योग मिलन न होता हा
**************************
-रंग भावना विचार रेषा, चित्तावरती चित्र दिसे
ह्या चित्रातुन भुललो ऐसा, रंग दिसे ना रेष दिसे
-पहाट उघडी डोळे, दिसले रात दिसातील भेद मला
ह्या झोपेतुन जाग शोधतो, नच दिसते, हा खेद मला
- ओल्या माती वळण पाउनी, मूर्तिमंत मी झालो रे
ह्या वळणांचे बंध न तुटले, मी अनंत न झालो रे
- फुलण्या साठी माती मागे बीज, बोध मज होतो हा
संस्कारांचे त्यावर वेष्टण, योग मिलन न होता हा
- अरुण
सिनेमा च्या पडद्यावर.....
*************************
सिनेमा च्या पडद्यावर
अवतरतात
चालती बोलती चित्रे....
प्रकाश सावली चा निव्वळ लपंडाव
अन् त्यातच प्रेक्षक मनाला जाणवतो
कथा...आशय....अन् भाव
प्रेक्षक हसतो, रडतो, कथेत रमतो
आणि अचानक.....
त्याचे ध्यान मागच्या झरोक्यातुन येणा-या
प्रकाश झोतावर स्थिरावते आणि तो...
चित्तशून्यते च्या झटक्याने अंतर्मुख होतो
त्याला कळुन चुकते....
इथे अस्तित्व आहे केवळ प्रकाशझोताचंच
न कथेचं, न आशयाचं न कुठल्याच भावभावनांचं
अरुण

No comments:
Post a Comment