मृगजळ
-----------
मृगजळच बनते
जीवन-आशय
पाणी फक्त
संशोधना चा विषय
...........................
अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
************************
मनाची सावली
-------------------
धरती ला सावली
चिपकत नाही
मनाची सावली
देहाला सोडत नाही
............................
पुढे आणि मागे
-------------------
एक पाय पुढे- स्वप्नात
दुसरा मागे -आठवणीत
वर्तमान ?
नसतेच कधी गणतीत
...............................
अवधान
------------
मनाचा सृष्टीशी व्यापार
म्हणजे संसार
निर्मनाचा सृष्टीशी संपर्क
म्हणजे अवधान
अरुण
हा एक- तत्वबोध
(मराठमोळ्या हिंदीतुन)
**********************
न कुछभी आगे इथे
न कुछभी... पिछाड़ी
तरी ही बंदा चालवतो आहे
मागे बघुनच...गाडी
- अरुण
बोध-स्पर्शिका
***************
अर्थ
------
जसा लावावा तसाच
अर्थ लागतो
कारण शब्दात
अर्थ नसतोच
...........................
जाग
------
झोपेने केले कितीही प्रयत्न
तरी जाग येत नाही
जाग असते कशी?,
हे झोपेला माहीतच नाही
................................
माझेपण
--------
प्रत्येकाचे माझेपण
काल्पनिक असते
कल्पना वितळली की
माझेपण विझते
... अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
***********************
माणूस
--------
कांहीसा पशु कांहीसा देव,
असे मिश्रण म्हणजे- माणूस
कांहीच पूर्ण नाही ज्यात
असे अर्धवटपण म्हणजे ही- माणूस
.............................
चित्र विचित्र
-----------
जिथे जो उपयुक्त रंग
तसाच भरून चित्र बने
लालवादी, भगवेवादी
अशांचे चित्र, विचित्र बने
..............................
स्वर्ग-नर्क-संसार
--------------------
अस्तित्वमयी स्वर्गात
अहंकारमयी नर्कात
जो दोन्ही पासुन पळे
तो संसारात
अरुण
फ़ार पूर्वी केलेल्या रचना, त्यातली ही
एक ग़ज़ल
************
मोडली गळ्यात हाक.. बोलवू कशी ?
वाट आंधळी..खुणेत.. दाखवू कशी ?
घालमेल सावरीत दिवस संपला
ही उदास सांजवेळ.. घालवू कशी ?
घर घरातले दिवे जळून झोपले
अर्ध पेटल्या दिव्यास, मालवू कशी ?
श्वांस भार पावलास वाटले अता
स्वप्न पांगळे धरून चालवू कशी ?
अर्थ सूर ताल नाद दूर गुंतले
शब्द कोरडे उगाच आळवू कशी ?
अरुण
अभी न जाओ छोड़कर कि दिल अभी.....
ह्या हिंदी गाण्या मुळे मला सुचलेले
हे मराठी गीत
********************************
थांब इथे जाऊ नको
मज अंतर देऊ नको
चंद्रा करिता नभात चांदण्याही थांबल्या
काठा सह गीत गात लाटा ही रंगल्या
बेला ही प्रीतीची तिज निराश ठेऊ नको
थांब इथे............
ह्रदया च्या तारांवर सूर मस्त साधला
मिलनाच्या पदराला भाग्यरंग लाभला
भाग्याची हीच वेळ पुन्हा वाट पाहू नको
थांब इथे............
रात्रीचे राज्य इथे दिवस अजुन दूर उभा
ह्रदयांचे मंगल हे....... स्वप्नांची ही सभा
जाते.. मी जाते.. हे बोल पुन्हा बोलू नको
थांब इथे............
थांब इथे जाऊ नको
मज अंतर देऊ नको
अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
***********************
अहंकारा ची विहीर
----------------------
आकाशा चे पंख घेऊन,
जो सागरा वरून उडतो
कसा साधणार तो संवाद तयाशी
जो विहिरीतच रमतो ?
.............................
पाटी
----------
मोठ्यां चे ज्ञान,
छोट्यांच्या पाटीवर आले
वाटे छोट्यांना की
ते त्यांनीच मिळवले
...............................
गुरु
------
ज्याचे बोट धरून चालतो
तो आपला वाटसरू
ज्याच्या प्रकाशात चालतो
तोच फक्त आपला गुरु
.............................................. अरुण
बोध-स्पर्शिका
**************
गढुळ मनांत केंव्हा तरी
अवधानंच वादळ येतं
बोध स्पर्शतो आणि चार ओळीत
शहाणपण तरंगत राहतं
.............
वा-यावर वा-याने
काढलेल्या रेषा
मन म्हणजे-
मनाचाच तमाशा
.................
देव आहे सर्वत्र-
असे केवळ म्हणत राहतो
कारण मला तो
शोधायचाच नसतो
..............
अरुण
बोध-स्पर्शिका
**************
अवधान-भंग
------------------------
श्वांसा चा क्षण
स्मृती ने गिळला
स्मृति-कण बनुन
मनांत शिरला
....................
सुख-दु:ख
---------------
आनंद- सूर्याला
मनाचे ढग ग्रासतात
ऊन-सावली बनुन
माणसाला त्रासतात
.......................
शहाणपण
---------------
उर्मी आल्यावरच
पिसारा उलगडतो
वेडेपणा झोंबल्यावरच
शहाणपणा उमलतो
..........................
अरुण
बोध-स्पर्शिका
************
अस्तित्व म्हणजे-
फक्त 'असणे'
बुद्धी चे काम- असलेल्यांना
मोजत बसणे
--------------------
मिसळुन राहते जरि
खोटे आणि खरे
तर.. कोणते खोटे, कोणते खरे?
जाणुन घेणे बरे
----------------------
सर्वत्र आवाज...
दडली त्यातच... शांती
त्यालाच कळे ती
घेई जो... आवाजातही विश्रांती
---------------
अरुण
आज च्या बोध-स्पर्शिका
************************
अनुयायी
-----------
'बुद्ध' येतात..थांबतात व
निघून जातात
अनुयायी त्यांच्या सावल्या
थिजवत बसतात
..........................
सत्य बघणारी दृष्टी
------------------------
कागदा वरले अक्षर
मिटवायचे नसते
आकाश ते - कागद आणि अक्षरा मधले
बघायचे असते
...........................
गर्दी ज्ञानाची
------------------
वस्ती डोक्यात शब्दांची
घनदाट वसते
समज-उमजेला मग
जागाच नसते
.....................
अरुण
आजच्या बोधस्पर्शिका
***********************
न तुटते न फ़ुटते माती
फ़ुटते तिचे पात्र
स्वसंवेदनेला 'मी-पण' आले
आता जपा... दिवस रात्र
..................
तहानेला... न जात न धर्म
ज्यास तहान तो. ................शोधे पाणी
इथला तर किस्साच अलग
इथे 'तहाने' चे देवुळ त्यात 'पाण्या' वरली गाणी
........................
जगातले सारे ज्ञान
जरि माथ्यात भरले
पण ज्यांना माथे कळले
तेच खरे तरले
.........................
- अरुण
जवळ जवळ ३० वर्षां पूर्वी लिहलेली
ही ग़ज़ल
****************
कमनशीबी मी पुनः आलो तुझ्या दारी असा
ओळखी च्या त्याच वाटा, मी तयांना पारखा
**********
अंतरी घडवीत बसलो मागल्या भेटी पुनः
त्याच जागा, मी तयांना प्रश्नचिंन्हा सारखा
***********
काल होते परिचयाचे शहर जो तो आपला
परकीयांची आज गर्दी, पाहुणा मी पोरका
*************
टाकलेला मी असा, मज धर्मशाळा ही बरी
कैक येती कैक जाती, नाही कोणी लाडका
****************
त्या घराला दूर बसुनी पाहतो टक लावुनी
मज तिथे आभाळ दिसते, भंगल्या जरि तारका
*******
अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
*************************
सवय
---------
बेहोशीत जी जगते
ती सवय
जागृतीचे तिला
नेहमीच भय
..................
चित्र- बघायचे की चघळायचे ?
--------------------------------
डोळ्यांना अख्खे चित्र
दिसते प्रत्यक्षात
बुद्धी चघळते
टप्या टप्यात
...................
उत्तर असते प्रश्नातच
------------------------
झाडा मागुन प्रकाश होता
पुढे सावली पडते
प्रश्नावर.... घडता चिंतन
उत्तर...उमजुन येते
..............................
अरुण
माझ्या जुन्या रचनां पैकीच
ही गजल ( राग देस मधे )
**************************
ठेचले वाटे मधे जे स्वप्न केले मी उभे
दूर बसुनी आज कोणी दोन आँसू ढाळले
-----------------------------------------
पावले आली पळोनी विस्मृती च्या अंगणी
काल जे मिरवीत होतो आज येथे गाडले
---------------------------------------------
रिक्त हातांना मिळाले काम तर भरपूर आता
बस अता उचलीत जाणे डाव जे जे मांडिले
--------------------------------------------
मी करावी खंत कैसी.. माळ तुटता मीलनाची
कांही मणी माझे ज़री ते..कांही त्यांचे सांडले
---------------------------------------------
अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
**************************
गीता वाचन
------------------
गीता वाचत राहीलो
अाशय येईना ध्यानात-
मग 'तू तुलाच वाच'- असे अचानक
गीताच सांगते कानात
०००००००००००००००००००००००००
प्रयत्नच अडसर
----------------------------
अंधार ढकलुन पण
दूर जात नाही...तेंव्हा वाटते
अंधाराशी झगडणाराच तर कुठे
अंधाराचे घर नाही?
००००००००००००००००००००
अभेद
-------------
मी शिवाय तू नाही
न तू शिवाय मी
-----------
मृगजळच बनते
जीवन-आशय
पाणी फक्त
संशोधना चा विषय
...........................
अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
************************
मनाची सावली
-------------------
धरती ला सावली
चिपकत नाही
मनाची सावली
देहाला सोडत नाही
............................
पुढे आणि मागे
-------------------
एक पाय पुढे- स्वप्नात
दुसरा मागे -आठवणीत
वर्तमान ?
नसतेच कधी गणतीत
...............................
अवधान
------------
मनाचा सृष्टीशी व्यापार
म्हणजे संसार
निर्मनाचा सृष्टीशी संपर्क
म्हणजे अवधान
अरुण
हा एक- तत्वबोध
(मराठमोळ्या हिंदीतुन)
**********************
न कुछभी आगे इथे
न कुछभी... पिछाड़ी
तरी ही बंदा चालवतो आहे
मागे बघुनच...गाडी
- अरुण
बोध-स्पर्शिका
***************
अर्थ
------
जसा लावावा तसाच
अर्थ लागतो
कारण शब्दात
अर्थ नसतोच
...........................
जाग
------
झोपेने केले कितीही प्रयत्न
तरी जाग येत नाही
जाग असते कशी?,
हे झोपेला माहीतच नाही
................................
माझेपण
--------
प्रत्येकाचे माझेपण
काल्पनिक असते
कल्पना वितळली की
माझेपण विझते
... अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
***********************
माणूस
--------
कांहीसा पशु कांहीसा देव,
असे मिश्रण म्हणजे- माणूस
कांहीच पूर्ण नाही ज्यात
असे अर्धवटपण म्हणजे ही- माणूस
.............................
चित्र विचित्र
-----------
जिथे जो उपयुक्त रंग
तसाच भरून चित्र बने
लालवादी, भगवेवादी
अशांचे चित्र, विचित्र बने
..............................
स्वर्ग-नर्क-संसार
--------------------
अस्तित्वमयी स्वर्गात
अहंकारमयी नर्कात
जो दोन्ही पासुन पळे
तो संसारात
अरुण
फ़ार पूर्वी केलेल्या रचना, त्यातली ही
एक ग़ज़ल
************
मोडली गळ्यात हाक.. बोलवू कशी ?
वाट आंधळी..खुणेत.. दाखवू कशी ?
घालमेल सावरीत दिवस संपला
ही उदास सांजवेळ.. घालवू कशी ?
घर घरातले दिवे जळून झोपले
अर्ध पेटल्या दिव्यास, मालवू कशी ?
श्वांस भार पावलास वाटले अता
स्वप्न पांगळे धरून चालवू कशी ?
अर्थ सूर ताल नाद दूर गुंतले
शब्द कोरडे उगाच आळवू कशी ?
अरुण
अभी न जाओ छोड़कर कि दिल अभी.....
ह्या हिंदी गाण्या मुळे मला सुचलेले
हे मराठी गीत
********************************
थांब इथे जाऊ नको
मज अंतर देऊ नको
चंद्रा करिता नभात चांदण्याही थांबल्या
काठा सह गीत गात लाटा ही रंगल्या
बेला ही प्रीतीची तिज निराश ठेऊ नको
थांब इथे............
ह्रदया च्या तारांवर सूर मस्त साधला
मिलनाच्या पदराला भाग्यरंग लाभला
भाग्याची हीच वेळ पुन्हा वाट पाहू नको
थांब इथे............
रात्रीचे राज्य इथे दिवस अजुन दूर उभा
ह्रदयांचे मंगल हे....... स्वप्नांची ही सभा
जाते.. मी जाते.. हे बोल पुन्हा बोलू नको
थांब इथे............
थांब इथे जाऊ नको
मज अंतर देऊ नको
अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
***********************
अहंकारा ची विहीर
----------------------
आकाशा चे पंख घेऊन,
जो सागरा वरून उडतो
कसा साधणार तो संवाद तयाशी
जो विहिरीतच रमतो ?
.............................
पाटी
----------
मोठ्यां चे ज्ञान,
छोट्यांच्या पाटीवर आले
वाटे छोट्यांना की
ते त्यांनीच मिळवले
...............................
गुरु
------
ज्याचे बोट धरून चालतो
तो आपला वाटसरू
ज्याच्या प्रकाशात चालतो
तोच फक्त आपला गुरु
.............................................. अरुण
बोध-स्पर्शिका
**************
गढुळ मनांत केंव्हा तरी
अवधानंच वादळ येतं
बोध स्पर्शतो आणि चार ओळीत
शहाणपण तरंगत राहतं
.............
वा-यावर वा-याने
काढलेल्या रेषा
मन म्हणजे-
मनाचाच तमाशा
.................
देव आहे सर्वत्र-
असे केवळ म्हणत राहतो
कारण मला तो
शोधायचाच नसतो
..............
अरुण
बोध-स्पर्शिका
**************
अवधान-भंग
------------------------
श्वांसा चा क्षण
स्मृती ने गिळला
स्मृति-कण बनुन
मनांत शिरला
....................
सुख-दु:ख
---------------
आनंद- सूर्याला
मनाचे ढग ग्रासतात
ऊन-सावली बनुन
माणसाला त्रासतात
.......................
शहाणपण
---------------
उर्मी आल्यावरच
पिसारा उलगडतो
वेडेपणा झोंबल्यावरच
शहाणपणा उमलतो
..........................
अरुण
बोध-स्पर्शिका
************
अस्तित्व म्हणजे-
फक्त 'असणे'
बुद्धी चे काम- असलेल्यांना
मोजत बसणे
--------------------
मिसळुन राहते जरि
खोटे आणि खरे
तर.. कोणते खोटे, कोणते खरे?
जाणुन घेणे बरे
----------------------
सर्वत्र आवाज...
दडली त्यातच... शांती
त्यालाच कळे ती
घेई जो... आवाजातही विश्रांती
---------------
अरुण
आज च्या बोध-स्पर्शिका
************************
अनुयायी
-----------
'बुद्ध' येतात..थांबतात व
निघून जातात
अनुयायी त्यांच्या सावल्या
थिजवत बसतात
..........................
सत्य बघणारी दृष्टी
------------------------
कागदा वरले अक्षर
मिटवायचे नसते
आकाश ते - कागद आणि अक्षरा मधले
बघायचे असते
...........................
गर्दी ज्ञानाची
------------------
वस्ती डोक्यात शब्दांची
घनदाट वसते
समज-उमजेला मग
जागाच नसते
.....................
अरुण
आजच्या बोधस्पर्शिका
***********************
न तुटते न फ़ुटते माती
फ़ुटते तिचे पात्र
स्वसंवेदनेला 'मी-पण' आले
आता जपा... दिवस रात्र
..................
तहानेला... न जात न धर्म
ज्यास तहान तो. ................शोधे पाणी
इथला तर किस्साच अलग
इथे 'तहाने' चे देवुळ त्यात 'पाण्या' वरली गाणी
........................
जगातले सारे ज्ञान
जरि माथ्यात भरले
पण ज्यांना माथे कळले
तेच खरे तरले
.........................
- अरुण
जवळ जवळ ३० वर्षां पूर्वी लिहलेली
ही ग़ज़ल
****************
कमनशीबी मी पुनः आलो तुझ्या दारी असा
ओळखी च्या त्याच वाटा, मी तयांना पारखा
**********
अंतरी घडवीत बसलो मागल्या भेटी पुनः
त्याच जागा, मी तयांना प्रश्नचिंन्हा सारखा
***********
काल होते परिचयाचे शहर जो तो आपला
परकीयांची आज गर्दी, पाहुणा मी पोरका
*************
टाकलेला मी असा, मज धर्मशाळा ही बरी
कैक येती कैक जाती, नाही कोणी लाडका
****************
त्या घराला दूर बसुनी पाहतो टक लावुनी
मज तिथे आभाळ दिसते, भंगल्या जरि तारका
*******
अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
*************************
सवय
---------
बेहोशीत जी जगते
ती सवय
जागृतीचे तिला
नेहमीच भय
..................
चित्र- बघायचे की चघळायचे ?
--------------------------------
डोळ्यांना अख्खे चित्र
दिसते प्रत्यक्षात
बुद्धी चघळते
टप्या टप्यात
...................
उत्तर असते प्रश्नातच
------------------------
झाडा मागुन प्रकाश होता
पुढे सावली पडते
प्रश्नावर.... घडता चिंतन
उत्तर...उमजुन येते
..............................
अरुण
माझ्या जुन्या रचनां पैकीच
ही गजल ( राग देस मधे )
**************************
ठेचले वाटे मधे जे स्वप्न केले मी उभे
दूर बसुनी आज कोणी दोन आँसू ढाळले
-----------------------------------------
पावले आली पळोनी विस्मृती च्या अंगणी
काल जे मिरवीत होतो आज येथे गाडले
---------------------------------------------
रिक्त हातांना मिळाले काम तर भरपूर आता
बस अता उचलीत जाणे डाव जे जे मांडिले
--------------------------------------------
मी करावी खंत कैसी.. माळ तुटता मीलनाची
कांही मणी माझे ज़री ते..कांही त्यांचे सांडले
---------------------------------------------
अरुण
आजच्या बोध-स्पर्शिका
**************************
गीता वाचन
------------------
गीता वाचत राहीलो
अाशय येईना ध्यानात-
मग 'तू तुलाच वाच'- असे अचानक
गीताच सांगते कानात
०००००००००००००००००००००००००
प्रयत्नच अडसर
----------------------------
अंधार ढकलुन पण
दूर जात नाही...तेंव्हा वाटते
अंधाराशी झगडणाराच तर कुठे
अंधाराचे घर नाही?
००००००००००००००००००००
अभेद
-------------
मी शिवाय तू नाही
न तू शिवाय मी
No comments:
Post a Comment