Sunday, 31 July 2016

1- 31 July Marathi Bodhsparshika with Hindi sher

1 -31 July Sher and Bodhsprshika
----------------------------------------------
एक शेर
*******
एक से ही टूटकर ‘उस’.. अनगिनत टुकड़े बने हैं
बस समाओ एक में ‘उस’..... छोड दो गनना उसे
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
नसणे किंवा असणे.. याच दोन शक्यता
मोजत बसणे............. हा गणिती प्रपंच
- अरुण
एक शेर
********
व्यर्थ में सदियों न करना इंतज़ार, सच कह रहा
ठीक पीछे मै खड़ा हूँ बस पलटकर देख लो
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
खुद्द प्रकाश शोधणाराच ज़र अडसर असेल
तर मग उजेड त्याचे पर्यंत पोहचणार कसा?
- अरुण
एक शेर
********
जन्म, मृत्यु, आयुरेखा, आपदाएँ,  ये नही अपने चयन
फिर किस चयन की बात करते हैं सभी दुनियाई बंदे?
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
अंगण निवडलेले असले आणि खेळ ही आवडी चा असला, तरीही
निवड करणाऱ्याचा जन्म किंवा मरण त्याला विचारून घडत नाही
- अरुण
एक शेर
*******
डोर जीवन की इसे सुलझी उसे उलझी लगे
डोर तो डोर ही रहे....जो भी लगे जैसी लगे
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
जगणे नेहमीच असते सरळ साधे
जगणाऱ्याची नजरच जाते वेडी वाकडी
- अरुण
एक शेर
********
लहरें भटकाती हैं........निज सपाट पर
सागर से मिलना हुआ?....डूबकर ही जानो
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
वरवरचे जगणे राहते............ वरवरचेच
पोकळीत शिरल्या शिवाय ‘जगणे’ नाही
- अरुण
एक शेर
********
सिर्फ साहिल तक पहुँचना है सरल
असली जोखिम है समंदर में छलाँग
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
नदीत डुंबण्याचा आनंद पाहिजे असणारे
नदीत डुंबण्याचे साहस न करता
घाटावरच थांबुन नदी चे गुणगान करत राहतात
- अरुण
एक शेर
*********
एक ही वह साँस जिसमें दुनिया जीती है
मेरी तेरी उसकी कहकर जी रहे हैं हम सभी
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
एकच वारा एकच प्रकाश
प्रत्येकाचे एकच आकाश
तरी ही प्रत्येकाला वाटे, माझेच खास?
असे कां ?
- अरुण
एक शेर
*******
जिसे मै ‘मै’ कहूँ ऐसा न ‘मै’ जीआ कभी भी
जिलाए जा रही बस याद उसकी याद की यादें
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
जे सर्वांचे ते कोणाचेच नाही
कारण ‘कोणी’ असा जगतात
न कधी होता न कधी राही
- अरुण
एक शेर
*******
खुद को देखना बाकी रहा और देख ली दुनिया
इसी दुनिया से, अब हम दरबदर अपना पता पूछें
- अरुण

मराठी बोधस्पर्शिका
***************
चश्मा लावून कांही ही शोधा, शिवाय
नाकावरल्या चश्म्याच्या
- अरुण
एक शेर
*******
सुख का नही है कोई दुख से अलग ठिकाना
ऊपर उठे तो छत है...........नीचे रहे तो फ़र्श
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
सृष्टी म्हणजे जणु अख्ख् एकच झाड़
ज्याची प्रत्येक फाँदी प्रत्येक पान वेगळ्या रंगरूपाचे....
ज्यांना रंगरुपातील हे वेगळेपण दिसते
ते भेदबुद्धीने ग्रासतात
ज्यांना ते सर्व एकूण एकच झाड आहे असे दिसते
ते सृष्टीच्या एकत्वात रमतात
- अरुण
एक शेर
********






मराठी बोधस्पर्शिका
****************
हा गोड़ समज की
शरीरावर असते मनाचे नियंत्रण,
तोवर कायम होता जोवर
ध्यानात न आले की
मन सुद्धा आहे शरीराच्याच आधीन
- अरुण
एक शेर
*******
जैसा देखा सुना बयां वही नही होता
समझनेवाले का भी अनुमान ही सहारा है
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
जसेचे तसे सांगता येत नाही शब्दांतुन
समजणाऱ्याने ही शेवटी अंदाजानेच ओळखावे
- अरुण
एक शेर
********

अब और अभी ..
********************
जो गुजर चुका उसे पकड़कर रख्खे
जो आया ही नही, उसे बांधकर रख्खे
- ऐसी नादानीवाला यह आदमी का दिमाग
कैसे देख पाए ?
जिंदगी का अब और अभी..
-अरुण
एक शेर
*******
जो गुज़र चुका उसे थामकर जो हुआ नही उसे देख ले
मौजूदगी सोयी हुई....................हर वक्त इंसा बेख़बर
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
दिवसा विचारांची गड़बड़ रात्री स्वप्नांची दगदग
जगण्या साठी पाहिजे तशी वेळ अजुन सापडत नाही
- अरुण
एक शेर
*******
दिखाया किसीने रास्ता और हम चल पड़े उसपर मगर
न यह सवाल उठा के क्या कहीं कोई रास्ता होता भी है?
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
ज्या प्रांतात..... निघणे, चालणे, पोहचणे अशा क्रिया नाहीतच
तिथे गंतव्य, मंजिल किंवा मुक्काम या शब्दांचेही काय औचित्य?
- अरुण
एक शेर
********
सामने जो भी तमाशा.. है तुम्हाराही तमाशा
बात दुनियाकी करो या खुदकी, दोनों एक ही
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
समोरच्यात जे जे दिसते ते बघणाऱ्यात ही असते
समोर आरसा आहे हे बघणाऱ्याने विसरायचे नसते
- अरुण
एक शेर
*******
उड़ी जो धूल चमकते कणोंपे जो उभरा
वही है चित्र हमारा हमारी दुनिया का
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
माणसातला ‘मी’ म्हणजे उडणाऱ्या धुळीच्या कणांवर चमकणाऱ्या
चित्रा सारखा. या चित्रालाच काल्पनिक जीवन मिळते
आणि तेच वाटते या ‘मी’ ला त्याचे जीवन
- अरुण
एक शेर
*******
अजीब है व्याकरण जिंदगीका चीज़ें हैं नही,लगती हैं
वक्त भी होता कहाँ है मगर सुईयां उसकी चुभती हैं
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
नसून ही कांहीही इथे जग आहेच आहे
काळ नसला तरी काल आज उद्या आहे
- अरुण
एक शेर
*********
बँट जाए जो भीतर वही तो बड़बड़ाए
एकही बनके रहे उसमें मौन बस जाए
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
माणसाच्या जाणीवेचे अनेक तुकडे
एकमेंकांशी बडबडत असतात
आणि म्हणुनच माणुस अस्वस्थ असतो
- अरुण
एक शेर
********
ख़्वाहिशों ने ही मचाया है बवाल बेतहाशा
और ख़्वाहिशों ने ही की उम्मीद के सुकून आ जाए
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
*****************
हे हवे ते हवे ह्या हव्यासालाच
आता हवी आहे शांतता आणि मुक्तता
- अरुण

एक शेर
******
मसला ये है के मसलोंसे मुंह चुराता हूँ
शिकायत भी करूँ के ये हमें जीने नही देते
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
सामोरे जाई त्याच्यासंगे जीवन नाचे
भित्यापाठी मात्र ब्रह्मराक्षस
- अरुण
एक शेर
*******
हरकोई सवालात सवालात नही होते
कुछ सुलझी हुई बातें भी उलझा देतीं
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
धाग्यात धागा गुंतला की झालेला गुंता सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात,
परंतु मनातला गुंता किंवा confusion , त्याचे गुंतलेपण स्पष्ट दिसुन येताच सुटतो.
मानसिक गुंत्यांबाबत स्पष्टपणे बघणे हीच एक कृती ठरते, वेगळी कोणती
कृती करण्याची गरजच नसते.
- अरुण
एक शेर
********
सब अपने अपने इतिहासों से मेरी बात समझते हैं
कोई इसतरह, कोई उसतरह, तो कोई कुछ और समझता है
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
प्रत्येका समोर असतो तो एकच देखावा
मग बघणाऱ्यांना वेगवेगळा कां दिसतो?
- अरुण
एक शेर
*******
वैसे तो मै ही हूँ अपना परिचय अपनी सोहबत-ओ-परेशानी
वरना कौन है इस जहान में अपना या के पराया ?
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
म्हटले तर.... सारेच इथे आपले... म्हटले तर... कोणीच कुणाचा नाही
- अरुण

एक शेर
********
कोशिशों से न कोई नम्र हुआ करता है
कोशिशें नम्रता विनम्रता के ठीक ख़िलाफ़
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
इथे नम्रतेचे पारितोषिक इच्छिणारेच सारे
पण नम्र कुणी ‘इक्का दुक्का’च
- अरुण



एक शेर
*******
तुम्हें लगती मेरी बातें कठिन उलझी जटिल क्यों?
शायद, तुम्हें अच्छा लगे.... वह कह न पाऊँ मै
- अरुण
एक शेर
********
सीधी सरल बातेंभी तेरे ध्यान ना आती
शायद, ‘निरा पांडित्य’ तुमको मोह लेता हो
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
स्वत:च्या आंत-बाहेर जगत-दर्शन शक्य असताना ही
माणसाला अज्ञानापोटी ‘आध्यात्मात’ शिरण्याचा मोह होतो
- अरुण
एक शेर
*******
आदतें तो आदतें अच्छी बुरी... संस्कार-बंधन
इनकी पकड से मुक्त होनाही समझदारी चरम
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
समाजाचे स्व-संरक्षणा चे भानच सरल जीवनाला कठिन करते
पण माणसातली समज-दृष्टीच केवळ...हे काठिन्य विरवू शकते
- अरुण
एक शेर
********
न है मौजूद...........उसका ख़्याल ही मौजूद है हरदम
हटाना ‘मै’ बड़ा तिकडम जो बन जाए ये ‘मै’ हमदम
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
*****************
‘मी’ पासुन मुक्त होणे कठीनच, कारण
जो न ‘होता’ कधीच त्याला नाहीसा करणे कसे शक्य?
- अरुण
एक शेर
********
फ़र्क़ तो है जमीं आसमांका, एक देखे उसेही कहे
और दुजा बस कहे कहे कहे........... बिना देखे
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
दृष्टांत बोलतात तेंव्हा........ सत्य उमजतं
सत्या बद्दल किती ही बोला, बोलणे व्यर्थ
- अरुण

एक शेर
********
शब्दों से जो परे है...... गीता ने है कहा
फ़ितरत युगों युगों की, शब्दोंको ही पढ़ा
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
जगात, सत्य लाख वेळा सांगितले गेले तरी
ऐकणाऱ्यांचे कान असत्याकडेच लागून होते
- अरुण









Wednesday, 29 June 2016

१ जून ते ३० जून २०१६


मराठी बोधस्पर्शिका
***************
जीवन जगत असते आपणास
आपण नसतो जगत.... त्यास
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
स्मृति खेचते मागे अन् स्वप्न पुढे
चित्त कधी देहापाशी थांबतच नाही
श्वास जगतात अर्धवटच... तर
क्षण निसटतात ध्यानातुन... आणि
हे जगणे गोंधळलेलेच राही
- अरुण

बोधस्पर्शिका
**********
गति मुळे... स्मृति,
स्मृति मुळे मति..
मति मुळे मन
आणि मनानेच अधिक विकसित झालेल्या
ह्या प्राण्याचे नांव आहे...... मा.न.व
- अरुण
१९७०-७१ च्या सुमारास लिहलेले
एक गीत आठवले
-------------------------------------
कुणीतरी आहे माझे
ही मधुर भावना...धनी केवढी
तुच्छ हजारो राजे.....कुणीतरी आहे माझे

उदास जीवन उदास मैफिल
कसली नव्हती तेथे हलचल
सात स्वरांचे उठले वादळ..साथीचे स्वर वाजे
कुणीतरी.......

शेवंतीला सुगंध नवता
मधुमासी ही प्राण कोरडा
साद मिळावी.. वसंत फुलला....पवन सुगंधित ताजे
कुणीतरी...

ह्रदय-विलास मूक तो सारा
आनंदाचा नसे निवारा
तिथे अचानक हास्य पसरले....ह्रदयी कोणी विराजे
कुणीतरी...

कुणीतरी आहे माझे
ही मधुर भावना... धनी केवढी
तुच्छ हजारो राजे...कुणीतरी आहे माझे
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
स्मृति खेचते मागे अन् स्वप्न पुढे
चित्त कधी देहापाशी थांबतच नाही
श्वास जगतात अर्धवटच... तर
क्षण निसटतात ध्यानातुन... आणि
म्हणुन हे जगणे गोंधळलेलेच राही
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
आपले स्वत: चे स्वरूप काय हे न बघताच
‘परमअवस्था’ ‘ब्रह्मचैतन्य’ आणि अशाच कल्पनांच्या
मागे धावणे.... शुद्ध नादानी चे लक्षण
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
******************
कळते रात्र आणि दिवस ही दिसतो..पण सूर्य अवधाना चा उगत नाही
शहाणपण रेंगाळत राहते सभोवती पण घराच्या आंत मात्र शिरत नाहीच
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
रेघोट्या काढोनी धरणीचे भाग करी
एक तुला प्राणप्रीय दुसरा परदेश परी
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
सुख दुःख संवेदना ज़री सर्वांच्या सारख्याच
तरी असते... प्रत्येकाची कहाणी वेगळीच इथे
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
इथून तिथे अख्खे एकच एक
माणसाला.... हे कधी उमजेल?
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
जुन्या अनुभवांचीच डागडुजीकरून
त्यांना वापरल्याने
जीवन नवीन बनत नाही
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
असेल कोणी मोठा तर कोणी छोटा, इथे संसारात
‘त्याच्याकडे’ तर नसे ..............कुठलीच वर्गवारी
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
आकाशाला गवसणी घालण्या इतका पक्का होता निर्धार
पण करणार काय? माझ्याच पंखा चा झाला मला भार
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
शब्द ओसरल्यावरच होतो...... निशब्दाचा प्रवास
जे जागच्या जागीच प्राप्त तया कसली देता हाक
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
नेम चुकला.....तर सावज मरत नाही
असेच होते ज्यामुळे दुःख सरत नाही
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
*****************
मुठीत धरणे श्वासांना?... कशा साठी
ते तर सतत........... येतजात राहती
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
जे वाटते मला.. ते वाटणे माझे मलाच
जीवन जगत असते...... कोणास काय वाटते याची फिकीर न करता
- अरुण
मराठी
******
भ्रम द्वैताचा लोपताच तुकड्यांचा ‘योग’ होतो
पण ‘योग’ या शब्दाचाच सध्या खूप उपयोग होतो
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
माझे.. तुझे...त्याचे जीवनच......जीवन वाटे
जीवनांचे ही जीवन असते.. ध्यानात न येते
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
******************
जसे बघावे तसे......
माणुस हा प्राणदोरा वर चालणारी कळसुत्री
की प्राणांचा सक्रीय वापर करणारा जीव ?
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
एकच प्राण-सागरात तरंगताय् सकल प्राणीजगत
तरी प्रत्येकास वाटे ‘आपल्याच’ प्राणांची फिकिर
- अरुण

मराठी बोधस्पर्शिका
****************
कशासी तू मनाला सांगतो मन दूर करण्या
कधी ही लेखणीने लेख पुसला जात नाही
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
असणे वेगळे.... वाटणे वेगळे
तरीही ‘वाटणे’च घेते ‘असण्या’चे रूप
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
येऊन गेल्या नंतर तो, मनास वाटे तो आला आहे
असल्याच गोड़ भ्रमांत..... ....जगते आहे ही दुनिया
- अरुण

मराठी बोधस्पर्शिका
***************
दृष्टीत दोष असला तर सोपा मार्ग ही.... कणखर वाटतो
मार्ग सोपा असतो त्याचा जो जीवनाकडे स्पष्टपणे बघतो
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
जीवनात हे मिळवले ते गमवले,, हा भास नुसता
कागदावरल्या बेरीज वजाबाकीचा......हिशेब नुसता
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
ह्या स्वार्थी जगात जगताना स्वार्था ची गरज लागे
पलिकडल्या जगात मात्र स्वार्थाचा न लागे उच्चार ही
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
हा चमत्कारच नाही का की-
जिथे कांहीच नाही तिथे ही डोळ्यांना नक्की कांही आहे, असे गवसावे
आणि मग.............. मनानी त्याला आपले नामरूपात्मक जग बनवावे
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
तू असशील ही...नसशील ही कदाचित
पण इथे तर तुझ्या विषयांचाच हंगामा
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
ह्रदयास जे कळले......... ओठावर येताच ओसरले
वाटत नाही सत्य कधी ग्रंथ वाचून कळत असेल
- अरुण


Tuesday, 31 May 2016

में २०१६

१ में २०१६
बोधस्पर्शिका
***********
जिथे प्राण आहेत,
आहे देह उर्जे चा संचार
बहुदा आपण तिथे नसतो.
आपण असतो तिथे,
जिथे असतो मनाचा व्यापार
- अरुण
बोधस्पर्शिका
**********
कुठलेच नाम किंवा परिचय
अस्तित्वात नाहीत.
अस्तित्वात गुण किंवा गुण-लक्षणे
आढळतात पण नाम नाही.
इथे देवत्वाचा संचार तर आहे
पण देव नाही.
- अरुण
एक मराठी कविता
-------------------------
क्षण क्षण पूरा शोषुन घे तू श्वांस श्वांस हा जागू दे
जे आहे ते खरेच आहे.................जे गेले ते जावू दे

अर्थ अनार्थाचे लटके हे ओझे घेऊन कां चाले?
रसगंधाने, स्वररंगाने, ....स्पर्शाने जीवन ओले
मुक्त फुलांची साथ घेवुनी अंतर अपले गावू दे
जे आहे ते खरेच आहे.................

क्षणधारेला रोखुन घेतां डबक्यातुन सुखदुख जागे
नदी धावते पुढे... किनारे बघतात निर्लिप्त उभे
नयनांचे तू करुन किनारे....पुढे जगाला धावू दे
जे आहे ते खरेच आहे...........

नात्यांच्या ह्या खेळा मध्ये रमून जाती संसारी
रंगभूमीवर जरी रंगतो......... दूर सरे तो रंगारी
तू अर्जुन हो रणभूमीचा...आंत हिमालय राहू दे
जे आहे ते खरेच आहे......... जे गेले ते जावू दे
- अरुण


जुन्या डायरीतील एक मराठी गझल
*****************************
कमनशीबी मी, पुन्हा आलो तुझ्या दारी असा
ओळखीच्या त्याच वाटा.. त्या खुणांना पारखा

अंतरी घडवीत बसलो.........मागल्या भेटी पुन:
त्याच जागा.. मी तयांना.. प्रश्णचिन्हा सारखा

टाकलेल्या पाहुण्याला......... धर्मशाळा ही बरी
कैक येती येती जाती....... नाही कोणी लाडका

त्या घराला दूर बसुनी पाहणे....... आता भले
दूर सरले स्वप्न ज्याचे... भंगल्या मनी तारका
- अरुण

बोधस्पर्शिका
***********
जे अस्तित्वातच नाही
त्याची कल्पना करणे
व त्या कल्पनेला वास्तव समजुन
तिचा वापर करणे
म्हणजेच मायेत गुरफटणे
- अरुण
बोधस्पर्शिका
*********
पाऊस पडतो, सूर्य उगवतो
नसता कांहीही प्रयोजन
हा तर माणुसच केवळ की
ज्याला ध्येय, हेतू, धोरण
- अरुण

बोधस्पर्शिका
**********
मोठ्यां चे ज्ञान,
छोट्यांच्या पाटीवर आले
छोट्यांना वाटे,
हे स्वत: त्यानीच मिळवले
- अरुण


२२ जून ८३ रोजी,
मराठी नाट्यगीताच्या धरतीवर रचलेले हे गीत
(राग ललित)
**********************
स्वरमय जल चिंबरात
मन भिजले पावसात

अधिर अधर गडद यौन
मदिर मस्त नयन मौन
गर्जत तर्जत नभांत
श्रावण रजनी भरात
स्वरमय जल चिंबरात

श्वांस श्वांस मंतरला
ध्यास तुझा आसवला
रिमझिम रमली सुरात
घन जमले अंतरात
स्वरमय जल चिंबरात

कळी कळी बावरली
थेंब थेंब ओलवली
बरसत बरसे उरांत
मीतस्वप्न गीत गात
स्वरमय जल चिंबरात
मन भिजले पावसात
- अरुण

मराठी बोधस्पर्शिका
****************
एकाचवेळी, माणुस वेग वेगऴ्या
कालस्थली जगत असतो,
तो वर्तमानात राहुन श्वांस घेत असतानाच,
मनाने भूतकाळात वावरत असतो
आणि पुढे जे घडणार त्याची शक्यता (निश्चितता नाही),
ती ही याच वेळी प्रकट होण्यासाठी
आकार घेत असते.
- अरुण



मराठी बोधस्पर्शिका
****************
जमीनीवर शिडी आडवी ठेवली असेल तर तिने उंच कसे जाता येणार?
आपण जे ज्ञान मिळवतो, ते जीवन जगण्यासाठी कामास येते खरे, परंतु, ज्ञाना पलिकडे जाण्यासाठी किंवा ज्ञानोत्तर होण्यासाठी, किंवा समज-स्पष्टतेची उंची गाठण्यासाठी याच ज्ञानाला स्वत:चा सर्व भार सारून शहाणपणाची (wisdom) उंच झेप घ्यावी लागते.
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
*****************
नजरे समोर जे काही येते
त्याच्याशी असणारी ओळख त्यात मिसळून जाते
आणि त्यामुळे नजरेला ती वस्तु, अथवा जे काही असेल ते,
जुनंच किंवा परिचित वाटत.
तिचे/त्याचे नवे ताजेपण अनुभवण्यासाठी
नजर परिचयापासुन मुक्त व्हायला हवी
- अरुण

मराठी बोधस्पर्शिका
***************
शब्दांतुन कागदावर विचार मांडले जातात
परंतु कागदाला- ‘शब्द-अर्थ-विचार’ –
हे सर्व काहीच जाणवत नसते,
जाणीव असलीच तर ती फक्त शाई ची असणार
जी लेखणीतून कागदावर पडत असते.
सांगायचे हे की-
मन किंवा विचार मेंदूच्या माध्यमातुन प्रगट होत असले तरी
ते मेंदूत सापडत नाहीत.
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
मोह, माये चे आकर्षण व संस्कारांचे ओझे,
माणसाला प्रपंपापासुन निसटू देत नाहीत,
त्याला गुरुत्वाकर्षणा सारखे घट्ट पकडून ठेवतात.
आध्यात्मिक बुद्धीवाले मुक्ती साठी
साधनेचे पंख शोधत आयुष्य घालवतात
परंतु कांही बुद्धच असे की ज्यांना
मायामोह आकर्षितच करत नाही.
- अरुण

मराठी बोधस्पर्शिका
****************
जीवन सदासर्वदा आनंदीच असते
पण त्याला ‘माझे जीवन’ हा भाव चिकटला की
मग त्याला ‘काय हवे, काय नको’ चे ओझे
सतवायला लागते
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
कल्पनेचाच खेळ हा तर
ध्येय असो का मार्ग....
जे आहे अत्ता इथेच
तेच ध्येय तोच मार्ग
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
धरणीचे होत नसतात कधीच कोणते भाग
तिचावर काल्पनिक रेषां आखून काय होणे?
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
***************
‘मी-तू’ च्या नात्यातुन
हा ‘मी’, घडत असतो
दुसरा किंवा ‘तू’
‘मी’ ला जसा प्रतिसाद देतो
‘मी’ त्या प्रमाणे ओळखला जात असतो
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
स्वत:ची आठवणच वावरत असते आंत मनांत
सोयीस्करपणे वाटते... नक्की मीच वसलोय आंत
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
मागे बघत बघत पुढे चालता येत नाही
पण माझे जगणे तर असेच होत राही
- अरुण


मराठी बोधस्पर्शिका
***************
सत्या चा स्वाद जाणण्यापूर्वीच, त्याला असत्या चा  गोडवा भुलवून टाकतो
मग, फारतर एखाद्या निवांत वेळी.. त्याला सत्य जाणुन घेण्याचा छंद जडतो
- अरुण
मराठी बोधस्पर्शिका
****************
करणारा नाहीच कुणी, केवळ इथे होणेच होणे
जगणे ही होणेच अन् मरणे ही......... होणेच
- अरुण

मराठी बोधस्पर्शिका
***************
खरे तर, मनांत विचार धावत नसतात कधीच
जागच्याच जागी बदलत असतात रूप अपले वेगाने
- अरुण

मंगलाष्टक - अरविंद जोगळेकर, विवाह प्रसंग
१-६-१९७०
**************
भाग्याचे नवचक्र आज मिळुनी... आयुर्रथी जुंपले
एकाकी स्वर पार आज विरुनी प्रीती स्थळी संपले
प्रेमाचा मनगंध दाट रमतां.......प्रीती मनी लाजली
स्वप्नांच्या घरट्यांत वास करुनी, आशा इथे हासली

नात्यांची रचना नवीन घडतां .... आनंद धुंदावला
नादाला नवनाद सूर मिळता... ....सुररंग संचारला
आप्तांच्या जलशात हर्ष पसरे माया मनी दाटली
आईच्या मनीचीच एक मनीषा आता इथे साधली

गंगेचा येतो समीर लपुनी, .......येथे मुळेच्या तटी
भेटीला नगरांत याच उतरे... .......प्रऽदेश वाराणसी
वर-वधू च्या मनमीलनांत वसते.... मंगलमयी सावली
साऱ्या पुण्यदिशा मिळुनी वदल्या, कुर्यात सदा मंगलम्
- अरुण खाडिलकर

मराठी बोधस्पर्शिका
***************
दृष्टी जेवढी व्यापक मनातला अभेद किंवा समत्वभाव ही तेवढाच मोठा.
आकाशा साठी दिवस आणि रात्र, दोन्ही एकच... कारण आकाशाच्या नजरेत
दोन्ही घटना एकाच वेळी एकत्वाने घडत असतात
- अरुण





































Saturday, 30 April 2016

१५ एप्रिल बोधस्पर्शिका

15 April Marathi 2016

बोधस्पर्शिका
************
सगळेच प्रश्न, प्रश्न नसतात
बरेच विचारण्याजोगे
तर काहींच
विचार करण्याजोगे असतात
-अरुण
बोधस्पर्शिका
***************
सुबह ऊंघता सोये वो तो, रात में दिन का मान धरे
पत्थर में हैं प्राण, न देखे, प्राण रचे......सम्मान करे
अरुण
----------
दिवसाची 'जाग' न बघतां...झोपत राहणारा
रात्रीलाच दिवस समजुन ......जागत राहतो
दगडात ही प्राण आहेत.. ......हे न बघणारा
दगडाला कोरुन....... ..त्याला पूजत राहतो
- अरुण

बोधस्पर्शिका
************
एकदा कुणी सत्य खुणवुन दाविले, अन् मग,
......त्या खुणेला सर्व पूजत राहिले
- अरुण
बोधस्पर्शिका
**********
समोर दिसणारे वाचत चला
वाचुन झालेले पुसत चला.....
म्हणजेच मनाची पाटी कोरी राहील
आणि जगणे आनंददायी होईल
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
‘ते’ बघतात आणि लिहितात
आम्ही ते जे लिहिलेले...
वाचतो आणि बघून झाले
असे मानुन घेतो
- अरुण
बोधस्पर्शिका
**********
सैल होत चाललेले जागेपणा
म्हणजे लक्षण झोपेचे
सक्रीय होत चालणारी झोप
म्हणजे लक्षण जागेपणाचे
परंतु जाग-झोप या पलिकडे असते
कांहीतरी वेगऴेच
- अरुण
बोधस्पर्शिका
************
‘वारा असतो, स्पर्शतो पण दिसत नाही’ –
ही प्रत्यक्ष जाणीव सर्वांत इतकी रुजली आहे कि
वारा दिसावा असा विचार ही कधी कोणास होत नाही.
‘अहं’ हा अस्तित्वात नाहीच..... हा विचार पटत असला तरी
प्रत्यक्ष जाणीवेत रुजत नाही.
कळते पण वळत नाही.
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
प्रत्येक क्षण स्वत:त
स्वत:चे फुलणे बघतो
जसा फुलतो तसाच आहे तो,
असे मानुन घेतो
- अरुण

बोधस्पर्शिका
***********
आठवत असलेल्या प्रश्णांसाठी
आठवत असलेलीच उत्तरे लागतात
सतवत असलेल्या प्रश्णांची उत्तरे
शोधावी लागतात
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
माणसाला सर्वव्यापक चैतन्याचे वरदान मिळाले असता ही, माणुस चेतने ची उंची न गाठता, चेतनेला जमीनी वरील अनुभव एकत्र करण्यासाठी वापरत राहतो. वरदान असले तरी शापितच राहतो.
बालपणावर, तरुणपण रचतो... मग तरुणपणाच्या उत्साहाच्या आधारे सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडतो... मग राबून थकला की ‘देव देव’ करायला लागतो. देवाचा विचार पश्चातापातुन घडतो, कोणत्याही जिवंत जाणीवेतुन नव्हे. थोडक्यात काय तर रोपटे उंच उंच जात बहरण्या ऐवजी जमीनीलगतच सरपटत मोठे होत राहते. लांब लांबवरचा पल्ला गाठणाऱ्याला, समाज प्रशस्ती देतो, जो लांबी गाठत नाही त्याची कीव करतो.
ज्यांनी अक्षराचा शोध लावला तो खऱ्या अर्थाने उंचावला, उत्क्रांत झाला. जे साक्षर, शिक्षित, उच्च-शिक्षित होत राहतात ते केवळ ज्ञान व कौशल्य वाढवत राहतात, लांब लांब जात राहतात, उंच नव्हे.
- अरुण

एक बोधप्रद संवाद
****************
मी विचारले...... हा जो आंत ‘मी’ ‘मी’ करतो आहे, ‘मी’ म्हणुन वावरतो आहे, तो कोण?

तो समोर च्या भिंती कडे बोट दाखवत म्हणाला...

“बघ, समोर भिंत आहे, भिंतीवर एक फ्रेम लटकवलेली आहे. फ्रेम च्या आंत कांही रंग विखूरलेले, कांही रेषा काढलेल्या आहेत.......दिसल्या का?

मी म्हणालो.......हो, भिंत दिसतेय् , फ्रेम ही दिसतेय् अन् आंत काश्मीर चे दृश्य चितारले आहे. असे दिसतय्

तो हसला...थांबला.....आणि म्हणाला......

मी ज्याला .. रंग विखूरलेले, रेषा काढलेल्या आहेत.......असे म्हणतोय, त्याच्या आंतच तुला काश्मीर चे दृश्य दिसत आहे.

तो पुढे म्हणाला.........सरळ सरळ बोलायचे झाले तर....  मेंदूत विखुरलेले जाणीवें चे बिंदु, रेषा, भावरंग- आकृत्या म्हणजेच तुला भासणारा ‘मी’.... दुसरे तिसरे कांही नाही. हा भासित ‘मी’च, , आंत सतत वावरताना भासतोय्.
- अरुण






Wednesday, 13 April 2016

14 April 2016 बोधस्पर्शिका

1 April Marathi 2016

बोधस्पर्शिका
***********
सर्वत्र, माणूस अंतरंगी सारखाच असतो
प्रत्येकाचा भूतकाळ किंवा स्मृती त्याला डसली
की तो वेगळे वागताना दिसतो
- अरुण

बोधस्पर्शिका
**************
डोळ्यांना चलचित्र बघतेवेळी
वेगवेगळी चित्रे दिसतात
परंतु मेंदूला त्यांचे वेगळेपण आकलित न झाल्याने
सलगता भ्रमित होते आणि
त्यातुन एक कथा जन्म पावते
अशाच तर्हेने
प्रत्येक क्षणाची वेग वेगळी स्मृती....जोडली गेल्यामुळे
अहंकाराचे मायावी अस्तित्व जन्माला येते
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
शब्द, प्रतिमा चिन्हे असतात
आशय सांगण्या साठी
स्वत: ची पूजा करून घेण्यासाठी किंवा
स्वत:चे राज्य गाजवण्यासाठी नव्हे
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
देशावर प्रेम...
हा असतो
एक ............सहज साधा भाव
त्याला राष्ट्रवादाचे नाव दिले
की तो बनतो एक राजकारणी डाव
- अरुण
बोधस्पर्शिका
************
कोणतीही घटना
घडते किंवा न घडते
याची अनेक अनेक कारणे किंवा कारके असु शकतात..
बरीच कारणे सरळ सरळ समजुन येतात आणि
बरीच उमजत नाहीत.
जी कारणे समजत उमजत नाहीत त्यांनाच
‘भाग्य’ असे संबोधून
माणुस स्वत:ची समजुत घालतो.
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
इतरांचे अहंकारी वर्तन जेंव्हा बोचायला लागते
तेंव्हा आपला अहंकार दुखावला आहे असे समजावे
-अरुण
बोधस्पर्शिका
************
धर्म कधी एकमेकांचे स्पर्धक नसतात,
एकमेकांबद्दल आकस बाळगणारे नसतात
जर असलेच तर....
ते धर्म नसून
धर्मा चे नांव धारण केलेल्या
माणसांच्या झुंडी असतील
- अरुण
बोधस्पर्शिका
**********
राजकारणा च्या क्षेत्रात
पुढारी, कार्यकर्ते,पाऱ्ट्या,त्यांचे समर्थक, विरोधी
जे काही करतात त्यालाच राजकारण म्हटले तर त्यात वावगे काय?
पण..’तुम्ही राजकारण करीत आहांत’....असे म्हटले तर त्यांना हा आरोप वाटतो
हे जरा विचित्रच नाही काय?
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
एकाच ब्रॅंड चे दोन एक सारखे computers
वेग वेगळ्या operating systems ने चालत असले,
वेगळे programs run करत असले तरी
Computer म्हणुन ते एक सारखेच असतात.
माणसाचेही तसेच.
सर्वस्थळी सर्वकाळी माणूस हा एक सारखाच
- अरुण
बोधस्पर्शिका
***********

सांकेतिक अर्थाने,
सामाजिक किंवा राजकीय पातळीवर,
शेळी वाघ किंवा इतर पशुपक्षी
एकत्र नांदायला लागले की
‘एकता प्रस्थापित झाली’ असे मानले जाते
आध्यात्मिक जाणीवेला,
सर्वांची प्राणलय एकच आहे
हे दिसुन येते
- अरुण

Wednesday, 30 March 2016

31 March 2016

बोधस्पर्शिका
*************
लोकशाहीला धार्मिकते पासुन
वाचवायचं नाही
वाचवायचं आहे ‘धर्मगिरी’ पासुन
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
कोणती भाषा लिहिणे आहे यावर
कागदा चा पोत
ठरत नसतो.......
व्यक्तिमत्व कसे ही असो,
आतला माणुस
एकच असतो
-अरुण
बोधस्पर्शिका
***********
स्क्रीनवर
फ़िल्म-प्रकाश जसा कहाणी ला
जिवंत करतो
मनातला स्मृति-प्रकाश तसेच
चित्तावर भूतकाळाला
जन्म देतो
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
हे कळताच की हे जग केवळ
माझे, अमुचे, अम्हां सर्वांचेच नसुन
सर्व सर्वांचे आहे
जीवन-गगनाचे भंगणे थांबले
‘माझे-तुझे’ या शब्दातला आत्माच उडून गेला
- अरुण
बोधस्पर्शिका
**********
जिथे...खऱ्याचा वापर खोटे करतात,
खोटे.. खऱ्या सारखे मिरवतात
त्या जागेला म्हणावे
रा-ज-का-र-ण
- अरुण

बोधस्पर्शिका
**************
स्मृतीतला अंतर संवाद
म्हणजे 'मी' ची उत्पत्ती
'मी' कडून होणारा संवाद
म्हणजे नवीन स्मृती
- अरुण
एक शेर
********
अच्छे बुरोंसे सोहबत तो करके देख ली
बदनाम ही बचे थे जिनको न मिल सका
- अरुण
शेर का मराठी आशय
******************
भल्यांना भेटावे लागले कारण माझं जग भल्यांचं होतं
भेटावेसे वाटले बुऱ्यांनाही कारण माझं ही मन बुरं होतं
भीतीनं बदनामी च्या, भेटलोच नव्हतो बदनाम लोकांस.
पण भेटल्यावर कळलं की त्यांचच मन खरं होतं
-अरुण
एक शेर
*******
फ़िल्मों से रोशनी जब तस्वीर बन के गुज़री
ग़म ओ ख़ुशी का सब में माहोल चल पड़ा



सिनेमा च्या पडद्यावर.....
*************************
सिनेमा च्या पडद्यावर
अवतरतात
चालती बोलती चित्रे....
प्रकाश सावली चा निव्वळ लपंडाव
अन् त्यातच प्रेक्षक- मनाला जाणवतो
कथा...आशय....अन् भाव
प्रेक्षक हसतो, रडतो, कथेत रमतो
आणि अचानक.....
त्याचे ध्यान मागच्या झरोक्यातुन येणा-या
प्रकाश झोतावर स्थिरावते आणि तो अचानक....
चित्तशून्यते च्या झटक्याने अंतर्मुख होतो
त्याला कळुन चुकते....
इथे अस्तित्व आहे केवळ प्रकाशझोताचंच
न कथेचं, न आशयाचं न कुठल्याच भावभावनांचं
- अरुण






Sunday, 13 March 2016

14 March 2016

बोधस्पर्शिका
*************
अख्खा सागरच उसळत आहे....
लाटेवर लाट आदळत नसते
मनात नसते कुणी कर्ता कर्म
अख्खे मनच घुसळत असते
अरुण
बोधस्पर्शिका
*************
खिड़की च्या काचेवर
जमलेली धूळ दिसत नाही......
रखरखीत दुपार.. तरीही
ढगाळलेली वाटत राही
अरुण
बोधस्पर्शिका
*************
जगणे सोपे व्हावे........ म्हणुन मन आले
पण प्रत्यक्षात जगणे...असह्य करून गेले
अरुण
बोधस्पर्शिका
*************
शरीराला जशी....तहान भूक
मनाला तशीच... इच्छा वासना
अरुण
बोधस्पर्शिका
**************
समोर चे स्पष्ट आणि खरे खरे दिसावे म्हणुन...
हे डोळे असतात
पण डोळ्यांत धूळ फेकणारे आणि फेकुन घेणारे ही....
इथेच असतात
अरुण
बोधस्पर्शिका
*************
खोट्यातले खोटेपण आणि
खऱ्यातले खरेपण दिसत राहणे
म्हणजेच सावधगिरी.
खरे काय व खोटे काय, हे नुसते कळणे,
पुरेसे नाही
अरुण






बोधस्पर्शिका
*************
ढोबळपणे माणसांचे... तीन प्रकार असतात......
एक, मानणारे... दुसरे, विचारशील.....तिसरे, स्पष्टपणे बधू शकणारे
पहिले दोन.... परस्पर संघर्ष करीत राहतात..
तर तिसरे, ...........त्रयस्थपणे संघर्ष बघत राहतात
अरुण

बोधस्पर्शिका
*************
जंगलात,
झाड़े आप आपल्या जागी
हसत खेऴत बहरत राहतात
माणसाची वस्ती आली नजीक की
शेवटचे दिवस मोजत राहतात
अरुण
बोधस्पर्शिका
************
अज्ञानाचे प्रकार....
जे नाहीच ते दिसणे.... म्हणजे भास... म्हणजे अज्ञान
जे आहे ते न दिसणे.....म्हणजे अंधत्व.. म्हणजेही अज्ञानच
अरुण
बोधस्पर्शिका
**************
माणसांनी देवाचा माणूस केला आणि मग
तो 'माणूस' केलेला देव पण...
दुसऱ्या देवांशी
भांडायला लागला
राम.. साईबाबा च्या विरोधात झाले,
रामा च्या विरोधात कृष्ण
आणि मग असेच चालत राहिले
अरुण
बोधस्पर्शिका
*************
ध्वनी हा संगीताचा धर्म आहे
स्वर आहे त्याची संस्कृति
हिंदुस्थानी, कर्नाटक, पाश्चात्य वगैरे
आहेत त्याच्या परंपरा
संगीत-घराणी म्हणजे त्याचे संप्रदाय
----------
तसेच...
अस्तित्वमयता आहे माणसाचा धर्म
माणुसकी आहे संस्कृति
हिंदु, मुस्लिम,सिख वगैरे ...
आहेत त्याच्या परंपरा
शैव,वैष्णव, सिया सुन्नी...
आहेत त्याचे संप्रदाय
अरुण
बोधस्पर्शिका
*************
लाटा दर्शवतात सागराचे
हलणे डोलणे
विचार दर्शवतात मनाचे
अस्थिर राहणे
- अरुण








Monday, 29 February 2016

१ मार्च २०१६


१ फरवरी
बोधस्पर्शिका
************
प्रकाश पसरतो सर्वत्र सारखाच
न्याय ईश्वराचा सर्वांस सारखाच
उघडी असतील कवाडे तरच दिसते
परम साक्षात्कार सर्वांस सारखाच
अरुण
बोधस्पर्शिका
************
अंधार हे नाव.. अंधत्वाचे
उजेड......म्हणजेच दृष्टी
दिव्यत्व.... किंवा देवपण
सतत तिथे कारुण्य वृष्टी
अरुण
बोधस्पर्शिका
************
चिर निद्रा........मृतावस्था
गाढ़ झोप ........ शांतता
स्वप्न झोप.... शांत-श्रम
जागेपण.........श्रमावस्था
समाधी.....विश्रांत अवस्था
अरुण
बोधस्पर्शिका
************
जन्मताच माणसाला
वळण लावणे सुरू होते आणि मग
वळण पावलेल्याला माणसाला
सरळ काय... ते कळत नाही
- अरुण
बोधस्पर्शिका
************
'मी आणि माझे' -
एक स्वतंत्र अस्तित्व आहे,
असे वाटत आहे प्रत्येकाला, ह्या जनसागरात,
पण महासागरातली प्रत्येक लाट,
सागराशी असणारे तिचे एकत्व,
न विसरता तरंगत अाहे
अरुण





बोधस्पर्शिका
*************
एखादे बीज रुजले की
त्याचे झाड होण्यास वेळ लागतो...
परंतु स्वत:चे वेडेपण स्पष्ट उमजताच
माणूस शहाणा होतो
वेळ-काळ भौतिक घटने साठी लागतो
मानसिक जागृती साठी नाही
अरुण

बोधस्पर्शिका
**************
आरसा खरा असला
तरी प्रतिबिंब खरं नसतं
खऱ्याच्या खांद्यावर बसुनच
खोटं चालत असतं
-अरुण
बोधस्पर्शिका
**************
मुक्ती ला बंधनाचे भय नाही,
बंधनाला मुक्ती हवी हवी वाटते पण
मुक्ती काय.. हे उमगत नाही,
आणि म्हणुनच
मुक्ती... सतत विद्यमान असुनही
बंधनांना त्याची जाणीव नाही
-अरुण
बोधस्पर्शिका
************
एका आचमनातच जर
अख्खा सागर कळुन येत असेल तर
सागरात शोध प्रवास कशासाठी?.....
ध्यान म्हणजे आचमन
ज्ञान म्हणजे शोध प्रवास
अरुण
रुबाई
*******
पादरी मौला-ओ-पंडित की रुचि रब में कहाँ?
राह-बेचूँ हैं सभी.. मंजिल से मतलब है कहाँ ?
यूँ यहाँ, थाली कटोरी और प्यालों की दुकानें
भूख का कोई पता ना... प्यास भी लब पे कहाँ?
-अरुण
वरील रुबाई चा आशय मराठीत
*****************************
ह्या अज्ञानी दुनिये ची लीलाच निराळी, जायचे कुठे हे ठरले नसतां ही वेगवेगळे मार्ग दाखवणारे (पादरी,मौला,पंडित ) अनेक आहेत.  असे वाटते की इथे...भूक व तहान, अशा अनुभूतींचा पत्ता नसतां ही....ताट वाटी भांडी विकणारी दुकाने चालतायेत.
अरुण
बोधस्पर्शिका
*************
ज्याप्रमाणे रामायण
नुसती राम कथा नसून, राम-रावण कथा आहे
तसेच स्वत:ची कोणताही घटना किंवा अनुभव
आठवला की त्या आठवणीत स्वत: चे अस्तित्व
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामावलेलेच असते
अरुण

बोधस्पर्शिका
**************
अर्जुना चा अज्ञानजन्य विषाद,
त्याची गोड फसगत करीत होता.
अंधारालाच प्रकाशाचे महत्व देत
युक्तिवाद करणाऱ्या अर्जुनाचा प्रत्येक मुद्दा,
कृष्ण सहजतेने उपटून टाकीत होता.
अर्जुनाच्या पांडित्याला डोळे नव्हते तर...
कृष्णाच्या शहाणपणा च्या गोष्टींत कुठलाही
देखावा किंवा डावपेच नव्हता
अरुण
बोधस्पर्शिका
***************
जीवनात येणारी कोडी
तर्क सोडवतो हे खरे,
परंतु जीवनाचे कोडे मात्र
त्याला उमजत नाही
अरुण
बोधस्पर्शिका
***************
शब्दांवर तरंगणारा
पैलतिरी जातो
शब्दांना गिळणारा,
गिळताच बुडून जातो
-अरुण
बोधस्पर्शिका
***************
जन्मावेळी मन नसत
नंतर समाजाशी होणाऱ्या
संवाद-संपर्कातुन
ते जन्माला येत
-अरुण
बोधस्पर्शिका
*************
काठावर बसुन जपजाप केल्याने
प्रवाह पाण्याचा कळत नाही
जो नदीत उतरला.. तो
जपजाप करत बसत नाही
अरुण
बोधस्पर्शिका
************
अनुभवाला गाळून
प्यायचं नसतं
माहीतीला तपासून
घ्यायचं असतं
अरुण
बोधस्पर्शिका
************************
अंतर असेल मधे .... तर चालणे आले...
अंतर नाहीच तर मग चालायचे कशाला ? श्रम करणे कशाला ?
अंतर संपवण्यासाठी फक्त जाग यायला हवी.
सत्य तर आहे नेहमीच... जे जागले त्यांना दिसले, ....
जे जागले नाहीत
ते मार्ग शोधण्याचा प्रपंच करत बसले
अरुण
बोधस्पर्शिका
**************
जुने बदलून जे बनते ते नवीन नसते
जुने विसरल्यावर जे कळते
तेच असते नवीन
-अरुण
बोधस्पर्शिका
*************
आध्यात्मिक प्रचिती साठी ज्ञानी किंवा पंडित होणे ....काहीही कामाचे नाही. ज़रूरी तेवढेच कळणे पुरेसे आहे. शहाण्याला जरूरी काय हे नीट उमजत असल्या कारणाने तो आवश्यक तेवढेच ज्ञान वापरत तरून जातो. मूर्ख... ज्ञाना अभावी बुडतो  .....तर अतिज्ञानी ज्ञानाला लोमकळत राहतो
- अरुण

मराठी ग़झल
**************
हे फुलांचे गाव.. तरी येती विराणे
जीवितांनी बांधली अपली स्मशाने
***
मोसमी वारे क्षणाचे....... दूर सारा
भले, माझे कोरड्या श्वांसात जीणे
***
वार कैसेही असो.... पचवीन आता
राहिली नाही कुठे . नाजुक ठिकाणे
***
रसिकता उसनी मिळाली या जगाला
बेसुरांचे चालले आता......... घराणे
***
काल मी सूर्यास म्हणलो... पुरे झाले
पण पहाटे..परत सुचले... मज बहाणे
***
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
जिथे आपण सुरु करतो... तो आपला आरंभ
जिथे थांबतो................... तो आपला अंत
पण अस्तित्वात नसे........... प्रारंभ अाणि अंत
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
ज्ञान नेहमीच अपूर्ण असते
अंतरदृष्टी तर.... नेहमीच पूर्ण असते
अरुण
बोधस्पर्शिका
*************
आई देते जन्म
आणि समाज देतो वेगळेपण,
ह्या वेगळेपणातुन जन्मलेले ‘माझे-तुझे’-
टिकून राहते आमरण
-अरुण
बोधस्पर्शिका
***************
ह्या अस्तित्वात, ह्या जीवनात, कांहीही स्थिर व थांबलेले नाही.
ठोस असे... वस्तुरूप, व्यक्तीरूप व स्थानरूपात ही,  इथे कांही नाही.
इथे केवळ संचार आहे,  प्रकियण ( Process) किंवा अंतर्बाह्य परिवर्तनाचा प्रवाह चालू आहे.
त्याच नदीत परत उतरावे... पण जिथे उतरावे तिथले पाणी  तेच नसते आणि त्यात उतरणारा ही तोच नसतो.
सर्व काही बदलत आहे...
कण कण आणि क्षण क्षण ही.
------------------------------------------
एक रुबाई
**********
ठहराव नही है...... है बहाव जिंदगी
न रुका कुछ भी.... न पड़ाव जिंदगी
है न चीज़, शख़्स..... न जगह कोई
'है' का ना वजूद, बदलाव ही जिंदगी
- अरुण


Friday, 29 January 2016

३० जनवरी २०१६

2-1-2016

बोधस्पर्शिका
*************
रुपयांचे मूल्य दिले गेले की
ती कागदी प्रतीके (currency notes)
जगण्यासाठी मोठा आधार बनतात.
अशा कितीक सार्वजनिक भ्रमरूप असत्यांना
'खरे आहेत'  असे समजुन घेऊन
आपण जगत आहोंत
जगण्याला खोटे ही कामास येत असले
तरी ते खोटेच आहे, खरे होत नाही
- अरुण

बोधस्पर्शिका
*************
होत राहणे (being) ......
होऊन जाणे (been).....
आणि
बनणे (becoming).......

अशा तीन अवस्था असतात जागरूकतेच्या
सतत जागृती .... होत राहणे (being) ......
अर्ध जागृती....... होऊन जाणे (been).....
स्वप्न जागृती.......बनणे (becoming).......
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
डोळे जिथून हलले....................ते भूत
डोळ्यां समोर आहे.....................ते वर्तमान
डोळे ज्या कडे वळणार... .............ते भविष्य
ज्या डोळ्यांना हे सर्व
एकाच वेळी घडत असता दिसत राहते.... ते अवधानी
अरुण
बोधस्पर्शिका
*************
जी चित्तात चेतवली जाते.....
ती चेतना (Consciousness)
जे प्रकाशितच आहे....
ते अवधान (Awareness)
विभक्तीला.................. जाणीव चेतवावी लागते
भक्ती तर..................... स्वप्रकाशितच आहे
अरुण


बोधस्पर्शिका
**************
पुस्तकात कथेच्या
असतात छापलेले शब्द... कथा कुठेच नसते
मेंदुत असते
स्नायुंचे जाळे... न्युरांन्स वगैरे वगैरे
मन कुठेच नसते
-अरुण
बोधस्पर्शिका
**************
मेंदू जागा असला तर ध्यान घडते
अर्धजागा असला...तर घडते मन
जागे चित्त ........अस्तित्वात रमते
स्वप्न वा विचारात रमतो.......भ्रम
-अरुण
बोधस्पर्शिका
*************
बोधस्पर्शिका
*************
सर्व इच्छांच्या मुळाशी
असीम होण्याचा भाव असतो
जिवाला आवळून धरल्याने,
वेदना होते आणि म्हणुन आवळण्या चे हे दुख
कमी करण्या साठी पसर किंवा विस्तार साधणारी
इच्छा जन्म घेते
पसरणेच हा जिवाचा स्वभाव अाहे
अरुण
बोधस्पर्शिका
*************
'दुर्बलांची सेवा व विकास'...?
खरोखरीच चांगला विचार
परंतु सेवा करणारा सेवक- खरा की खोटा?
सांगे त्याचा.... मनाचार
अरुण
बोधस्पर्शिका
**************
दोन गोष्टी अस्तितवात नाहीत...भूत व भविष्य..
तरीही माणसाची सर्व नियोजने- आयोजने
मागचा-पुढचा विचार करीत असतात
अरुण
बोधस्पर्शिका
******************
जीवना कडे ....सृष्टी कडे...
सकल दृष्टीने बघितल्यास
तिच्या सर्व छटा व रंग..एकाच वेळी दिसुन येतात.
तुकड्या तुकड्या ने बघितल्यावर
खरे काय ते कधीच उमजत नाही.
अरुण

बोधस्पर्शिका
**************
स्मृति म्हणजे जे घडून गेले त्याची आठवण
स्मरण म्हणजे जे घडत आहे त्यांवर ध्यान
ध्यानाला...........घडणारी आठवण दिसते
परंतु आठवण करीत असता ध्यान ओसरते
अरुण
बोधस्पर्शिका
**************
देवत्वाचे दर्शन......... देव दर्शन
देवा चे दर्शन............ प्रश्न चिन्ह
अरुंण

बोधस्पर्शिका
************
परिचया चे सर्व.. धागे वीण किचकट
जे नवे ते ही .........पुराण्या चे मनोगत
गत अशी असता.... कुठोनी नवीन यावे
सोडुनी सारे किनारे ओळखीचे बुडुन जावे
-अरुण

बोधस्पर्शिका
*************
मरण प्राणाचे........तया मृत्यु असे म्हणतात सारे
मरण मोहाचे असे जे.......... प्राण असता ही खरे
अरुण
बोधस्पर्शिका
*************
ध्यान असतेच
लक्ष द्यावे लागते
लक्ष देताना...
ध्यान भंगुन जाते
अरुण
बोधस्पर्शिका
*************
स्वाभाविकतेत
विश्राम
अस्वाभाविक होण्यात
ओढाताण
अरुण
बोधस्पर्शिका
*************
विचारांची झोपेत continuity
म्हणजे स्वप्न
स्वप्नाची जागेत continuity
म्हणजे विचार
अरुण
बोधस्पर्शिका
*************
मुक्त दृष्टी
-------------
नजरे समोर........ शब्द 'राम'
दिसतो कोणास कबीराचा राम
तर कोणास दशरथपुत्र राम
कोणास दिसतात... फक्त दोन अक्षरे
रा आणि म
निरक्षरास..... केवळ शाई चे डाग किंवा रेघोट्या
------
एकच............ शब्द, चित्र, दृष्य अथवा रेघोट्या .....
पण बघणाऱ्या दृष्टीला .... अनेक कोण अनेक वाटा
जी दृष्टी..... एकाच क्षेपात... एकाच वेळी
सर्व बाजू आणि आशयांने बघते
तीच मुक्त दृष्टी
अरुण
बोधस्पर्शिका
*************
आभाळात ढग
ढगांच्याच आतुन बाहेरून
वावरत असतात
आभाळच त्यांना..... घडवतं ...... विरवतं
परंतु आभाळाशी त्यांचा कांही संपर्क नसतो
मन ही मेंदुमळे असले तरी मेंदूच्या संपर्कात नाही
अरुण
बोधस्पर्शिका
**********
दिवा लावला.. लागला... तरी ही उजेड नाही
शहाणपण आणत नसेल शिक्षण
तर ते शिक्षण नाही
अरुण






बोधस्पर्शिका
**************
जे जसे आहे तसेच जाणवते
पण ते जाणवणे.......
मनाला वाटते तसेच
वाटू लागते
अरुण
बोधस्पर्शिका
*************
देहाचे काम..... जाणणे (Sensing)
मनाचे काम....... मानणे (Assuming)
जाणणे आणि मानणे...... यांची गल्लत झाली
की जन्माला येते.... वाटणे (Perceiving)
अरुण
बोधस्पर्शिका
*************
तर्क व वैज्ञानिक दृष्टीकोण बाह्य प्रगतीस सहायक ठरतात.
परंतु आंतरिक रूपांतरणासाठी...............अंत:दृष्टीच हवी.
अरुण
बोधस्पर्शिका
*************
जीवन चालवण्यासाठी
मन जन्माला येते...
मन चालवण्यासाठी
जीवन नव्हे
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
बघीतल्याविना वाचता येत नाही
हे जरी खरे
तरी वाचण्यात गुंतल्यावर
आपण अक्षरे बघत आहोत
याचे भान न उरे
अरुण












गगनचुंबिका.. झोपडी..श्रमिक
***************************
सिंहासनाच्या पाठीला
रेलून बसणाऱ्या राजासारखाच
तरट कुसाचा एक बंगला
टेकून होता
गगनचुंबी इमारतीच्या भिंतीवर
त्याचा श्रमसंपदायुक्त
द्रव्यहीन श्रीमंत मालक
इतका उन्मत्त की-
काबड कष्टाचा धो धो पाऊस
पडला तरी
धरत नाही माथ्यावर छत्री
स्वप्नांची....
उलट दुसऱ्यांच्या स्वप्न-महालांसाठी
बहाल करतो स्वत:च्या
दोन वेळच्या रोटी चे अंगण...

अरुण
१७ डिसेंबर १९८३

बोधस्पर्शिका
*************
आनंद-सुर्याला
ढग मनाचे - ग्रासतात
ऊन-सावली बनुन
जन्मभर - त्रासतात
-अरुण

बोधस्पर्शिका
***************
प्रेमा ला नसते नाव, गाव, पत्ता आणि नसते कुठलीच ओळख
ह्या पैकी काहीही असले तर ते आहे निव्वळ एक नाते मनमोहक
- अरुण
बोधस्पर्शिका
***************
पुस्तके वाचून होतात
ज्ञान ही संपादित होते कदाचित
पण स्वत:स जाणणे
हा एक न संपणारा प्रवास आहे
एखाद्या धावत्या नदी सारखा
अरुण



बोधस्पर्शिका
*************
सूर्या पासुन पळणारेच
प्रकाशाची वार्ता करतायेत
घृणेच्या आकाशात
ढग धर्माचे गरजतायेत
अरुण
बोधस्पर्शिका
*************
पळणाऱ्याला  'थांबणे'.... कसे समजणार?
प्रपंचाला 'धर्म'...कसा उमजणार?
हो, धर्म त्यांनाच उमजतो
ज्यांना जागेत ही गाढ झोपेतले
शून्यत्व उमजते
- अरुण












Friday, 1 January 2016

2 January 2016

आजच्या बोधस्पर्शिका
**********************
व्याख्या
--------------
व्याख्या सर्वच
अपूर्ण राहतात
सावल्या....चौकटीतुन
हळुच... निसटुन जातात
***********************
शब्द-निद्रा
-----------------
ध्येय,संकल्प,यश,कीर्ती....
असे शब्द शोभतात फक्त शब्दकोशात
यातले हाती काहीच नसते....
त्याच्या..........जो असतो दिव्य होशात
******************************
स्मृती-लीला
------------------
मेंदूच्या स्क्रीनवर
पडतो आहे ....स्मृती चा झोत
जागच्याजागीच माणुस..
हसतोय..रडतोय. .....बावरा होत
*****************************
अरुण


बोधस्पर्शिका
*************
कांहीही दिसायला लागले.....ऐकू आले की
पाहणाऱ्याच्या... ऐकणाऱ्याच्या असण्याचा
किंवा अस्तित्वाचा भास होतो.
हा आभासच सर्वांच्या जीवनात कर्तारुपाने
वावरत असल्या कारणाने
जीवनाला मिथ्या म्हटले जाते
परंतु आभासाच्या प्रभावात
असणाऱ्याला.... "जीवन मिथ्या आहे".
हे बोलणेच हास्यास्पद वाटते
अरुण

बोधस्पर्शिका
*************
समजते उमजते जे मौनात
सांगावयास तया लागतात शब्द
परंतु समजण्या साठी ते मौनी शब्द
मौनच कामी येते
अरुण
बोधस्पर्शिका (मराठी)
**************
विज्ञानाला तर्क हवा
शहाणपणाला उमज
तर्क व उमज यांचा योगच
सत्य-समज
अरुण
**************************
रुबाई (हिंदी)
*********
जबतक चले ये साँस जीता हूँ मर रहा
पल पल लहर है मेरी सरिता सा बह रहा
फिर भी जनम मरण की चर्चा का शौक़ है
मुझसे बड़ा न मूरख दुनिया में पल रहा
अरुण
बोधस्पर्शिका
*************
आकारालाच कळतो आकार,
निराकारालाच निराकार
चित्त निर्विचार झाले तरच उमजेल
हा सर्व गूढ प्रकार
अरुण
बोधस्पर्शिका
**************
घोडा सरळ धावावा म्हणुनच
दोन्ही डोळ्यांबाजूने त्यांच्या झाकण
माणूस समाजात सरळ वागावा म्हणुन
त्याला संस्कारांची वेसण
अरुण
------------------------------------------

बोधस्पर्शिका
**************
दुःखाची कारणे जर असतील...
मनातील गडद अंधारात
तर कां बरे करावा तपास त्यांचा
बाहेर च्या अंगणात ?
अरुण
बोधस्पर्शिका
*************
आशय शब्दांनी
व्यक्त होतो
शब्दात अडकून राहिला
तर लुप्त होतो
- अरुण