बघण्यात भूल झाली
*********************
बघण्यात भूल झाली
जे समोर आहे ते नीट दिसेनासे झाले
आणि मग अवतरली कल्पना
तिला अंकुर फुटले.... त्याचे वृक्ष झाले
वृक्षातुन वृक्षे उपजत गेली आणि आता हे
कल्पनेचे घनदाट जंगल... म्हणजेच 'मी' आणि
ह्या 'मी'ला जे काही दिसते आहे तेच 'मी' चे हे जग
पण कांहीच्याच बाबतीत अचानक निराळे घडले......
बघण्यातली भूल होते वेळीच दिसुन आली...
आणि मग समोर जे जसे आहे तसेच स्पष्ट झाले
मग कसली आली कल्पना ?.. कसले अंकुर?
मग... कुठली वृक्षे आणि कोणते जंगल?
मग त्यांचे साठी समोर जे दिसते ते सर्व मंगलच मंगल....
अरुण
मराठी
-------------
पक्षी दोन
***********
पक्षी दोन
एक पिंज-यात
दुसरा िपंज-या बाहेर त्याच्या कळपात....
पिंज-यातल्याला
एकटेपणातुन अचानक एकांत गवसतो
जागच्या जागीच पिंज-याचे पिंजरेपण उमगते
आणि तिथेच राहुन त्याच्या बंधनांचा गंुता उसवल्याने
आता तो गातोय् आकाशाच्या लयकारीत
बाहेरचा,
कळपात राहुन उडतोय् खुल्या आकाशात
परंतु कळप-संस्कृतीशी बांधिलकी जपता जपता
दिसेनासे झाले त्याला, आकाशाचे खुलेपण
खुलेपण सरल्याने तो गातो आहे कळपाच्या लयकारीत
अरुण
सागर आणि त्याच्या लाटा
किंवा ही लाट आणि ती लाट,
यांचे नाते काय?
अशा कितीक गैरवाजवी प्रश्नांचा
शोध घेण्यात ऊर्जा झिझत आहे
कांही बोध-स्पर्शिका
~~~~~~~~~~~~~~~~~
पोहचलेला
************
आहे तिथेच राहुन,
ज्याला स्वर्ग गवसला
आध्यात्म त्यालाच म्हणते
पोहचलेला
.............................
पिंजरा
*********
पिंजराच जर भावत असेल
तर बाहेर कसे पडणार ?
एक पिंजरा सुटला तर
दुसरा जवळ करणार
...............................
दरवाजा
***********
दरवाजाशीच मोह जडला
आंत शिरणे राहुन गेले
हिंदू बनलो, मुस्लिम बनलो
धार्मिक बनणे राहुन गेले
......................................
अरुण
No comments:
Post a Comment