Wednesday, 24 December 2014

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
**************
बिंदु ला आकार नाही
पण टिंबा द्वारे तो दाखवला जातो
देहा आंत नसते कांहीही.... तरीही
देहातच माणुस पाहिला जातो
अरुण
***************************

Tuesday, 23 December 2014

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
**************
घोडा सरळ धावावा म्हणुनच
दोन्ही डोळ्यांबाजूने त्यांच्या झाकण
माणूस समाजात सरळ वागावा म्हणुन
त्याला संस्कारांची वेसण
अरुण
------------------------------------------

Monday, 22 December 2014

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
*************
चित्रात शेडिंग मुळे
त्रिमिति चा आभास होतो
चित्तात स्मृती मुळे
वर्तमाना चा ह्रास होतो
अरुण

Sunday, 21 December 2014

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
**************
विज्ञानाला तर्क हवा
शहाणपणाला उमज
तर्क व उमज यांचा योगच
सत्य-समज
अरुण

Saturday, 20 December 2014

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
*************
वस्तुत मन न गुंतवतां तिला बघतो
तो बुद्धीनिष्ठ
वस्तु व मन...यांना सम्यक बघतो
तो ध्याननिष्ठ
- अरुण

Friday, 19 December 2014

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
-----------------
इच्छा होणे
************
ताटात आवडीचा
पदार्थ बघताच
तोंडात लाळ येई
कारण...तोंडा आधी
तो पदार्थ मन खाई
- अरुण

Thursday, 18 December 2014

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
**************
गरज बदलली की जीवन बदलते
जीवन बदलले की गरज-
उत्क्रांती चे हेच चक्र
चालतय् अनवरत
अरुण

Wednesday, 17 December 2014

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
********************
आजारावर उपचार
उपचार म्हणजे नवा आजार
हे असेच चालत राहणे....
मानव.......अविरत बेजार
अरुण

प्रेम... काय नाही.. काय आहे ?

प्रेम...  काय नाही.. काय आहे ?
***********************
संबंध अपेक्षा नाते । अंतरी सुरक्षा देते । प्रेम लवलेश नसे ।
पोकळवासे ॥ १
प्रेमा चा विषय झाला । उल्लेख देवाचा केला । स्नेह मना न रसला ।
विषय-प्रेम ॥ २
आचारा दिसतो स्वार्थ । मना लोभे परमार्थ । लावोनी प्रेमा अर्थ ।
व्यवहारास ॥ ३
जोवरि आपला वाटे । ऊर प्रेमाने दाटे । शिवता सशयं काटे ।
प्रेम वीष ॥ ४
प्रेमा चे कैसे विभाग । कुटुंबा देशानुराग । मनं करे हे भाग ।
बुद्धी कपट ॥ ५
(एकूण १६ पैकी हे ५)
अरुण
प्रेम...  काय नाही.. काय आहे ?
****************************
न प्रेमा जडल्या अटी । प्रेम मुक्त संचरती । दुजास असती नसती ।
प्रेम प्रवाही ॥ ६
प्रेम नाही स्मृती-खेळ । नाही विचाराशी मेळ । भूत ऽ न भावी वेळ ।
वर्तमान ॥ ७
वियोगात अश्रु ढळे । नाही ते प्रेमा च्या मुळे । स्वतःस करुणा वळे ।
एकटेपणी ॥ ८
स्वार्थावर जाता ध्यान । होतो मनाचा विराम । दुःख विषाद निष्प्राण ।
प्रेमस्थळी ॥ ९
शोध प्रेमाचा साहसी । अहंकारा ऐसी तैसी । सुरक्षेची पर्वा कैसी?।
प्रेमयोग्या॥ १०
(एकूण १६ पैकी हे दुसरे ५)

Tuesday, 16 December 2014

बोधस्पर्शिका

बोधस्पर्शिका
**************
अनुभवा ने जागे झालेले
अनुभवावर पुस्तक लिहतात
ते वाचुन जागे होण्याची कल्पना
झोपलेलेच करतात
- अरुण

Monday, 15 December 2014

आजच्या बोधस्पर्शिका

आजच्या बोधस्पर्शिका
********************
जीवन-गणित
-----------------
दोन अन् दोन चार होत असले
तरी जीवनात तसे होत नाही
ज्याला हे गुह्य दिसून येते तो
गणित जीवना चे चुकत नाही
**************************
बुद्धी ला मर्यादा
-------------------
डोळ्यांनी बघतो, ऐकत नाही
कानांनी ऐकतो, बघत नाही
हृदयाला जसे पूर्ण कळते
तसे बुद्धी ला कळत नाही
***************************
एकच नाणे
---------------
ओसरत जाणे रात्रीचे...असते
दिवसाचे उगत जाणे
रात्र आणि दिवस.....
दोन बाजू- एकच नाणे
************************
अरुण

Saturday, 13 December 2014

बोधस्पर्शिका

आजच्या बोधस्पर्शिका
**********************
शिल्लक शून्य
-----------------------
आयुष्य एका शून्यावर दुसरे
..दुसऱ्यावर तिसरे...अशी चढती भाजणी
आयुष्य......... शुन्यांचीच बेरीज
 अखेर शून्यच ज्याची मोजणी
************************
क्षण
------------
मागचे आठवत नाही.. पुढचे सुचत नाही
असा काल-कण....म्हणजेच .. क्षण
अन्यथा प्रत्येक क्षण म्हणजे
निव्वळ .................स्मृती ची वणवण
************************************
यांत्रिक कार्यक्रम
-------------------------------
दर रोजचा कार्यक्रम -
शाळा.ऑफिस..बाजारात जाणे....
या पेक्षा वेगळं आहे का
नियमितपणे देवळात जाणे ?
**************************
अरुण


Friday, 12 December 2014

आजच्या बोधस्पर्शिका

आजच्या बोधस्पर्शिका
**********************
एकत्व
------------------------
सागर शांत असो
अथवा खवळणारा
जर लाट त्यात लपली
तर तोही लाटेत लपणारा
******************************
मन माहेर
---------------
मित्र भेटतो बाहेर
शत्रू ही घडतो बाहेर
तरी मित्रत्व वा शत्रुत्वाचे..
मन.. हेच माहेर
**********************************
स्वसंवेद्य
-------------------
गंध फुलातून दरवळतो
फूल त्यास पसरत नाही
झरते प्रेम ह्रदयातुन
ह्रदय.. प्रेम करत नाही
********************
-अरुण

पान १२

आजच्या बोधस्पर्शिका
********************
समज-दृष्टी
---------------
औषध जाते पोटात
तरी दुःख दाताचे थांबते (तसेच)
दृष्टी समजुतीची स्पष्ट होताच
कटकट सुखदुःखाची संपते
***************************
ओळख
----------------
जन्माच्या वेळी प्रत्येक जण असतो
निनावी, अपरिचित, असीम
ओळख मिळताच तो होतो
सीमित....संकुचित.... हीन
**************************
झोप आणि स्वप्न
--------------------
झोप असली तरच
स्वप्न पडते
झोप..........स्वप्न मिटवण्याच्या भानगडीत
कधी न पडते
(विचार... हे दिवसा पडणारे स्वप्नच)
*******************
अरुण

आजच्या बोधस्पर्शिका
********************
आपला-परका
---------------
आपल्या-परक्यांच्या ह्या जगात
आपले आपले एक होतात
राष्ट्र-प्रेम, राष्ट्र-वादाचे स्तोम माजवत
हिसें..घृणे चे बी पेरतात
*****************************
भक्ती ला सीमा नाही
--------------------------
पायरीला केलेला नमस्कार जर
मूर्ती पर्यंत पोहचतो
मग, मूर्तीला केलेला नमस्कार
मूर्तितच कां खुंटतो ?
**************************
निर्बुद्ध बुद्धी
-------------------------
प्रवास करताना गाडीचे चाक
अधांतरी फिरून चालत नाही
अवधान सोडुन चाललेली बुद्धी
कांहीही साधत नाही
*******************************
अरुण

एक गज़ल बोधदायी
*********************
जगाया रे जगातुन सऽर आता
सजग होण्या मनातुन मऽर आता
---------------------------------
चाक जडले अंतरी त्यासी कशाला
शोधता हैराण होतो घऽर आता
-----------------------------------
पारदर्शी शब्द गीता, आंधळ्यांच्या
अडगळीतुन एक पडली भऽर आता
----------------------------------
फोडिले डोळे दिल्या हाता मशाली
अन् म्हणाले जा जगातुन तऽर आता
-----------------------------------
त्या 'दिव्यांनो'- जाणतो तुमची व्यथा मी
कोंडला पुतळ्यात तुमचा उऽर आता
-----------------
दिव्यांनो = दिव्य आत्म्यांनो

अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
************************
सार-असार
--------------
सगळ्यांचा संसार एकच
साधु जगतो त्याच्या सारात
तर असाधु ची रुचि
त्याच्या असारात
************************
खेळणं
---------------
बालकाला गुंतवून ठेवतं
त्याचं ते खेळणं
वेगळं नाही...मोठ्या मोठ्या ध्येयां साठी
माझं हे जीणं
********************
स्मृती
------------
पोकळी झाली न् झाली
की हवा त्यात भरते
वर्तमानाच्या शून्याला
स्मृती चटकन गिळते
************************
अरुण

आजच्या बोधस्पर्शिका
*********************
वेगळेपणाचा भावच मूर्खपणा
--------------------------------
माणूस स्वतः पासुन निसर्गाला
वेगळे समजत आहे
जणु बत्तासा साखरेची
चव शोधत आहे
**************************
जसा शिष्य तसा गुरू
-----------------------
ज्या पायरी वर शिष्य त्याला
त्या पायरीचाच गुरू लागतो
जशी मागणी होत जाते
तसाच पुरवठा होत जातो
************************
शोध सत्याचा..... कसा ?
जणु पाण्यात असून देखील
पाण्याचा शोध.....
करत राही........ मासा
*************************
अरुण

म्हातारेपण पाउल छोटे टाकीत अलगद येते
मिळता आदर नव-पीढीचा खरे साजरे होते

सम्मानासह समाधान जीवन मग सुरमय वाटे
वयापरत्वे तक्रारी..... तरि वृत्ति हसमुख राहते

आजच्या बोधस्पर्शिका
**********************
व्याख्या
--------------
व्याख्या सर्वच
अपूर्ण राहतात
सावल्या....चौकटीतुन
हळुच... निसटुन जातात
***********************
शब्द-निद्रा
-----------------
ध्येय,संकल्प,यश,कीर्ती....
असे शब्द शोभतात फक्त शब्दकोशात
यातले हाती काहीच नसते....
त्याच्या..........जो असतो दिव्य होशात
******************************
स्मृती-लीला
------------------
मेंदूच्या स्क्रीनवर
पडतो आहे ....स्मृती चा झोत
जागच्याजागीच माणुस..
हसतोय..रडतोय. .....बावरा होत
*****************************
अरुण

आजच्या बोधस्पर्शिका
**********************
शोधणे नक्की काय?
------------------------
'शोधा म्हणजे सापडेल'-
- असे महापुरुष म्हणतात
पण नक्की काय शोधायचंय ?
हे समजण्यातच युगे जातात
******************************
स्वचालित
---------------
"कुठली तरी सत्ता आहे या मागे"
असे म्हटल्या शिवाय राहवत नाही
खरे पाहता... ढकलत नाही कोणीही नदी
आणि वारा ही कुणी चालवत नाही
**********************************
झगडा सनातन
-------------------
"सुखदुःखाशी झगडत राहणे"
हेच बनते जीवन-ब्रीद
हा झगडा उद्भवूच नये-
याची नसे तजवीज
********************
-अरुण

पान ११

वास्तवाचे भान
----------------
चेंडू ला उसळण्यासाठी
जमिनीची साथ घ्यावी लागते
आदर्श जे उडतात वर वर
त्यांना भुई चाटावी लागते
********************
ईश्वरीय रितेपण
------------------------
भरलेला माठ, त्यातील पाण्याला
रितेपण माठाचे कधी कळेल काय?
ज्ञानाचे ओझे मिरवणाऱ्याला
ईश्वरीय रितेपण उमजेल काय?
******************************
अरुण

आजच्या बोधस्पर्शिका
**********************
दिव्य-प्रकाश
---------------
अंधार मिटवण्यासाठी
कुठलाही प्रकाश यावा लागतो
अंधार पेटवण्यासाठी मात्र
दिव्य-प्रकाशच व्हावा लागतो
***********************
अनुभव-दृष्टी
----------------
भिंतीवर आदळल्या शिवाय
वाट कुणी कडे असेल- कळुन येत नाही
नुसत्या सूचना पाठ केल्याने
वाट दिसत नाही
********************
फसगत
------------------------
वर वरची कारणे बघुन
होते फसगत
मुळापर्यंत जाणाऱ्यालाच
होते जीवन अवगत
******************************
अरुण

माझ्या हिंदी रुबाई चा अनुवाद
एक प्रयोग-
****************
हिंदी-
-------
मेरा..मेरा- कहना काम आया नही
पकडे रख्खा कुछ भी दे पाया नही
बेदरोदीवारसी दुनिया जिसे
कोई दुश्मन.. कोई हमसाया नही
*******************************
मराठी
---------
'हे माझे ते ही माझे'
व्यर्थच असते म्हणणे माझे
भिंती-दरवाजेच जर नसते तर..
कोणते तुझे अन् कोणते माझे?
******************************
हिंदी
-------
कहना उन्हें फ़िज़ूल.. सुनना जिन्हें सज़ा है
वैसे भी कह के देखा जैसे उन्हें रजा है
लफ़्ज़ों की कश्तियों से बातें पहुँच न पाती
एकसाथ डूबने का कुछ और ही मज़ा है
************************************
मराठी
---------
ज्यांना ऐकणेच त्रासाचे.. सांगणे निरस होते
ते ही व्यर्थ ठरले शब्द..ज्यात त्यांना रस होते
शब्दांच्या नौकेतुन त्यांच्या कडे जाण्यापेक्षा
त्यांच्या सकट आशयात डुंबणेच सरस होते
****************************************
अरुण
आजच्या बोधस्पर्शिका
**********************
सुखदुःख
---------------
दुःख आहे म्हणुन
सुख हवे
सुख सरणार तर नाही?
हे दुःख नवे
***********************
शब्द
----------------
निशब्दाला फोडुन
त्यात अर्थ भरले
आणि मन बनले...शब्दमय
मग निशब्द न उरले
********************
समर्पण
------------------------
प्रवाहात प्रवाह बनुन वाहणे
सहज सरल
निर्माल्य-भावाने वाहत राहील
त्यालाच जीवन कळल
******************************
अरुण


आजच्या बोधस्पर्शिका
**********************
नवीन
---------------
जुने बदलुन जे नवीन घडवले जाते
ते नवीन नसते
ज्यामुळे  जुन्याची आठवण ही होत नाही
तेच नवीन असते
***********************
प्रज्ञा
----------------
कारणे शोधण्याचे काम
वैज्ञानिकांचे
परम कारणात विलीन होण्याचे काम
प्रज्ञानिकांचे
********************
द्वैत
------------------------
जन्मानंतर कांहीच दिसात
वेगळेपण आले
माझे-तुझे करण्यातच
आयुष्य गेले

******************************
अरुण

दोन रुबाई - हिंदी
**********************
अंधेरा ही है जागीर-ओ-वसीयत है
अंधेरे से ही इंसा की बनी नीयत है
अंधेरे ने उजाले को नही देखा कभी
बेअसर रह गया इंसान, ये हक़ीक़त है
*********************************
बंद आँखों से टटोलो तो खोज बाकी है
बंद आँखों से पिलाये अजबसा साक़ी है?
ये तजुर्बे ......जो आतें हैं निकल जाते हैं
एक भी ऐसा नही..जिसपे नज़र जाती है
************************************
अरुण

आजच्या बोधस्पर्शिका
**********************
माये चे आरोपण
---------------------
खरे तर अक्षर म्हणजे शाई चा डाग
या पलीकडे काहीच नसतं
विशिष्ट डागा वर विशिष्ट अर्थाचं आरोपण
हेच मायेचं धन असतं
*************************************
कळते पण वळत नाही
-------------------------
ऐकुन प्रवचन कळले मला
ती 'साप नसून दोरी' आहे
पण अजुन ही अंतरात माझ्या
भीती ची शिरशिरी आहे
******************************


व्यवहार आणि वास्तव
-------------------------
व्यवहारात 'मी' पणा चा
फारच उपयोग झाला
सवय दाट जडली त्याची आणि
तोच माझा रोग झाला
*********************************
अरुण
दो रुबाई आज के लिए
***********************
दुनिया ने जो सराहा लगता मुझे लज़ीज़
जिस मर्जको हो इज्जत उस मर्ज का मरीज़
अब पाप भी करूं तो इज्जतभरा ही करता
दुनिया की वाहवाही.. सुनकर लगे अज़ीज़
**************************************
टुकड़ों में जो दिखे............ कैसा वजूद?
मेरा?..... तेरा? ............उसका वजूद?
जैसा... क़ुदरत को दिखे ...... वैसा दिखे
सच्चा है वही.. मेरा.. तेरा... सबका वजूद
******************************************
- अरुण
 आजच्या बोधस्पर्शिका
**********************
संस्कार
---------------------
संस्कारित अंतरधारा....
नदी सारखी मुक्त वाहत नाही
घाट..स्वार्थाचा असो का परमार्थाचा
तिथे थांबल्या शिवाय राहत नाही
************************************
'पोहचलेला'
-------------------------
ज्याला कुठेच पोहचणे नाही
त्यालाच म्हणावे 'पोहचलेला'
यश, किर्ती, ध्येय यांचा
अर्थ ज्यासी संपलेला
******************************
पिंजरा
-------------------------
ज्यांचे पिंजऱ्यावरच प्रेम
ते त्यातुन बाहेर कसे पडणार?
एक पिंजरा सुटला तर .. ?
दुसरा जवळ करणार
*********************************
अरुण

आजच्या बोधस्पर्शिका
**********************
नुसता धर्म-संस्कार
---------------------
दरवाजाशीच थांबुन राहीलो
आंत शिरणे राहुन गेले
हिंदू बनलो..मुस्लिम बनलो
धार्मिक बनणे राहुन गेले
**************************
सम्यक ज्ञान
------------------
एकीकडे पशुत्व...दुसरी कडे देवत्व
टोका कडे होई प्रवास
कधी महापशु तर कधी महादेव
न साधता आला 'माणूस खास'
*******************************
सत्य हेतुविण
-------------------
सूर्य उगवतो....पाऊस पडतो......
नसता कुठलेही...... प्रयोजन
माणसाच्या मायानगरीत
श्वांस घेण्यालाही... लागते धोरण
*******************************
अरुण

आजच्या बोधस्पर्शिका
**********************
अभंगता
---------------------
नदी किती ही शांत तरी
खडा पडताच उठतात तरंग
ज्यांची मने आकाश झाली
किती ही छेडा राहते अभंग
************************
ध्यानस्थ. किंवा डोळस
---------------------------------
'दळण दळणारा डोळस असतो... तेंव्हा
कुत्रा लांबच राहतो
षडरिपुं ही जागीच विरतात.. जेंव्हा
मनाचा गाभा ध्यानस्थ राहतो
*******************************
चिंतन म्हणजे भान
----------------------
चित्ताच्या अतिनिकट श्वासोश्वांस
तरी त्याचे नसते चिंतन
'सत्य' ह्या संकल्पनेत गुंतलेला
त्यावर करीत राहतो प्रवचन
*******************************
अरुण

पान १०

अभेद
-------------
मी शिवाय तू नाही
न तू शिवाय मी
कल्पनाच सा-या  -विरल्या की
ब्रह्मास्मी
०००००००००००००००००
अरुण
गीत मी विसरू कसा
***********************
त्या जिव्हारी वेदनेचा सूर मी विसरू कसा
जे जखमले शब्द त्यांचे गीत मी विसरू कसा
------------------
चार भिंती आडले ते मुक्त हसणे केवढे
ते खुळे रुसणे तरी समजावणे ते केवढे
त्या सुन्या भिंती सुने ते दार मी विसरू कसा
गीत मी विसरू कसा
------------------------
ते तुझे तुडवून जाणे स्वप्न पाया खालचे
तोरणाचे दोर तुटता मी उभ्याने पाह्यचे
ठेचल्या स्वप्नास जडले घाव मी विसरू कसा
गीत मी विसरू कसा
----------------------------------
मूक झाला देह आता प्राण झाले आंधळे
भावनेला विस्मृतीचे कवच लावुन कोंडिले
मूक देही बोलका तो श्वास मी विसरू कसा
गीत मी विसरू कसा
-------------------------
त्या जिव्हारी वेदनेचा सूर मी विसरू कसा
जे जखमले शब्द त्यांचे गीत मी विसरू कसा
अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
अस्वस्थ मन
*************
सावली कधी धरणीला
कुरतडत नाही
मग मन कां बरे
मेंदूला सतवत राही?
-----------------
नादान माणूस
**************
गवत पुढे खेचते
कोडा मागून हाकतो
घोडा बनुन जगण्यालाच का मी
जीवन समजुन चालतो
----------------------------
अंध आणि डोळस
*******************
'श्रद्धा' ठेवतात अनुभवापूर्वी
'श्रद्धा' घडते अनुभवानंतर
शब्द  'श्रद्धा' च.... तरी पण
दोघात मोठे अंतर
----------------------
अरुण

निष्फळ शोध
००००००००००००००
पिंपळाचे हे पान न शोधे पिंपळ सारा
मी- झुळुक, शोधतो गीते मध्ये वादळवारा
------
ती लाट कधी ना मोजत बसली सागर-सीमा
स्वर झंकारुन ही मौन साधते ती स्वरवीणा
अखंड आकाशी मी झालो खंडित तारा
मी- झुळुक, शोधतो गीते मध्ये वादळवारा
----------
हा शोध रचे डोंगर शब्दांचा माथ्यावरती
ते शब्द एकमेकांची नुसती ओळख देती
'त्या' मूळ इशाऱ्याला शब्दातुन नसे निवारा
मी- झुळुक, शोधतो गीते मध्ये वादळवारा
----------
'त्या' शुद्ध लयीला झाकुन घेते कविता माझी
शतदा ऐकावी तरी नादते कविता माझी
'त्या' शुद्ध स्थितीवर अर्थाचा पसरीत पसारा
मी- झुळुक, शोधतो गीते मध्ये वादळवारा
---------
पिंपळाचे हे पान न शोधे पिंपळ सारा
मी- झुळुक, शोधतो गीते मध्ये वादळवारा
- अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
***********************
असीम होते सीम
--------------------
पांच संवेदन दारे, त्यातुन
सृष्टी आत शिरते
स्पर्श होता.....स्मृती अन् बुद्धीचा,
ती फारच क्षुल्लक बनते
******
पुनर्जन्म
------------
पाण्यावर बुडबुडे-
एक जातो तर एक येतो
दोघात जोडुन नाते, माणुस
पुनर्जन्म कल्पितो
**********
जीवनरेष
------------
बिंदु बिंदु जोडल्याने
रेषा दिसुन येते, तसेच
प्रत्येक स्वतंत्र प्राणाचीच
जीवनरेष होते
*************************
अरुण

मुक्त जीवन
--------------
गाठी आहेत पण बंधन नाही
नाती आहेत पण संबंध नाही
भिंती आहेत पण कैद नाही
मृगजळ आहे पण फसवणूक नाही
आहेपण आहे पण 'मी आहे' असे नाही
कार्य आहे पण कर्ता नाही
माहिती आहे पण गर्व नाही
द्वैत आहे पण संघर्ष नाही
देवत्व आहे पण देव नाही
अरुण
आजच्या बोधस्पर्शिका
**********************
आत्म-अज्ञान
---------------
जळत्या मेणबत्तीच्या...
खालीच उरला काळोख
जगातील सर्व ज्ञान माणसाला
फक्त स्व ची नाही ओळख
***********************
मृगजळ
-----------
नांव गाव पत्ता सारं
सोयी साठीच लागतं
जर नांव-गावाला अस्मितेची तहान लागली
तर मग प्रतिष्ठेचे मृगजळच लागतं
***********************************
माहिती ची गरज
------------------------
कुठलीही माहिती नसतां देखील
प्राणी जगतात सहज
ध्यानशून्य माणसालाच
माहितीची गरज
**********************
अरुण
बोध- गज़ल
----------------
ही इथे अंधारली सारीच वस्ती
आरसा दावून कोणा काय होणे
***********
निसटते हातातुनी अस्तित्व जे
सावली पकडून त्याची काय होणे
********
बाहुलीचा खेळ माझा अजुन चालू
लोटुनी वर्षे वयाची काय होणे
*********
चाक फिरता आपल्या जागीच नुसते
वाढवोनी वेग केवळ काय होणे
*******
बांधिला गोतावळा श्वासात कचकुन
साधुनी एकांत जीवा काय होणे
********
दानवा ला देव करण्या चे प्रयोजन
दानवी ह्या मानवाने काय होणे
******************************
- अरुण











'सूर्य' मावळे पर्यंत तरी....
----------------------------
सावली खोडता येत नाही
मोडता येत नाही
जाळता ही येत नाही
उपाय एकच -
ज्याची सावली त्यालाच
बाजू ला सारून
प्रकाशाला वाट करून देणे

पण ज्याला बाजूला सारायचे
तोच जर सावली कशी  जाईल ?
याची नुसती काळजी करत... जागीच बसुन राहिला.. तर?
तर त्याचा 'सूर्य' मावळे पर्यंत तरी कांहीही होणे नाही
अरुण










आजच्या बोधस्पर्शिका
**********************
अनावधान
---------------
डोक्यातील नोंदी आठवून
वाट शोधता येते
तरी पायाखालच्या भुईकडे
दुर्लक्षच होते
***********************

Thursday, 11 December 2014

पान ९

मृगजळ
-----------
मृगजळच बनते
जीवन-आशय
पाणी फक्त
संशोधना चा विषय
...........................

अरुण

आजच्या बोध-स्पर्शिका
************************
मनाची सावली
-------------------
धरती ला सावली
चिपकत नाही
मनाची सावली
देहाला सोडत नाही
............................
पुढे आणि मागे
-------------------
एक पाय पुढे- स्वप्नात
दुसरा मागे -आठवणीत
वर्तमान ?
नसतेच कधी गणतीत
...............................

अवधान
------------
मनाचा सृष्टीशी व्यापार
म्हणजे संसार
निर्मनाचा सृष्टीशी संपर्क
म्हणजे अवधान

अरुण

हा एक- तत्वबोध
(मराठमोळ्या हिंदीतुन)
**********************
न कुछभी आगे इथे
न कुछभी... पिछाड़ी
तरी ही बंदा चालवतो आहे
मागे बघुनच...गाडी
- अरुण

बोध-स्पर्शिका
***************
अर्थ
------
जसा लावावा तसाच
अर्थ लागतो
कारण शब्दात
अर्थ नसतोच
...........................

जाग
------
झोपेने केले कितीही प्रयत्न
तरी जाग येत नाही
जाग असते कशी?,
हे झोपेला माहीतच नाही
................................

माझेपण
--------
प्रत्येकाचे माझेपण
काल्पनिक असते
कल्पना वितळली की
माझेपण विझते
... अरुण

आजच्या बोध-स्पर्शिका
***********************
माणूस
--------
कांहीसा पशु कांहीसा देव,
असे मिश्रण म्हणजे- माणूस
कांहीच पूर्ण नाही ज्यात
असे अर्धवटपण म्हणजे ही- माणूस
.............................

चित्र विचित्र
-----------
जिथे जो उपयुक्त रंग
तसाच भरून चित्र बने
लालवादी, भगवेवादी
अशांचे चित्र, विचित्र बने
..............................

स्वर्ग-नर्क-संसार
--------------------
अस्तित्वमयी स्वर्गात
अहंकारमयी नर्कात
जो दोन्ही पासुन पळे
तो संसारात
अरुण
फ़ार पूर्वी केलेल्या रचना, त्यातली ही
एक ग़ज़ल
************
मोडली गळ्यात हाक.. बोलवू कशी ?
वाट आंधळी..खुणेत.. दाखवू कशी ?

घालमेल सावरीत दिवस संपला
ही उदास सांजवेळ.. घालवू कशी ?

घर घरातले दिवे जळून झोपले
अर्ध पेटल्या दिव्यास, मालवू कशी ?

श्वांस भार पावलास वाटले अता
स्वप्न पांगळे धरून चालवू कशी ?

अर्थ सूर ताल नाद दूर गुंतले
शब्द कोरडे उगाच आळवू कशी ?
अरुण


अभी न जाओ छोड़कर कि दिल अभी.....
ह्या हिंदी गाण्या मुळे मला सुचलेले
हे मराठी गीत
********************************

थांब इथे जाऊ नको
मज अंतर देऊ नको

चंद्रा करिता नभात चांदण्याही थांबल्या
काठा सह गीत गात लाटा ही रंगल्या
बेला ही प्रीतीची तिज निराश ठेऊ नको
थांब इथे............

ह्रदया च्या तारांवर सूर मस्त साधला
मिलनाच्या पदराला भाग्यरंग लाभला
भाग्याची हीच वेळ पुन्हा वाट पाहू नको
थांब इथे............

रात्रीचे राज्य इथे दिवस अजुन दूर उभा
ह्रदयांचे मंगल हे....... स्वप्नांची ही सभा
जाते.. मी जाते.. हे बोल पुन्हा बोलू नको
थांब इथे............

थांब इथे जाऊ नको
मज अंतर देऊ नको
अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
***********************
अहंकारा ची विहीर
----------------------
आकाशा चे पंख घेऊन,
जो सागरा वरून उडतो
कसा साधणार तो संवाद तयाशी
जो विहिरीतच रमतो ?
.............................
पाटी
----------
मोठ्यां चे ज्ञान,
छोट्यांच्या पाटीवर आले
वाटे छोट्यांना की
ते त्यांनीच मिळवले
...............................
गुरु
------
ज्याचे बोट धरून चालतो
तो आपला वाटसरू
ज्याच्या प्रकाशात चालतो
तोच फक्त आपला गुरु
.............................................. अरुण

बोध-स्पर्शिका
**************
गढुळ मनांत केंव्हा तरी
अवधानंच वादळ येतं
बोध स्पर्शतो आणि चार ओळीत
शहाणपण तरंगत राहतं
.............

वा-यावर वा-याने
काढलेल्या रेषा
मन म्हणजे-
मनाचाच तमाशा
.................

देव आहे सर्वत्र-
असे केवळ म्हणत राहतो
कारण मला तो
शोधायचाच नसतो
..............
अरुण






बोध-स्पर्शिका
**************
अवधान-भंग
------------------------
श्वांसा चा क्षण
स्मृती ने गिळला
स्मृति-कण बनुन
मनांत शिरला
....................
सुख-दु:ख
---------------
आनंद- सूर्याला
मनाचे ढग ग्रासतात
ऊन-सावली बनुन
माणसाला त्रासतात
.......................
शहाणपण
---------------
उर्मी आल्यावरच
पिसारा उलगडतो
वेडेपणा झोंबल्यावरच
शहाणपणा उमलतो
..........................
अरुण


बोध-स्पर्शिका
************
अस्तित्व म्हणजे-
फक्त  'असणे'
बुद्धी चे काम- असलेल्यांना
मोजत बसणे
--------------------
मिसळुन राहते जरि
खोटे आणि खरे
तर.. कोणते खोटे, कोणते खरे?
जाणुन घेणे बरे
----------------------
सर्वत्र आवाज...
दडली त्यातच... शांती
त्यालाच कळे ती
घेई जो... आवाजातही विश्रांती
---------------
अरुण


आज च्या बोध-स्पर्शिका
************************
अनुयायी
-----------
'बुद्ध' येतात..थांबतात व
निघून जातात
अनुयायी त्यांच्या सावल्या
थिजवत बसतात
..........................
सत्य बघणारी दृष्टी
------------------------
कागदा वरले अक्षर
मिटवायचे नसते
आकाश ते -  कागद आणि अक्षरा मधले
बघायचे असते
...........................
गर्दी ज्ञानाची
------------------
वस्ती डोक्यात शब्दांची
घनदाट वसते
समज-उमजेला मग
जागाच नसते
.....................
अरुण


आजच्या बोधस्पर्शिका
***********************
न तुटते न फ़ुटते माती
फ़ुटते तिचे पात्र
स्वसंवेदनेला 'मी-पण' आले
आता जपा... दिवस रात्र
..................
तहानेला... न जात न धर्म
ज्यास तहान तो. ................शोधे पाणी
इथला तर किस्साच अलग
इथे 'तहाने' चे देवुळ त्यात 'पाण्या' वरली गाणी
........................
जगातले सारे ज्ञान
जरि माथ्यात भरले
पण ज्यांना माथे कळले
तेच खरे तरले
.........................
- अरुण




जवळ जवळ ३० वर्षां पूर्वी लिहलेली
ही ग़ज़ल
****************
कमनशीबी मी पुनः आलो तुझ्या दारी असा
ओळखी च्या त्याच वाटा, मी तयांना पारखा
**********
अंतरी घडवीत बसलो मागल्या भेटी पुनः
त्याच जागा, मी तयांना प्रश्नचिंन्हा सारखा
***********
काल होते परिचयाचे शहर जो तो आपला
परकीयांची आज गर्दी, पाहुणा मी पोरका
*************
टाकलेला मी असा, मज धर्मशाळा ही बरी
कैक येती कैक जाती, नाही कोणी लाडका
****************
त्या घराला दूर बसुनी पाहतो टक लावुनी
मज तिथे आभाळ दिसते, भंगल्या जरि तारका
*******
अरुण

आजच्या बोध-स्पर्शिका
*************************
सवय
---------
बेहोशीत जी जगते
ती सवय
जागृतीचे तिला
नेहमीच भय
..................
चित्र- बघायचे की चघळायचे ?
--------------------------------
डोळ्यांना अख्खे चित्र
दिसते प्रत्यक्षात
बुद्धी चघळते
टप्या टप्यात
...................
उत्तर असते प्रश्नातच
------------------------
झाडा मागुन प्रकाश होता
पुढे सावली पडते
प्रश्नावर....  घडता चिंतन
उत्तर...उमजुन येते
..............................
अरुण
माझ्या जुन्या रचनां पैकीच
ही गजल ( राग देस मधे )
**************************
ठेचले वाटे मधे जे स्वप्न केले मी उभे
दूर बसुनी आज कोणी दोन आँसू ढाळले
-----------------------------------------
पावले आली पळोनी विस्मृती च्या अंगणी
काल जे मिरवीत होतो आज येथे गाडले
---------------------------------------------
रिक्त हातांना मिळाले काम तर भरपूर आता
बस अता उचलीत जाणे डाव जे जे मांडिले
--------------------------------------------
मी करावी खंत कैसी.. माळ तुटता मीलनाची
कांही मणी माझे ज़री ते..कांही त्यांचे सांडले
---------------------------------------------
अरुण

आजच्या बोध-स्पर्शिका
**************************
गीता वाचन
------------------
गीता वाचत राहीलो
अाशय येईना ध्यानात-
मग 'तू तुलाच वाच'- असे अचानक
गीताच सांगते कानात
०००००००००००००००००००००००००
प्रयत्नच अडसर
----------------------------
अंधार ढकलुन पण
दूर जात नाही...तेंव्हा वाटते
अंधाराशी झगडणाराच तर कुठे
अंधाराचे घर नाही?
००००००००००००००००००००
अभेद
-------------
मी शिवाय तू नाही
न तू शिवाय मी

पान ८

सूर्य-मंदिर खास
------------------
हे खुले आकाश
लख्ख सूर्य प्रकाश
त्या खाली बनवले मी
सूर्य मंदिर खास
अरुण



आजच्या बोध-स्पर्शिका
***********************
आत्मज्ञान
-------------
कांहीतरी पेटवा अन्
अंधार मिटवा
दिव्य-प्रकाश हवा असेल तर
अंधारच पेटवा
............................

मुक्ती
------------
भिंतीवर आदळल्या शिवाय
दार कुठेय ? हे उमजत नाही
भिंतीला जे पूजत बसतात, त्यांना
दार कधीच दिसत नाही
............................

मूळ कारण
--------------
वरवर ची कारणे मिटवून,
होत नाही सुटका
मुळापर्यंत पोहचताच
ज्ञानाचा झटका
अरुण

आजच्या बोध-स्पर्शिका
***********************
चौकस
-----------
पक्ष्यांना ज्ञान नसते
म्हणुन राहतात चौकस
माणसाचा मात्र
ज्ञानावरच फोकस
.............................

थोतांड
------------
उसळण्यासाठी चेंडू
फरशीवर पडतो
माणूस पडण्या आधीच
आदर्श धरतो
...............................

आंतरिक रितेपण
----------------------
माठ पाण्याने भरला तुडुंब
पाण्याला रितेपण कळेना
माणसाच्या डोळ्यात ज्ञानाची गर्दी
दृष्टी ला जागा उरेना

-अरुण

आजच्या बोध-स्पर्शिका
***********************
बुद्धी
---------
संवेदने ची पांच दारे
सृष्टी-विशाल आंत जाते
स्मृती-बुद्धी च्या गुहेत
क्षुल्लक बनुन राहते
............................

पुनर्जन्म
------------
तिकडचा बुडबुडा गेला
इकडे नवीन आला
त्याचाच तर हा
पुनर्जन्म नसेल झाला ?
...............................

पान ७

जीवन केवळ खेळ
********************
जया कळले ही केवळ भूमिका आहे,
स्वताला पात्र समजुन.............. खेळ खेळी
कधी हिंदु कधी मुस्लिम... कसा ही वेश असु दे
मिळे तो वेश करुनी..................खेळ खेळी

जया असती नयन उघड़े,
कशा लागे........तयासी तीर्थ काशी... तीर्थ काबा
जगत हे प्राण जीवन......सकल जीवांचे
न केवळ माणसाची............... बुद्धी........आभा

जया दिसले क्षणातील जगत पूरे
कशा त्याने करावी मोजणी..... सा-या जगाची
जया जमले कणातुन राहणे.....अख्या
अशासी लाभले ऐश्वर्य अन् .......सत्ता जगाची
अरुण

एक चिंतन
************
'गुळा चा गणपति आणि गुळाचाच नैवेद्य'
हा वाकप्रचार बरेच काही सुचवून जातो

आपणा जवळ, आपणा सकट,
फक्त आहे हे एक अस्तित्व, ह्या पलिकडे
काही ही नाही
कल्पनेचा वापर वेग वेगळ्या संदर्भात
याचे वेगवेगळे तुकडे कल्पून बुद्धीला
सामग्री पुरवतो, सर्व जोड संकल्पना निर्माण करतो
विचार ह्या सामग्री च्या जिवावरच जिवंत राहतात
- अरुण

















बोध स्पर्शिका
*****************
मूर्ख दोन प्रकार चे
------------------------
शहाणपणाचा अभाव असणारा
मूर्खच
शहाणपणाचा भाव मिरवणारा ही
मूर्खच
..................
मनातच प्रवास
-------------------
श्वास श्वास जगतो, त्यास
न आस न इतिहास
श्वासांचा विसर पडलेला करतो
फक्त मनातच प्रवास
.........................
मनुष्यच परावलंबी
---------------------
सर्व प्राण्यांत मनुष्यच
परावलंबी
म्हणून बुद्धी ची लागे त्यास गरज
होण्या स्वावलंबी
-अरुण

बोध-स्पर्शिका
****************
व्यक्ति आणि व्यक्तिमत्व
-----------------------------
कोणती भाषा लिहिणे यावर
कागदा चा पोत ठरत नसतो
व्यक्तिमत्व कसे ही असो
व्यक्ति मात्र एकच असतो
............................

तहानल्यां चे गोत
--------------------
तहान केवळ माझीच
ओलावतो माझेच मी ओठ
जर ती असती सामुहिक तर
बनले असते 'तहानल्यांचे' ही गोत
...............................

पान ६




बघण्यात भूल झाली
*********************
बघण्यात भूल झाली
जे समोर आहे ते नीट दिसेनासे झाले
आणि मग अवतरली कल्पना
तिला अंकुर फुटले.... त्याचे वृक्ष झाले
वृक्षातुन वृक्षे उपजत गेली आणि आता हे
कल्पनेचे घनदाट जंगल... म्हणजेच 'मी' आणि
ह्या 'मी'ला जे काही दिसते आहे तेच 'मी' चे हे जग

पण कांहीच्याच बाबतीत अचानक निराळे  घडले......
बघण्यातली भूल होते वेळीच दिसुन आली...
आणि मग समोर जे जसे आहे तसेच स्पष्ट झाले
मग कसली आली कल्पना ?.. कसले अंकुर?
मग... कुठली वृक्षे आणि कोणते जंगल?
मग त्यांचे साठी समोर जे दिसते ते सर्व मंगलच मंगल....
अरुण


मराठी
-------------
पक्षी दोन
***********
पक्षी दोन
एक पिंज-यात
दुसरा िपंज-या बाहेर त्याच्या कळपात....

पिंज-यातल्याला
एकटेपणातुन अचानक एकांत गवसतो
जागच्या जागीच पिंज-याचे पिंजरेपण उमगते
आणि तिथेच राहुन त्याच्या बंधनांचा गंुता उसवल्याने
आता तो गातोय्  आकाशाच्या लयकारीत

बाहेरचा,
कळपात राहुन उडतोय् खुल्या आकाशात
परंतु कळप-संस्कृतीशी बांधिलकी जपता जपता
दिसेनासे झाले त्याला, आकाशाचे खुलेपण
खुलेपण सरल्याने तो गातो आहे कळपाच्या लयकारीत
अरुण

सागर आणि त्याच्या लाटा
किंवा ही लाट आणि ती लाट,
यांचे नाते काय?
अशा कितीक गैरवाजवी प्रश्नांचा
शोध घेण्यात ऊर्जा झिझत आहे


कांही बोध-स्पर्शिका
~~~~~~~~~~~~~~~~~

पोहचलेला
************

आहे तिथेच राहुन,

ज्याला स्वर्ग गवसला

आध्यात्म त्यालाच म्हणते

पोहचलेला

.............................

पिंजरा
*********

पिंजराच जर भावत असेल

तर बाहेर कसे पडणार ?

एक पिंजरा सुटला तर

दुसरा जवळ करणार

...............................

दरवाजा
***********

दरवाजाशीच मोह जडला

आंत शिरणे राहुन गेले

हिंदू बनलो, मुस्लिम बनलो

धार्मिक बनणे राहुन गेले
......................................


अरुण

पान ५

एक जीवत्व नाही तोवर...
******************************
डाव्या हाताचे उजव्या हाताशी काय बरे नाते?
एकच जीव दोघांत वावरतोय्... ... एकजीवत्व तिथे
मग कसले आले नाते?
'नात्या' चा जन्म जीव-विभागणी नंतर
सजीवा चे तुकडे करुन तया निर्जीव केल्या नंतर......

जिथे जिथे विभागणी तिथे तिथे हे असेच
दोन निर्जीवां ना प्रेमाने जोडा का जोमा ने जोडा
मीलन वरवर चेच...

'एकजीवत्वाला'  कुठलाच पर्याय नाही म्हणुनच
 जगात हा एक विषय ....फक्त चर्चेचा..
सर्व कांही कामचलाऊ...हे असेच चालत राहणार....
तंटे, झगडे,हिंसा, युद्ध..... सलोखे, समझौते आणि युद्ध विराम
निर्जीव झालेल्या माणसांच्या तुकड्यांत, टोळ्यांत...
..हे असेच चालत राहणार....
अरुण
कथा कथा अनेक कथा
***********************
कथा कथा अनेक कथा...माझी तुझी त्याची कथा
प्रत्येका ची प्रत्येक वेळी...वेगळीच कथा
जग हे कथांचाच अंतरसंवाद
कथेंनीच केलेली कथेंची उजळणी
कथेंना पडणा-या स्वप्नांची कहाणी
कथा अनेक असल्या तरी संवेदना त्याच आहेत
धागे वेगळे असले तरी गुंता तोच आहे
तेच हसू, तेच रडू, तोच तणाव, तोच संघर्ष
तोच जिव्हाळा,तोच दुरावा
भाषा वेगळी, पात्र वेगळे, कारणें अनंत
तरी तीच आशा, तीच खंत
कथांना अनेक दालने, दिशा ही अनेक
पण गाभा एकच
वर्तुळे अनेक पण केंद्र एकच
ज्यांना हे केंद्र उलगडले
त्यांचे जगच उजळले
- अरुण

बाजारू स्त्री ची व्यथा..चीड...आकस
***********************************

चुकले पाऊल रस्त्यावरती, जबर लागली ठेच रे
जीव सांडला भर बाजारी, दौलत फेकुन वेच रे
*******
प्रीत खाजगी चिरडुन गेली इश्काच्या गर्दी खाली
घुंघरू चे हे नाद..हरवली प्रणय सुरांची नवलाई
प्रत्येकाशी लगट सारखे.. प्रत्येकी मन तेच रे
*********
रुक्ष अधाशी नजरा भियवीत, केविलवाणी नार रसाळ
फिरता हा मदनाचा भवरा, मर्द जाहला किती मवाळ ?
कोण कुणावर वरचढ येथे ? हाच अनोखा पेच रे
********
घर करण्याचे स्वप्न पाहिले, बेघर झाले फसली वाट
दिवस रात हे बाजाराचे, झाले सर्वांची वहिवाट
खोटे रमणे जगा रमविणे अता नशिबी हेच रे
***********
 
दूर देवळे बंधित बसले.. ह्या कोठयांचे रचनाकार
परमेशाच्या माथ्यावरती ठेवित ह्या पापाचा भार
तुझ्याच घराच्या तुळशीची ही पाने समजुन वेच रे
**********
चुकले पाऊल रस्त्यावरती, जबर लागली ठेच रे
जीव सांडला भर बाजारी,दौलत फेकुन वेच रे


धावत्या नदी सवेच धावतो किनारा
श्वांस घाट करी प्रवास, जीवन क्षणधारा

वा-यावर पान उडे, पानावर जीव उभा
धरपडतो तू जपण्या क्षणभंगुर प्राण उगा
ही 'त्याची' फुंकर रे, हा 'त्याचा' वारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

रेघोट्या काढोनी धरणी चे भाग करी
एक तुला प्राणप्रीय, दुसरा परदेश परी
हा 'त्याच्या' सृष्टीचा पसरला पसारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

जीवन हे गंध देत फुलणा-या सुमनांचे
प्रेम करीत सर्वांवर, जगणा-या सुजनांचे
'तो' करुणा सागर, 'तो' प्रेमभाव सारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

गेलेले सरले अन् येणारा एक भास
असणारा दिवस खरा, जिथे खराखुरा वास
असणारा क्षण जिवंत.. ईशचा निवारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

धावत्या नदी सवेच धावतो किनारा
श्वांस घाट करी प्रवास, जीवन क्षणधारा
अरुण


प्रेम
*******
प्रेमा ला प्रेमभंगाची काळजी नाही,
प्रेम कशाबद्दलही possessive नाही
कारण, प्रेम पूर्णतः निरपेक्ष असते
कारण, ते फुलातुन पसरणा-या सुगंधा सारखे, सर्वांसाठी असते,
प्रेम जन्मते अखंड पूर्णत्वाच्या ठायी
मग 'मी'पण   किंवा अहंकार ज्याचे अस्तित्त्वच खंडत्वातुन साकार होते,
प्रेमाची भाषा कशी काय बोलू शकणार ?
त्याचे प्रेम 'निर्मळ' मानले जात असले तरी त्या प्रेमाला
अपेक्षेंचा दर्प हा असतोच.......

अपेक्षा हा अहंकाराचा आत्माच आणि या उलट
निरपेक्ष भाव हा पूर्णत्वाचा स्वभाव
तरी ह्या देव-घेवाच्या व्यवहारी जगात
तथाकथित प्रेमाचे उद्दात कौतुक कां बरे होत असते?
प्रेमावर  अगणित कहाण्या रचल्या गेल्या
कितीक कविता लिहून झाल्या, याचा हिसाबच नाही

प्रेम.... प्रेमा सारखे करता आले नाही,
पण प्रेमा सारखे सही सही भासवता आले तरी
ते Great ठरते
अपेक्षांनी गंुफलेल्या ह्या नात्यां च्या जगात,
माझे-तुझे करणा-या ह्या मानवी मनांत,
प्रेम शब्दाला एवढी प्रतिष्ठा कां?
- अरुण

"प्रयत्न सतत चालू असावे, श्रमा विना कांहीच साध्य होणार नाही"
हे पाठ ऐकतच माणुस लहानाचा मोठा होतो
'जे आहे आणि जे असायला हवे', ह्या दोन परस्पर विरोधी
गोष्टीं मधील संघर्ष घडवण्यातच
साध्यवेड्या प्रयत्नशील माणसाची ऊर्जा वाया जात असते



सहजिका
***********
थेंब क्षणांचे बरसत राहतात
बरसत बरसत गोठुन जातात, काळाचे ओझे बनुन
पण एक ही क्षण न बरसला असा की ज्यात
सारे जीवनच सामावुन जावे, काळाला संपवुन
- अरुण

पान ४

योग मिलन न होता हा
**************************
-रंग भावना विचार रेषा, चित्तावरती चित्र दिसे
ह्या चित्रातुन भुललो ऐसा, रंग दिसे ना रेष दिसे

-पहाट उघडी डोळे, दिसले रात दिसातील भेद मला
ह्या झोपेतुन जाग शोधतो, नच दिसते, हा खेद मला

- ओल्या माती वळण पाउनी, मूर्तिमंत मी झालो रे
ह्या वळणांचे बंध न तुटले, मी अनंत न झालो रे

- फुलण्या साठी माती मागे बीज, बोध मज होतो हा
संस्कारांचे त्यावर वेष्टण, योग मिलन न होता हा
-    अरुण

सिनेमा च्या पडद्यावर.....
*************************
सिनेमा च्या पडद्यावर
अवतरतात
चालती बोलती चित्रे....
प्रकाश सावली चा निव्वळ लपंडाव
अन् त्यातच प्रेक्षक मनाला जाणवतो
कथा...आशय....अन् भाव
प्रेक्षक हसतो, रडतो, कथेत रमतो
आणि अचानक.....
त्याचे ध्यान मागच्या झरोक्यातुन येणा-या
प्रकाश झोतावर स्थिरावते आणि तो...
चित्तशून्यते च्या झटक्याने अंतर्मुख होतो
त्याला कळुन चुकते....
इथे अस्तित्व आहे केवळ प्रकाशझोताचंच
न कथेचं, न आशयाचं न कुठल्याच भावभावनांचं
अरुण






जागलेलाच जागतो
********************
तु आंत जागता अचुक जागलो होतो
जरि तुझ्यात विरण्या साठी आलो होतो

मी ऊंच उसळलो दूर उडविला डोळा
चमचमत्या आकाशाचा लेवुन झोळा
मी हळुच चांदणे आंत प्राषलो होतो
जरि तुझ्यात विरण्यासाठी आलो होतो

तु आंत जागता अचुक जागलो होतो
जरि तुझ्यात विरण्या साठी आलो होतो

फोडुन माती मी त्यात मिसळले प्राण
मी कळी कळी च्या आंत शोधिले रान
परिरक्ता आंतुन फूल उमललो होतो
जरि तुझ्यात विरण्या साठी आलो होतो

तु आंत जागता अचुक जागलो होतो
जरि तुझ्यात विरण्या साठी आलो होतो

ते बोट धुक्यातील धरुन निघालो दूर
मी दाटदवाच्या खोल बांधिले घर
ती गहन पोकळी आंत भोगलो होतो
जरि तुझ्यात विरण्या साठी आलो होतो

तु आंत जागता अचुक जागलो होतो
जरि तुझ्यात विरण्या साठी आलो होतो


मी हाक फेकली अथांग सागर काठी
लाटे लाटेला चुंबित गेली होती
परि आंत अनंताशी कुजबुजलो होतो
जरि तुझ्यात विरण्या साठी आलो होतो

तु आंत जागता अचुक जागलो होतो
जरि तुझ्यात विरण्या साठी आलो होतो
-अरुण

पान ३

योग मिलन न होता हा
**************************
-रंग भावना विचार रेषा, चित्तावरती चित्र दिसे
ह्या चित्रातुन भुललो ऐसा, रंग दिसे ना रेष दिसे

-पहाट उघडी डोळे, दिसले रात दिसातील भेद मला
ह्या झोपेतुन जाग शोधतो, नच दिसते, हा खेद मला

- ओल्या माती वळण पाउनी, मूर्तिमंत मी झालो रे
ह्या वळणांचे बंध न तुटले, मी अनंत न झालो रे

- फुलण्या साठी माती मागे बीज, बोध मज होतो हा
संस्कारांचे त्यावर वेष्टण, योग मिलन न होता हा
-    अरुण

सिनेमा च्या पडद्यावर.....
*************************
सिनेमा च्या पडद्यावर
अवतरतात
चालती बोलती चित्रे....
प्रकाश सावली चा निव्वळ लपंडाव
अन् त्यातच प्रेक्षक मनाला जाणवतो
कथा...आशय....अन् भाव
प्रेक्षक हसतो, रडतो, कथेत रमतो
आणि अचानक.....
त्याचे ध्यान मागच्या झरोक्यातुन येणा-या
प्रकाश झोतावर स्थिरावते आणि तो...
चित्तशून्यते च्या झटक्याने अंतर्मुख होतो
त्याला कळुन चुकते....
इथे अस्तित्व आहे केवळ प्रकाशझोताचंच
न कथेचं, न आशयाचं न कुठल्याच भावभावनांचं
अरुण

पान २

मराठी –
एकांत-
गर्दीला वैतागून एकटा होतो
एकटेपणा ला कंटाळुन गर्दीत जातो
जंगलाच्या एकांतात मात्र
प्रत्येक झाड न एकटे असते, न गर्दीत
-अरुण

एकाग्रते ला व्यत्यय बाधक ठरतो
समग्रतेला कुठलाच व्यत्यय नसतो
-अरुण  
अच्छों- बुरों से सोहबत तो कर के देख ली
बदनाम ही बचे जो जिनको न मिल सका

भल्यांना भेटावे लागले कारण माझं जग भल्यांचं होतं
भेटावेसे वाटले बुऱ्यांनाही कारण माझं ही मन बुरं होतं
भीतीनं बदनामी च्या, भेटलोच नव्हतो बदनाम लोकांस
भेटल्यावर कळलं की त्यांचच मन खरं होतं
-अरुण
मराठी -
सुवास फुलांचा येतो जवळ
आपणास भेटण्यासाठी
जवळ जातो फुलांच्या आपण

 
मराठी -
झाड आड येता पडते सावली
जमीनीवर
कोणाचीच मालकी नाही - न सुर्याची, न जमीनीची
तिच्यावर
-अरुण
सहजिका-
सगळेच प्रश्न, प्रश्न नसतात
बरेच फक्त विचारण्याजोगे
तर कांहीच....
विचार करण्याजोगे असतात
-अरुण

पान १

 जीवन-ध्यानी
**************
जगणे ज्यांना असह्य होते ते
आत्महत्ये कडे वळतात
जगणे ज्यांना कंटाळवाणे वाटते ते
इच्छा-मरण मिळवू बघतात
जीवनातल्या इच्छांची निरर्थकता ज्यांना बोचते ते
सन्यास घेतात आणि
समोरून येणाऱ्या सुख- दुःखात जे
न बुडता तरंगत राहतात
तेच असतात जीवन-ध्यानी
-अरुण

दोन अन् दोन चार होत असले
तरी जीवनात तसे होत नाही
ज्याला हे गुह्य दिसून येते तो
गणित जीवना चे चुकत नाही
-अरुण
मराठी -
डोळ्यांनी बघतो, ऐकत नाही
कानांनी ऐकतो, बघत नाही
मग हृदयालाच जे कळते तिथे
बुद्धी ला कां घुसावायचे ?
-अरुण