंत्रण' -
ही बात फसवी
नियंत्रक म्हणजे मनं च
मन मनास न उसवी
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
जे उजेडात असतं.. दिसतं
अंधारात असणारं....लपतं
अवधानाला उजेड व अंधार
दोन्हींचं...........भान असतं
- अरुण
बोधस्पर्शिका
************
छाया दिसते पण स्पर्शत नाही
अर्थ उमजतो ....पण असत नाही
अर्था संगे अर्थच बोलतो, पण
शब्द उमटल्या शिवाय राहत नाही
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
बुद्धीला सारखेच काही
हवे असते
प्रबुद्धा ला ह्या हव्यासाचे
कारण दिसत असते
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
विचार चालतात
अन् बोलतात
"बोलणारा आहे कोणी"
असा भ्रम पेरतात
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
झाडाचे मूळ
अंधारात पसरते
माये च्या पसाऱ्याला
अज्ञानच लागते
- अरुण


बोधस्पर्शिका
**************
माणसांनी देवाला
माणूस बनवला आणि मग
देव पण... दुसऱ्या देवांशी
भांडायला लागला
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
हे हवे... ते नको
म्हणत असे तो प्रपंच
जे आहे तेच माझे
मानतो तो संत
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
काळ मनांत आडवा चालतो
भुता कडून भविष्या कडे
ह्रदयात फक्त उभा ठाकतो
आपल्या वर्तमान स्वरूपात
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
आपण ....देहा चे वाहन (म्हणजे व्हाणा)
बाहेर काढुन
देवळात जातो
पण मना चे वाहन (अहंकार) बाहेर ठेवून जाणाऱ्यालाच
बहुदा देव भेटतो
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
'माझाच धर्म तो धर्म'- असा दावा करतो
तो धार्मिक नसतो
तो ....धर्म विकायला निघालेला केवळ
एक  धर्म- विक्रेता असतो
- अरुण










बोधस्पर्शिका
************
बालक अजाण.....
जाणत जाणत मोठे होते
जाणकार अन् वयस्क होते
परंतु त्यालाच सुजाण म्हणावे
जो स्वत: ची सर्व जाण (ज्ञान) पचवून
परत बालका सारखाच अजाण होतो
- अरुण
बोधस्पर्शिका
************
जाळ्यातुन मुक्त होणे म्हणजे
मुक्ती नाही
मुक्ती म्हणजे जेंव्हा कुठलेच जाळे
विणले जात नाही
- अरुण
बोधस्पर्शिका
**************
आशयाची सावली पडता
शब्दाचा आशय होतो
अस्तित्वात नसतां ही
आशय अस्तित्व होतो
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
माणूस जाणता झाला की
बालपणातील 'बाबाजी' पळून जातात
तत्वज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या की
सावल्या भयाच्या गळून जातात
- अरुण



मराठी एक छोटी ताजी गझल
****************************
जे मिळे खातो.... पचविण्या बंध नाही
फिकिर करणे हा मनाचा.. ...छंद नाही

आसवे आली..... न आल्या सारखी
वितळणे हा वेदनेचा............ढंग नाही

ऐकतो तो  सत्य... उघडे ह्रदय ठेवुन
'मी मला माझे' ..अशातुन... ..दंग नाही

तो असे विश्रांत कधि विक्राळ गहिरा
सागराला एक निश्चित..........रंग नाही

बंद असता.. रात...उठते.. दिवस दिसतो
पापणी... दोन्ही कडे...........पाबंद नाही

आपली पोस्टून .....दुसऱ्या ब्लाॅक करणे
फेसबूकी .......हा खरा ......अनुबंध नाही

अरुण
बोधस्पर्शिका
**************
शिखर आणि दरी
नेहमीच दोघांत मेळ आहे
विरोध बघणे दोघांत
हा बुद्धी चा खेळ आहे
अरुण
एक गझल
************
तुझे ते बंद ओठांतील हसणे.... .वाटले पूरे
तुझे कुरवाळणे खोटे..तरी गणले.. खरे पूरे

बघितले तू किती जीवित जिवांना जीव लावोनी
कुणी नाही खऱ्या संवेदनेला........जागले पूरे

तसा व्यवहार देण्या आणि घेण्याचा कधी चुकला?
जिवा ला जीव त्यजले पण मनाने... भोगले पूरे

तुझा तू दाम घेते, मी तुला बदनाम कां जाणू ?
खुळ्या नात्यातही तू श्वांस भरले... सोसले पूरे

इथे ही प्रीती ला व्यवहार आहे रीति नावाचा
खरे आहेत ते ज्यांना..... गणित हे साधले पूरे
- अरुण

बोधस्पर्शिका
************
अापले 'तुणतुणे' वाजवत असता
इतरांची दखल घेत वाजवणे म्हणजेच .........हार्मोनी
अन्यथा जीवन-लय बनते .............शुद्ध कंटाळवाणी
अरुण






एक विद्रोही गझल
******************
टाकलेल्या माणसांना ..परत द्या त्यांचा मुकाम
अजुन ही पिंजऱ्यात आहे, हा गुलामांचा गुलाम

बांधुनी माझाच जबडा...... ..वेढले माझेच आंग
अन् दिला माझ्याच हाती, अवळण्यासाठी लगाम

आहुती ह्या कातड्यांची........यज्ञ त्यांच्या मंडपी
याज्ञिकांचे पाय धरुनी ....... मुक्त झाले ते हराम

दान- भिक्षेचे पुराणे राजकारण........... संपले
संपले आता तुम्हाला जी हुजूरी चे ......... सलाम

हे बरे!! आकाश तुम्ही..... घेतले नाही विकत
सूर्य अमुच्या वाटणी चा... जाहला असता निलाम

- अरुण
 बोधस्पर्शिका
**************
स्मृतीत ला अंतर संवाद
म्हणजे 'मी' ची उत्पत्ती
'मी' कडून होणारा संवाद
म्हणजे नवीन स्मृती
- अरुण

जुन्या पैटर्न ची गझल
*********************
छंद व्यवहारी उरी लागून गेला
देव-घेवा चे गुन्हे ..घडवून  गेला

कोण ऐसा निपुण जगती पादचारी
खाच खळगे नेमके चुकवून गेला ?

गर्द काळोखात ही होता भरोसा
चोर आला... काजवे चोरून गेला

मी प्रवासी.. आसवे भरल्या खिशाला
एक ही ऐसा न जो ...कापून गेला

ते निळे आकाश माझे अन् तुझे ही
ही इथे धरणी ........मनू भेदून गेला
अरुण    '




बोधस्पर्शिका
*************
आपण सर्व केवळ एक प्रतिबिंब.....
आपणांस  सदोदित एकच भीती
आरसा फुटला की...मग
काय आपली गति ?
अरुण

बोधस्पर्शिका
***************
माणूस इच्छे च्या पूर्तते साठी
साधने शोधतो
देव पण त्यानी...
असाच शोधला आहे
- अरुण
बोधस्पर्शिका
***************
वर्तमानाचेच नाव काळ
स्मृतीने झाकला जात असतो तेंव्हा
भूत.......
आणि स्वप्नाने अंदाजला जात असतो तेंव्हा
भविष्य........
- अरुण

बोधस्पर्शिका
************
एकाचीच ही दोन नांवे
जीवन आणि मरण
फिरणारे चाक त्यात कुठे
सुरवात आणि कुठे सरण?
- अरुण
सरण = शेवट

बोधस्पर्शिका
************
प्रार्थनेने...देवा चे मन
बदलत नसते
जो करतो प्रार्थना....
त्याचेच मन बदलते
अरुण




बोधस्पर्शिका
*************
दिला चे म्हणणे... ..ऐकणे कधी जमले नाही
कोण काय म्हणतोय् ...यातच मन रमले राही
- अरुण
बोधस्पर्शिका
**************
कोणी नाही नियंत्रक.......... या सृष्टीचा
सृष्टी.... कण कण, क्षण क्षण
नियंत्रणातच अाहे
- अरुण

बोधस्पर्शिका
*************
अपेक्षा करणे...जे अपेक्षित आहे त्याची,
नवे नाही
जे माहीतच नाही... त्याचा शोध घेणे...
हे वेगळेच
- अरुण

बोधस्पर्शिका
**************
न जाणल्याने काही होते, न मानल्याने
न मिळवल्याने, न गमवल्याने......
होते.....फक्त जे आहे तेच
ह्रदयाला नीट उमजल्याने
अरुण

बोधस्पर्शिका
**************
डोळ्यांना चलचित्र बघतेवेळी
वेगवेगळी चित्रे दिसतात
परंतु मेंदूला त्यांचे वेगळेपण आकलित न झाल्याने
सलगता भ्रमित होते आणि
त्यातुन एक कथा जन्म पावते
अशाच तर्हेने
प्रत्येक क्षणाची वेग वेगळी स्मृती....जोडली गेल्यामुळे
अहंकाराचे मायावी अस्तित्व जन्माला येते
- अरुण







बोधस्पर्शिका
*************
मनाला होतो तो ......अनुभव
देह-मन-ह्रदय-पर्यावधान....
यांना साकल्याने जो होतो तो
उद्-भव
अरुण
बोधस्पर्शिका
************
'लक्ष जाणे' आणि 'लक्षात येणे'...
दोन्हींत आशय  समान दिसले.. तरी समान नाहीत
पहिली कर्ताभाव युक्त क्रिया आहे तर
दुसरी... अपसुक अचानक घडणारी घटना.
सत्या कडे कुठल्याही कर्त्याचे लक्ष जात नाही
जिथे कर्ताभाव नसतो तिथेच
सत्य लक्षात येते
अरुण

बोधस्पर्शिका
*************
देशावर प्रेम...
हा असतो
एक ............सहज साधा भाव
त्याला राष्ट्रवादाचे नाव दिले
की तो बनतो एक राजकारणी डाव
अरुण

बोधस्पर्शिका
*************
मनांत भेद किंवा विभागणी
सर्व संघर्षांची जननी
भेदभाव विरला की मग गावी लागणार नाहीत
एकते ची गाणी
अरुण
बोधस्पर्शिका
*************
ह्या जन्म अपुरा राहतोय...
ही भीती
'पुनर्जन्म' .......शोधून काढ़ते
उरले... ते न जगत राहता
सरले....त्यालात उगाळत राहते
अरुण



बोधस्पर्शिका
************
विचारातुनच विचार उगवतायेत ....
पण वाटते असे की जणु
कोणीतरी आंत... त्यांना चालवताय्
अरुण
बोधस्पर्शिका
**************
"काल होतो.. आज आहे.... उद्या राहीन"
ह्या भ्रमाच्या मागोमागच...."कांही तरी होईन" ...
हा इच्छा-भ्रम ही धावून येतो
आणि मग..सारा आशय... जगण्याचा
भ्रममय होतो
अरुण

सहजच.....
स्मृतींचे गाणे केले .स्वप्नांचे  फुटाणे केले
नव नवीन क्षणांना .....गोठवून पुराणे केले
अरुण

बोधस्पर्शिका
*************
गत विगत.... संपत नाही
आणि म्हणुन हा  'आज'
'काल' आणि 'उद्या' तच
जगत राही
अरुण
बोधस्पर्शिका
**************
माणुस शहाणा असावा
पण त्यात शहाणपणाचा दर्प नसावा
जगण्यासाठी 'मी' लागतोच
पण त्यात 'मी'पणा चा अर्क नसावा
- अरुण

Sunday, 22 February 2015

बोधस्पर्शिका २३ फेब्रुवारी २०१५

बोधस्पर्शिका
************
एकवेळ.... बाहेर चे तोफ गोळे
जमीनीत पुरता येतील
पण  उपयोग काय?...जर
मनांत तलवारी चालत राहतील
- अरुण
बोधस्पर्शिका
************
आई वडिलांनी 'वळण' लावले
'सरळ'  काय?- ते कळलेच नाही
वळ वळणांचे दुखतायेत तरी
सरळ होणे जमलेच नाही
- अरुण

बोधस्पर्शिका
*************
मासा कसे स्वीकारणार पाणी ?
स्वीकारलाय् पाण्यानेच त्याला
धर्म म्हणजे माणसाचे प्राण
माणुस काय स्वीकारणार त्याला ?
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
शब्दात उतरवलेला अनुभव
शब्दात भेटत नाही
'पोहावे कसे' - हे पुस्तक वाचुन
पोहणे जमत नाही
- अरुण
बोधस्पर्शिका
************
शांत व्हावे चित्त म्हणुन
देवळात शिरतो
घोष करीत घंटा बडवीत
देवालाच पिडतो
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
हरवला आंतल्या
दाट अंधारात
पण शोधतो आहे
बाहेर च्या लख्ख उजेडात
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
काठावर बसुन जपजाप केल्याने
प्रवाह पाण्याचा कळत नाही
जो नदीत उतरला.. तो
जपजाप करत बसत नाही
- अरुण
बोधस्पर्शिका
************
अनुभवाला गाळून
प्यायचं नसतं
माहीतीला तपासून
घ्यायचं असतं
- अरुण

बोधस्पर्शिका
*************
अंधार मिटवण्याचे दोन प्रकार-
दिवा पेटवा
किंवा
प्रकाशा ला द्या वाट
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
सृष्टी ही एकच एक
त्यात नाही वजा-बाकी
तरीही माणसाला
संपण्याची भीती
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
आकाशात उडणारे पक्षी
धरणीच्याच पकडीत असतात
मनाला लागलेले मुक्ती चे वेध
मनापासून वेगळे नसतात
- अरुण
बोधस्पर्शिका
************
माळ दिव्यांची ...
एक दिवा विझतो
अन् लगेचत पुढचा पेटतो
यामुळे माळेत सातत्य व वेग भासतो
- अरुण

Tuesday, 10 February 2015

बोधस्पर्शिका February 11

बोधस्पर्शिका
*************
शब्दाला व्यक्त होण्यास
शब्द लागतो
निशब्दाच्या अभिव्यक्तीत
शब्द खुंटतो
- अरुण




बोधस्पर्शिका
*************
बुद्धी केवळ एक यंत्र जगण्याचे
संकटे घडवत आहे
साधन साधन राहिले नसून
'बाधन' बनत आहे
अरुण
बोधस्पर्शिका
**************
संग्रह करणे धर्म ज्याचा
त्याला म्हणतात मन
रिते होण्याची कल्पना ही
तयाचे नवे धन
अरुण

बोधस्पर्शिका
**************
ज्याला जमत नाही जगणे
तो हसत किंवा रडत आहे
जीवनात प्रत्येक क्षण मात्र
अानंदमयच आहे
अरुण
बोधस्पर्शिका
*************
जे काही घडते
बाहेर किंवा मनांत
ते घडते
फक्त वर्तमानात
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
सूर्या पासुन पळणारेच
प्रकाशाची वार्ता करतायेत
घृणेच्या आकाशात
ढग धर्माचे गरजतायेत
- अरुण







बोधस्पर्शिका
*************
पळणाऱ्याला  'थांबणे'
कसे समजणार?
प्रपंचाला 'धर्म'
कसा उमजणार?
- अरुण

बोधस्पर्शिका
*************
आकाशात उडताना
आकाश व धरणी मधले अंतर दिसते
अंतरिक्षातुन बघताना
आकाश व धरणी एकच दिसते
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
ज्यांना फळ हवय् लगेच
ते अधीर होतात
कुठेतरी श्रद्धा ठेवतात चटकन
अन् मोकळे होतात
अरुण


बोधस्पर्शिका
*************
जरी सर्व शून्ये सारखीच गणितात
'किती गमवल्यावर शून्य झाले'
ही तुलना शिल्लक राहते - मनांत
- अरुण

बोधस्पर्शिका
*************
प्रतिबिंब दिसतं आरशात
आरशात असत नाही
मन वाटलं मेंदूत तरी
मेंदुत असत नाही
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
भूत सजवलं की
स्वप्न बनतं
स्वप्न थिजलं की
भूत बनतं
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
धन साचलं की
छाती फुलते
ज्या पेटीत साचलं
ती न भुलते
- अरुण
बोधस्पर्शिका
************
भक्तच जन्माला येतो
जन्मानंतर विभक्त होतो
मग आयुष्यभर
भक्ती साठी तळमळत राहतो
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
खरे तर, ज्ञाता कडून
अज्ञाता कडे जाण्याचा हा प्रवास
म्हणजेच हे जीवन
परंतु...फक्त ज्ञाता भोवतीच
चालु आहे ही वणवण
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
शब्दाला अर्थ शिवला  की
अर्था विना कांहीच असत नाही
रोग परिचयाचा लागला की
अपरिचित कांहीच उरत नाही
अरुण

बोधस्पर्शिका
************
सत्याला रूप नाही, स्वर नाही
गंध स्पर्श अन् स्वाद ही नाही
जे जे झाले इशारे सत्या कडे
दुनिया त्या इशाऱ्यांनेच भुलून जाई
- अरुण

बोधस्पर्शिका
*************
चार घाबरलेली माणसे
एकत्र बसतात
इतरांना घाबरवण्याचे
उपाय शोधतात
- अरुण

Thursday, 22 January 2015

बोधस्पर्शिका jan 23

बोधस्पर्शिका
**************
अस्तित्वात- जन्म आणि मृत्यू
असत नाही
पृथ्वीवर क्षितिज कुठेही
वसत नाही
- अरुण
बोधस्पर्शिका
************
भूक लागली की अन्न लागते
तहान लागली की पाणी
अन्न आणि पाण्यात जो  तेढ निर्माण करी,
तो राजकारणी
- अरुण
बोधस्पर्शिका
************
ज्याला गवसते...एकाच अंतर-दृष्टीत
ध्येय-मार्ग-कृति
तो कधी शोधत नाही
पोहचण्याची रीति
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
घृणा करणाऱ्यांवर
मला चीड
पण विसरतो... असे चिडणे ही आहे
घृणेचेच बीज
- अरुण

Sunday, 18 January 2015

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
*************
शब्द एकच... 'राम'
ते दोघे करी सारखाच उच्चार
रामभक्ता च्या मनांत - दशरथ पुत्र
तर कबीराला म्हणायचय् - अनंत अपार
अरुण
बोधस्पर्शिका
*************
आपल्या अजाण नाती बरोबर
जेंव्हा भातुकली खेळतो
ती शिरते भातुकलीत
पण मी बाहेरच उरतो
- अरुण
बोधस्पर्शिका
**************
नकाशा... मार्ग शोधण्याचा
फक्त एक उपाय
मार्गातल्या सावधगिरीला नसे
कुठलाच पर्याय
- अरुण

Thursday, 15 January 2015

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
*************
इच्छे प्रमाणे वागायला मिळणे
- हे झाले स्वातंत्र्य
पण इच्छा अमुकच होते, तमुक होत नाही
- हे नसे का? आपले पारतंत्र्य
- अरुण
बोधस्पर्शिका
************
पंचेंद्रियांना स्पर्शलेली सृष्टी ....
मनाच्या चाळणीतून आंत जाते
स्वतःचा रंग सोडुन
मनाचा रंग घेते
- अरुण

बोधस्पर्शिका
*************
लिखाणाने भरलेल्या पाटी वर
नवीन लिहलेले दिसत नाही
जुने पुसून टाकल्या शिवाय
नवे कळत नाही
- अरुण

Monday, 12 January 2015

बोधस्पर्शिका

1-1-2015

बोधस्पर्शिका
*************
अंगावरले कपडे
अंगाशी एकजीव झाले
कोणते माझे स्व-रूप
समजेनासे झाले
अरुण
बोधस्पर्शिका
*************
सकाळी मी वैतागलेला असतो.. कोणा वर तरी
सायंकाळी मोहात असतो ..... कोणा च्या तरी
खरे तर मी तो नसतोच ......  जो अगोदर  होता
या देहा ला मी मी ची सवय जडलीये....... खरी
अरुण
बोधस्पर्शिका
************
इथे सर्वांना एक सारखाच
रोग झाला
नाही ज्याला... त्याला
इस्पितळात भर्ती केला
अरुण
बोधस्पर्शिका
*************
सगळे वेद...ज्ञान वाचले
तरी कळेना..............अभंग
वाचण्यातले अपुरेपण उमजताच
जागे ............. सकल आनंद
- अरुण

बोधस्पर्शिका
**************
पुस्तकात कथेच्या असतात
छापलेले शब्द... कथा कुठेच नसते
मेंदुत असते
स्नायुंचे जाळे... न्युरांन्स वगैरे वगैरे
मन कुठेच नसते
-अरुण








बोधस्पर्शिका
**************
झोपेतून जागे करण्यासाठी
कुणी तरी हाका दिल्या
जाग आली नाही..फक्त हाकांच्या बनल्या
मंत्र आणि ओव्या
-अरुण
बोधस्पर्शिका
************
भाषा नाही
फक्त शब्दांचेच धन
अभिव्यक्ती साधणारे
सर्व माध्यम
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
सर्व इच्छांच्या मुळाशी
असीम होण्याचा भाव असतो
जिवाला आवळून धरल्याने, माणसाच्या
पसरणेच त्याचा स्वभाव असतो
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
'दुर्बलांची सेवा व विकास'...?
खरोखरीच चांगला विचार
करणारा सेवक- खरा की खोटा?
सांगे त्याचा.... मनाचार
- अरुण

बोधस्पर्शिका
**************
शून्या ची किम्मत
सदा सर्वदा शून्यच राही
अशे पंचवीस शून्य एकत्र ठेवल्याने
त्यांची किम्मत पंचवीस होत नाही
अरुण
बोधस्पर्शिका
*************
कागदाचे कोरेपण.....
लेखणी त्याला पकडणार कसे?
निर्विचार म्हणजे कोरेपणच
विचाराला ते कळणार कसे?
- अरुण
बोधस्पर्शिका
************
तहान लागली म्हणुन पाणी शोधणे
- स्वाभाविक
तहान नसता ही शोध घेण्याचा अविर्भाव
 - दांभिक
- अरुण







बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
**************
दुःखाची कारणे जर असतील...
मनातील गडद अंधारात
तर कां बरे करावा तपास त्यांचा
बाहेर च्या अंगणात ?
**************************
बोधस्पर्शिका
**************
प्रकाशालाच प्रकाश गवसतो
अंधाराला तो कधी दिसला नाही
जो अंधार चिरून पलीकडे गेला
अंधाराने फसला नाही
अरुण


बोधस्पर्शिका
**************
मागल्याशी नाते जोडुन
क्षण अत्ताचा रंगुन जातो
प्रत्येक क्षण अभंग असतो
पण आठवणींने भंगुन जातो
अरुण

बोधस्पर्शिका
***************
धुक्याने धुके सारले जात नाही कधी
सूर्याची... वाऱ्याची लागते तया साथ
विचारांचा गुंता सुटत नसतो विचारांने
अवधानी दृष्टीचा लागतो तया हात
अरुण

बोधस्पर्शिका
*************
नदीत आचमन घेतल्याने
पाण्याचा स्वाद कळतो, अख्खी नदी नाही उमजत
विज्ञानाला गुणधर्म कळतात सृष्टीचे,
अख्खी सृष्टी नाही उमजत
- अरुण