Wednesday, 13 April 2016

14 April 2016 बोधस्पर्शिका

1 April Marathi 2016

बोधस्पर्शिका
***********
सर्वत्र, माणूस अंतरंगी सारखाच असतो
प्रत्येकाचा भूतकाळ किंवा स्मृती त्याला डसली
की तो वेगळे वागताना दिसतो
- अरुण

बोधस्पर्शिका
**************
डोळ्यांना चलचित्र बघतेवेळी
वेगवेगळी चित्रे दिसतात
परंतु मेंदूला त्यांचे वेगळेपण आकलित न झाल्याने
सलगता भ्रमित होते आणि
त्यातुन एक कथा जन्म पावते
अशाच तर्हेने
प्रत्येक क्षणाची वेग वेगळी स्मृती....जोडली गेल्यामुळे
अहंकाराचे मायावी अस्तित्व जन्माला येते
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
शब्द, प्रतिमा चिन्हे असतात
आशय सांगण्या साठी
स्वत: ची पूजा करून घेण्यासाठी किंवा
स्वत:चे राज्य गाजवण्यासाठी नव्हे
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
देशावर प्रेम...
हा असतो
एक ............सहज साधा भाव
त्याला राष्ट्रवादाचे नाव दिले
की तो बनतो एक राजकारणी डाव
- अरुण
बोधस्पर्शिका
************
कोणतीही घटना
घडते किंवा न घडते
याची अनेक अनेक कारणे किंवा कारके असु शकतात..
बरीच कारणे सरळ सरळ समजुन येतात आणि
बरीच उमजत नाहीत.
जी कारणे समजत उमजत नाहीत त्यांनाच
‘भाग्य’ असे संबोधून
माणुस स्वत:ची समजुत घालतो.
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
इतरांचे अहंकारी वर्तन जेंव्हा बोचायला लागते
तेंव्हा आपला अहंकार दुखावला आहे असे समजावे
-अरुण
बोधस्पर्शिका
************
धर्म कधी एकमेकांचे स्पर्धक नसतात,
एकमेकांबद्दल आकस बाळगणारे नसतात
जर असलेच तर....
ते धर्म नसून
धर्मा चे नांव धारण केलेल्या
माणसांच्या झुंडी असतील
- अरुण
बोधस्पर्शिका
**********
राजकारणा च्या क्षेत्रात
पुढारी, कार्यकर्ते,पाऱ्ट्या,त्यांचे समर्थक, विरोधी
जे काही करतात त्यालाच राजकारण म्हटले तर त्यात वावगे काय?
पण..’तुम्ही राजकारण करीत आहांत’....असे म्हटले तर त्यांना हा आरोप वाटतो
हे जरा विचित्रच नाही काय?
- अरुण
बोधस्पर्शिका
***********
एकाच ब्रॅंड चे दोन एक सारखे computers
वेग वेगळ्या operating systems ने चालत असले,
वेगळे programs run करत असले तरी
Computer म्हणुन ते एक सारखेच असतात.
माणसाचेही तसेच.
सर्वस्थळी सर्वकाळी माणूस हा एक सारखाच
- अरुण
बोधस्पर्शिका
***********

सांकेतिक अर्थाने,
सामाजिक किंवा राजकीय पातळीवर,
शेळी वाघ किंवा इतर पशुपक्षी
एकत्र नांदायला लागले की
‘एकता प्रस्थापित झाली’ असे मानले जाते
आध्यात्मिक जाणीवेला,
सर्वांची प्राणलय एकच आहे
हे दिसुन येते
- अरुण

No comments:

Post a Comment